aaak
कलम 
वैशिष्ट्ये

कलम १००
संसदेत मतदान, संसदेची गणपूर्तता व रिक्तता याबाबत संसदेचे अधिकार. 

कलम १०१
जागांची रिक्तता. 

कलम १०२
संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद. 

कलम १०३
संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत आणि त्याबाबतच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार. 

कलम १०४
एखादा व्यक्ती पात्र नसताना किंवा सदस्याला अपात्र ठरविले असताना किंवा निर्वाचित सदस्य शपथ घेण्यापूर्वीच संसदेच्या सदनात बसलेला अथवा मतदान करताना आढळल्यास त्याबाबतीत दंडाची तरतूद. 

कलम १०५
संसद, संसद सदस्य आणि संसदीय समित्या यांचे विशेषाधिकार. 

कलम १०६
संसद सदस्यांचे वेतन व भत्ते

कलम १०७
विधेयक सादर आणि मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी. 

कलम १०८
संसदेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीची तरतूद. 

कलम १०९
धन विधेयक सादर करण्याची विशेष पद्धत

कलम ११०
धन विधेयकाची व्याख्या

कलम १११
विधेयकाला मान्यता देण्याबाबत तरतुदी

कलम ११२
संसदेचा वार्षिक आर्थिक अहवाल

कलम ११३
संसदेसमोर अंदाजपत्रक मांडण्याची पद्धत

कलम ११४
संसद विनियोजन विधेयके

कलम ११५
पूरक, अतिरिक्त अनुदान

कलम ११६
कर्जाबाबत मते, अपवादात्मक अनुदाने. 

कलम ११७
आर्थिक विधेयकाबाबत विशेष तरतुदी

कलम ११८
संसद चालविण्याबाबतचे नियमे

कलम ११९
आर्थिक व्यवसायाच्याबाबत संसदेत कायदे तयार करण्याच्या पद्धतीबाबत नियमने.  

कलम १२०
संसदेत वापरू शकणाऱ्या भाषेबाबत

कलम १२१
संसदेत चर्चा करण्याबाबतचे निर्बंध

कलम १२२
संसदेच्या कारवाईमध्ये न्यायालयाला चौकशी करता येणार नाही. 

कलम १२३
संसदेच्या विश्रांती काळात राष्ट्रपतींचे अध्यादेश (वटहुकुम) काढण्याबाबतचे अधिकार. 

कलम १२४
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व संविधान. 

कलम १२५
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन व भत्ते. 

कलम १२६
सर्वोच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. 

कलम १२७
तात्कालिक न्यायाधीशांची नियुक्ती. 

कलम १२८
निवृत्त न्यायाधीशांना जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यास पात्र असतील त्यांना त्यांच्या संमतीने सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करणे. 

कलम १२९
सर्वोच न्यायालय हे नोंद ठेवण्याचे ठिकाण असेल. 

कलम १३०
सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण. 

कलम १३१
सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकारक्षेत्र. 

कलम १३२
काही विशिष्ट प्रकरणात उच्च न्यायालयाच्या अपिलात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय कार्यक्षेत्र

कलम १३३
नागरी प्रश्न संबंधी प्रकरणात उच्च न्यायालयाच्या अपिलात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय कार्यक्षेत्र

कलम १३४
गुन्हेगारी विषयी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय अधिकार क्षेत्र. 

कलम १३४ (अ)
सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी प्रमाणपत्र. 

कलम १३५
सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असलेल्या विद्यमान कायदाअंतर्गत संघ न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र 

कलम १३६
सर्वोच्च न्यायालयाकडून अपिलासाठी विशेष रजा. 

कलम १३७
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे किंवा आदेशाचे पुनरावलोकन. 

कलम १३८
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ. 

कलम १३९
काही प्राधिलेख जारी करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास प्रदान. 

कलम १३९ (अ) 
काही विशिष्ट प्रकरणांचे सर्वोच्च न्यायालयाकडे  हस्तांतरण. 

कलम १४०
सर्वोच्च न्यायालयास पूरक असे अधिकार. 

कलम १४१
सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेले नियम भारताच्या राज्यक्षेत्रातील इतर सर्व न्यायालयावर बंधनकारक असतील. 

कलम १४२
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश व नियमांची अंमलबजावणी

कलम १४३
सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. 

कलम १४४
देशातील सर्व न्यायिक आणि मुलकी प्राधिकरणानी सर्वोच्च न्यायालयास सहाय्य करावे. 

कलम १४५
न्यायालयाचे नियम. 

कलम १४६
सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक तसेच सर्वोच्च न्यायालयाचा खर्च. 

कलम १४७
अर्थ लावणे. 

कलम १४८
भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक

कलम १४९
भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे अधिकार व कर्तव्ये. 

कलम १५०
केंद्र व राज्यांच्या लेख्यांचे स्वरूप

कलम १५१
लेखा परीक्षण अहवाल

कलम १५२
व्याख्या. 

कलम १५३
राज्यांचे राज्यपाल

कलम १५४
राज्यांचे कार्यकारी अधिकार 

कलम १५५
राज्यपालाची नियुक्ती

कलम १५६
राज्यपाल पदाचा पदावधी

कलम १५७
राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी पात्रता. 

कलम १५८
राज्यपाल पदाच्या व कार्यालयाच्या शर्ती

कलम १५९
राज्यपालांनी घ्यवयाची शपथ

कलम १६०
काही आकस्मिक परिस्थितीमध्ये राज्यपालांच्या कार्यभारापासून मुक्तता

कलम १६१
राज्यपालांचा शिक्षा माफीचा, शिक्षा रद्द करण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार. 

कलम १६२
राज्याच्या कार्यकारी अधिकाराची मर्यादा. 

कलम १६३
राज्यपालांना सल्ला व साहाय्य देण्यासाठी मंत्रीमंडळ

कलम १६४
राज्यातील मंत्र्यांसाठी इतर तरतुदी. 

कलम १६५
राज्याचा महाधिवक्ता 

कलम १६६
राज्य सरकारांचे व्यापार चालविण्याची पद्धती. 

कलम १६७
राज्यपालांना माहिती सादर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये 

कलम १६८
राज्य विधीमंडळासाठी संविधान. 

कलम १६९
राज्यात विधान परिषद स्थापन किंवा नष्ट करणे. 

कलम १७०
विधानसभेची रचना. 

कलम १७१
विधानपरिषदेची रचना

कलम १७२
विधिमंडळ सदनांचा कालावधी. 

कलम १७३
विधीमंडळ सदस्य बनण्यासाठीची पात्रता. 

कलम १७४
राज्य विधीमंडळाचे सत्र, विधिमंडळ स्थापन व बरखास्त करण्याची तरतूद. 

कलम १७५
विधीमंडळाच्या सदनाना संबोधित करणे व सदनाना निरोप पाठविण्याबाबत राज्यपालांचे अधिकार.  

कलम १७६
राज्यपालांचे विशेष संबोधन.

कलम १७७
विधीमंडळ सदनाबाबत मंत्री व महाधिवक्ता यांचे अधिकार. 

कलम १७८
विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. 

कलम १७९
विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी.

कलम १८०
विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपाध्यक्ष किंवा इतर सदस्यांचे अधिकार. 

कलम १८१
विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष त्यावेळी सदनाचे अध्यक्षपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल. 

कलम १८२
विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती. 

कलम १८३
विधान परिषद सभापती व उपसभापतींचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी. 

कलम १८४
विधानपरिषद सभापतींच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपसभापती किंवा इतर सदस्यांचे अधिकार. 

कलम १८५
विधानपरिषद सभापती किंवा उपसभापती त्यावेळी सदनाचे सभापतीपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल.  

कलम १८६
विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधानपरिषद सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते. 

कलम १८७
विधीमंडळाचे सचिवालय. 

कलम १८८
विधीमंडळ सदस्यांनी घ्यावयाची शपथ. 

कलम १८९
विधीमंडळ सदनात मतदान, विधीमंडळा सदनांची गणपूर्तता व रिक्तता याबाबत सदनांचे अधिकार.

कलम १९०
विधीमंडळातील जागांची रिक्तता. 

कलम १९१
विधीमंडळ सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद. 

कलम १९२
विधीमंडळ सदस्यांच्या अपात्रतेबाबत आणि त्याबाबतच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार. 

कलम १९३
एखादा व्यक्ती पात्र नसताना किंवा विधिमंडळ सदस्याला अपात्र ठरविले असताना किंवा निर्वाचित विधिमंडळ सदस्य शपथ घेण्यापूर्वीच विधीमंडळाच्या सदनात बसलेला अथवा मतदान करताना आढळल्यास त्याबाबतीत दंडाची तरतूद. 

कलम १९४
विधिमंडळ, विधिमंडळ सदस्य आणि विधिमंडळ समित्या यांचे विशेषाधिकार. 

कलम १९५
विधिमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते

कलम १९६
विधीमंडळात विधेयक सादर आणि मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी. 

कलम १९७
विधेयकाबाबत विधान परिषदेच्या अधिकारावर बंधने. 

कलम १९८
विधी मंडळात धन विधेयक सादर करण्याची विशेष पद्धत

कलम १९९
राज्य धन विधेयकाची व्याख्या

कलम २००
विधीमंडळात विधेयकाला मान्यता देण्याबाबत तरतुदी

कलम २०१
विचार करण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याबाबत तरतुदी.