महाराष्ट्र (प्राकृतिक)

महाराष्ट्रात ७ प्रादेशिक विभाग आहेत.

१. कोंकण     २. देश      ३. घाटमाथा      ४. मावळ      ५. खानदेश      ६. मराठवाडा      ७. विदर्भ (वऱ्हाड)

महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी ८०० किमी आहे. तर दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी आहे.

महाराष्ट्र नैसर्गिक सीमा :-

१. वायव्य – सातमाळा डोंगर, गाळणा टेकड्या, दरेकसा टेकड्या.

२. उत्तर – सातपुडा डोंगर, विल्गड टेकड्या.

३. ईशान्य – दरेकसा टेकड्या.

४. पूर्व – चिरोली टेकड्या, गायखुरी डोंगर, भामरागड डोंगर.

५. दक्षिण – हिरण्यकेशी नदी, नंदी नदी, तेरेखोल नदी.

६. पश्चिम – अरबी समुद्र.

 महाराष्ट्राचे प्राकृतिक तीन विभाग

१. कोंकण

२. सहयाद्री किंवा पश्चिम घाट

३. पठारी किंवा दक्खनी प्रदेश

कोंकण

  • कोंकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी आहे. उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेत तेरेखोल नदीपर्यंत विस्तार.
  • सरासरी रुंदी ३० ते ६० किमी . कोकणची रुंदी सर्वत्र सारखी नाही.
  • कोकण एक सलग मैदान नाही हा डोंगरदरयानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा  सखल भाग आहे.
  • कोकणचे दक्षिण कोकण व उत्तर कोकण असे दोन विभाग पडतात. दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो तर उर्वरित जिल्ह्यांचा उत्तर कोकणात समावेश होतो.
  • उत्तर कोकण कमी खडकाळ व डोंगराळ नसून त्यात लोकसंख्या , शहरे व नागरीकरण जास्त आहे.
  • याउलट दक्षिण कोकण जास्त खडकाळ व डोंगराळ असून त्यात शहरे आणि लोकसंख्या कमी आहे.
  • पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला ‘खलाटी’ म्हणतात. खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्यास ‘वलाटी’ असे म्हणतात.
  • कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावर खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.

सागरी किल्ले –

   १. वसईचा किल्ला     २. जंजिरा     ३. सुवर्णदुर्ग     ४. विजयदुर्ग     ५. सिंधुदुर्ग

बेटे-

१. मुंबई     २. साष्टी     ३. खांदेरी व उंदेरी     ४. घारापुरी व अंजदीव

* कोकण किनारपट्टीवर मुंबई हे महत्वाचे व आंतरराष्ट्रीय बंदर आहे. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे.

* मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबई जवळच न्हावा शेवा हे बंदर उभारलेले आहे . (JNPT – Jawaharlal Nehru Port Trust)
* JNPT रायगड जिल्ह्यात येथे. कॅनडाच्या साहाय्याने बनविण्यात आलेले हे एक अत्याधुनिक बंदर आहे.

*महाराष्ट्रात व कोकणात एकूण ४९ बंदरे आहेत.
कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा –रायगड
महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
राज्यातील पहिले मत्स्यालय –तारपोरवाला (मुंबई)
राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे –बॉम्बे हाय व वसई हाय
कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प –उरण (रायगड)
कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.

सह्याद्री

* भारताच्या पश्चिम किनारपतट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे.

* सह्याद्री दक्खनची पश्चिम सीमा निश्चित करतो.

* सह्याद्री पर्वत उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे.

* त्याची एकूण लांबी १६०० किमी असून महाराष्ट्र मध्ये त्याची लांबी ४४० किमी आहे.

* सरासरी उंची – ९१५ ते १२२० किमी

* महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते.

* पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार तीव्र आहे.

* सह्याद्री पर्वत रांगामुळे पश्चिमवाहिनी व पूर्ववाहिनी नद्यांचे जाल्विभाजक वेगळे झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीला महाराष्ट्रातील प्रमुख जाल्विभाजक म्हणतात.

* सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच व सपाट प्रदेशाला घाटमाथा म्हणतात . उदा. माथेरान , महाबळेश्वर

* पठाराचा उतार सर्वसाधारण आग्नेय वायव्य आहे.

* शंभू महादेव डोंगर भागात सासवड पठार आहे .

* मराठवाड्यात मांजरा पठार आहे.

* सातमाळा अजिंठा डोंगरभागात बुलढाणा व मालेगाव पठार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.सह्याद्रीच्या उपरांगा –
गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग – सातमाळ डोंगरसातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर

पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग –हरिश्चंद्र बालाघाट

शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठारक्र.

शिखर उंची (मी.)जिल्हा व वैशिष्ट्य

कळसूबाई१६४६नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)
साल्हेर१५६७नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे
महाबळेश्वर१४३८सातारा
हरिश्चंद्र गड१४२४अहमदनगर
सप्तश्रृंगी गड१४१६नाशिक
त्रंबकेश्वर१३०४नाशिक

 सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा

१. शंभू महादेव डोंगर रांगा
२. हरिश्चंद्र-बालाघाट डोंगर रांगा
३. सातमाळा-अजिंठा डोंगर रांगा

दक्खन

* दक्खन भाग हा मुख्यत्वे नद्यांच्या खोर्यासाठी प्रसिद्ध आहे.

* भूगर्भरचना – भ्रन्श्मुलक उद्रेकाने लाव्हारस शेकडो चौ.किमी. पसरून दक्खन पठाराची निर्मिती झाली आहे.

* दक्खन पठाराची पश्चिम पूर्व लांबी ७५० किमी तर उत्तर दक्षिण लांबी ७०० किमी आहे.

हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते.दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे.गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात