इतिहास जनरल नोट्स

०१. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  केली.
०२. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक गो. कृ. गोखले होते (English Edition). 

०३. वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले

०४. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

०५. ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत’ या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय विनोबा भावे यांना जाते.

०६. ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष युगांतर हे वृत्तपत्र चालवीत.

०७. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड झाली होती.

०८. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती.

०९. सन १९३१ मध्ये इंडियन नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना मेघनाद साहा यांनी केली.

१०. ढाका येथील नवाब सलीमुल्लाने १९०६ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली होती.

११. वि दा सावरकर यांना सेल्यूलर जेल मध्ये  जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते.

१२. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना पंडित मदनमोहन मालविय यांनी केली होती.

१३. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक सर विल्यम्स जॉन्स होते.

१४. भारतात अंधांसाठी सन १८८७ मध्ये पहिली शाळा अमृतसर येथे सुरू करण्यात आली.

१५. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ शेगाव होते.

१५. “जे लोक कॉंग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात, ते मुर्ख आहेत. त्यांना राजकारण कळत नाही” हे वाक्य डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी म्हटले होते.

१६. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटन यांनी पास केला.

१७.. ‘बंदी जीवन’ ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन सचिंद्रनाथ संन्याल यांनी केले.

१८. ‘टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स’ ची स्थापना लाला लजपतराय यांनी केली होती.

१९. १८३७ वर्षी कोणी Land Holders Association ही संघटना द्वारकानाथ टागोर यांनी स्थापन केली.

२०. शाहु महाराजांनी शाहुपुरी ही बाजारपेठ १८९५ साली वसविली.

२१. ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना कोणत्या १८६६ साली करण्यात आली.

२२. ‘पुणे सार्वजनिक सभेची’ स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी केली.

२३. १९१७ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्षा म्हणून डॉ. ऍनी बेझंट यांची निवड झाली होती.

२४. १८९९-१९०० या काळात बिरसा मुंडाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता.

२५. शाहू महाराजांनी ‘शाहूपुरी’ ही बाजारपेठ १८९५ साली वसवली.

२६. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे गुरू कुंज आश्रमाची स्थापना केली.

२७. १८५७ च्या उठावाचे प्रतिक म्हणून “लाल कमळ व चपाती” हे चिन्ह होते.

२८. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास ७२ प्रतिनिधी हजर होते.

२९. ‘सती’ बंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेटिंक यांनी केला.

३०. १८८४ या वर्षी ‘मद्रास महाजन सभा’ या संस्थेची स्थापना झाली होती.

३१. इंग्रजांविरुद्ध मुल्तानचा अधिकारी मुलराज याने बंड केले.

३२. रशिया अफगाणिस्तानातून आक्रमण करेल या भीतीने इंग्रजांनी अफगाणिस्तानवर प्रभाव निर्माण करण्याचे ठरविले.

३३. रोबर्ट क्लाइव्हने १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली.

३४. १८५३ साली कावासजी नानाभॉय यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरु केली.

३५. १८५५ साली बंगालमधील रीच्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरु झाली.

३६. १९०७ साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे ‘टाटा आयर्न एंड स्टील’ कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना काढला.

३७. १७८४ साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली.

३८. १८२९ मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. १८५६ साली लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला.

३९. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार १८३५ मध्ये भारतात पाश्चात्य शिक्षण सुरु करण्यात आले.

४०. सन १८४८ ते १८५६ या काळात लॉर्ड डलहौसीने अनेक राज्ये खालसा केली.

४१. स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ १८८२ साली ताराबाई शिंदे यांनी लिहिला.

४२. या काळात अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. अब्दुल लतीफ यांनी ‘द मोह्मेडन लिटररी सोसायटी’, सर सय्यद अहमद खान यांनी ‘मोहमेडन एंग्लो ओरिएंटल कॉलेज’, महात्मा फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’, राजा राममोहन रॉय यांनी ‘ब्राह्मो समाज’, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ‘परमहंस सभा’ आणि स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्था स्थापन केल्या.

४३. नारायण गुरुजींनी जातीभेद नष्ट करण्यासाठी केरळमध्ये आंतरजातीय विवाह हा मार्ग अवलंबिला.

४४. शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे ‘सिंग सभा’ स्थापन झाली. या संस्थेने शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणल्याचे काम केले. हेच काम पुढे ‘अकाली चळवळी’ने चालू ठेवले.

४५. पेरियार रामास्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला. तसेच स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चिक विवाह पद्धतीचा त्यांनी धिक्कार केला.

४६. खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खीदमदगार या संघटनेची स्थापना केली. त्यांनाच सरहद गांधी असे म्हणून ओळखले जाते. २३ एप्रिल १९३० रोजी त्यांनी पेशावर येथे सत्यागृह सुरु केला.सरकारने गढवाल पलटणीला गोळीबार करण्याचा आदेश दिला. गढवाल कंपनीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी नकार दिल्यानंतर लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा केली.

४७. छोडो भारत चळवळीवेळी सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या ‘आझाद दस्ता’ आणि नागपूरच्या जनरल आवारी यांच्या ‘लाल सेना’ या संघटनांनी इंग्रजांना खूप त्रास दिला . मुंबईला विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र चालविले त्याला ‘आझाद रेडियो’ असे नाव दिले.

४८. १९१५ मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला व ओबेदुल्ला सिंधी यांनी काबुलमध्ये भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली.

४९. स्वातंत्र्य चळवळ काळात शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले. बीना दास या युवतीने कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गवर्नरवर गोळ्या झाडल्या.

५०. १९१८ साली बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशातील

शेतकऱ्यांनी ‘किसान सभा’ स्थापन केली. १९३६ साली प्रा. एन.जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय किसान सभा’ स्थापन करण्यात आली. या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला.

५१. १९३८ साली पूर्व खानदेशात अत्वृष्टी होऊन पिके बुडाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी सभा भरविल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला.

५२. या काळात कामगारांनीही बंड केले. भारतीय कामगार चवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात.

५३. १८९९ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनावेळी स्वदेशीला पाठींबा देण्यासाठी कामगारांनी संप केले. परंतु कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक अशी संघटना नव्हती. म्हणून १९२० मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस ची स्थापना करण्यात आली.लाला लजपत राय आयटक च्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

५४. राष्ट्रीय सभेच्या तरुणांनी नाशिकच्या तुरुंगात असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मितु मसानी, डॉ. राममनोहर लोहिया इत्यादींनी १९३४ साली समाजवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला.

५५. १९२५ साली साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. सरकारला या पक्षाची भीती वाटायची. म्हणूनच ब्रिटीश राज्य उलथवून टाकण्याचा कट केल्याच्या आरोपावरून साम्यवादी पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध ‘मीरत खटला’ चालवला गेला. मुजफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे, नीलकंठ जोगळेकर इत्यादींना शिक्षा ठोठाविण्यात आल्या.