सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग २

०१. सरकारी रुग्णालयात ५७० प्रकारची औषधे मोफत देण्यासाठी ‘निरामय’ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?
>>> ओडिशा०२. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार १५८ देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
>>> ११७०३. महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मान मे २०१५ मध्ये कोणाला जाहीर झाला?
>>>बाबासाहेब पुरंदरे

०४. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि आयुष राज्य मंत्री एस. व्हाय. नाईक यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा लोगो प्रकाशित केला. हा लोगो कोणत्या मंत्रालयाच्या विशेष समितीने तयार केला आहे?
>>> आयुष मंत्रालय

०५. लंडनमधील व्हाइटली फंड फॉर नेचर या संस्थेचा ‘ग्रीन ऑस्कर’ हा पुरस्कार नुकताच कोणत्या भारतीयाला प्रदान करण्यात आला?
>>> डॉ. प्रमोद पाटील

०६. कीनोट ऑडियोज या संस्थेने नुकतेच कोणते पुस्तक श्रवणग्रंथाच्या (ऑडिओ बुक) माध्यमातून उपलब्ध करून दिले?
>>> श्यामची आई

०७. ‘फाईट ऑफ दी सेन्च्युरी’ असे वर्णन करण्यात आलेल्या जागतिक वेल्टरवेट विजेतेपदाच्या बॉक्सिंग लढतीत कोणी विजेतेपद मिळविले?
>>> फ्लॉइड मेवेदर ज्युनिअर

०८. गायन आणि अभिनयाच्या बळावर रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या जुन्या पिढीतील अभिनेत्री ‘बिंबा मोडक’ यांचे वृद्धापकाळाने मे २०१५ मध्ये निधन झाले. त्यांचे खरे नाव काय होते?
>>> शांताबाई भास्कर मोडक

०९. “जागतिक डावखुरे दिन” कधी साजरा केला जातो ?
>>>13 ऑगस्ट

१०. “जागतिक सायकल दिन” कधी साजरा करतात ?
>>> 7 एप्रिल

११. “जागतिक मलेरिया दिन” कधी साजरा केला जातो?
>>>25 एप्रिल

१२. “जागतिक स्वच्छतागृह दिन” केव्हा साजरा करतात ?
>>>19 नोव्हेंबर

१३. कोणत्या खंडात वाळवंट नाही असे म्हटले जाते?
>>> युरोप

१४. “आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन” केव्हा साजरा करतात?
>>>29 जुलै

१५. “जागतिक लोकशाही दिन” कधी साजरा करतात?
>>>15 सप्टेंबर

१६. “राष्ट्रीय सुशासन दिन” कधी साजरा करण्यात आला ?
>>> 25 डिसेंबर

१७. “जागतिक मुक्त पत्रकारिता दिन” कधी पाळला जातो ?
>>> 3 मे

१८. “डार्विन दिन ( उत्क्रांती दिन )” केव्हा साजरा केला गेला ?
>>> 12 फेब्रुवारी

१९. “जागतिक विद्यार्थी दिन” कधी साजरा करतात?
>>>15 ऑक्टोबर

२०. १ मे २०१५ पासून भारताने किती देशांना ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे?

>>> ७६