बाबा आमटे

जन्म : २६ डिसेंबर १९१४
जन्मस्थळ : हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र
पत्नी : साधनाताई आमटे (इंदू घुले)
मुले : प्रकाश आमटे व विकास आमटे
मृत्यू : ९ फेब्रुवारी २००८
प्रभाव : महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर व साने गुरुजी

ऑब्जेक्टीव्ह :-

१. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर,महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला.

२. मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला.

३. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती

४. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊन इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी संपादन केली.

५. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.

६. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

७. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

८. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

९. इ.स. १९५१ साली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात त्यांनी ‘आनंदवना’ची स्थापना केली. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

१०. सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले.

११. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला.

१२. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.

१३. भामरागड तालुक्यातील मडिया गौंड आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत.

१४. महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले

१५. गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते.

१६. ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

१७. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ मंदाकिनी आमटे यांना त्यांच्या हेमलकसा येथील कार्याबद्दल २००८ साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

१८. महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव असल्याने बाबा आमटे नेहमी आनंदवन येथे बनवलेली खादीची वस्त्रे परिधान करत.

१९. महात्मा गांधीच्या ‘खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत’ या वाक्याचा त्यांनी अक्षरशः वसा घेतला होता.

२०. बाबा आमटे स्वतःला नास्तिक म्हणत.

टोपणनावे:-

१. बाबा
२. बाबा आमटे यांना हे ‘आधुनिक भारताचे संत’ या नावाने गौरविले जाते.
३. गांधीजीनी बाबांना ‘अभय साधक’ अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले

पुस्तके:-

१. ज्वाला आणि फुले (काव्यसंग्रह)
२. उज्ज्वल उद्यासाठी (काव्यसंग्रह)
३. माती जागवील त्याला मत’
*. ‘समिधा’ हे बाबा आमटेंच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे.

संस्था :-

१. १९४९ महारोगी सेवा समिती
२. आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
३. सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)
४. अशोकवन – नागपूर
५. लोकबिरादरी प्रकल्प – नागेपल्ली
६. लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा

महत्वाचे पुरस्कार:-

१. रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९८५)
२. डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका – इ.स. १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार
३. संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार (१९९८)
४. पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर (१९९१)
५. पद्मश्री (१९७१)
६. पद्मविभूषण (१९८६)
७. गांधी शांतता पुरस्कार (१९९९)
८. महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) १ मे २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.

मानद पदव्या:-

१. डी.लिट – नागपूर विद्यापीठ इ.स. १९८०
२. डी. लिट. – पुणे विद्यापीठ, इ.स. १९८५-८६
३. देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) इ.स. १९८८ -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल
४. डी.लिट – टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्स, मुंबई
५. कृषी रत्न (१९८१) : सन्मानीय डॉक्टरेट, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

प्रसिद्ध वाक्ये :-

१. भिती असते तिथे प्रीति नसते
२. माणूस बोटाशिवाय जगू शकतो परंतु स्वाभिमाना शिवाय जगू शकत नाही.