राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक १ [स्पष्टीकरण व उत्तरासहित] [प्रश्न २१ ते ४०]

२१. 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे?
१. कुचीपुडी 
२. ओडिसी
३. भरतनाट्यम
४. कत्थक 
संदर्भ :- स्टाफ सलेक्शन कमिशन, CHSL २०१५ Tier १, परीक्षा प्रश्न क्रमांक १८५. संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा http://sschelp.in/chsl/questions/DEC202015-2/q185.html


२२. खालीलपैकी कोणत्या राज्याने 'भारतीय हत्ती' हा आपला राज्यप्राणी म्हणून घोषित केलेला नाही? 
१. केरळ
२. तामिळनाडू
३. कर्नाटक
४. झारखंड
स्पष्टीकरण :- तमिळनाडूचा राज्य प्राणी निलगिरी तहर आहे. संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_state_animals


२३. 'द मेकिंग ऑफ द महात्मा'चे निर्देशन कोणी केले ?
१. सत्यजित रे
२. मृणाल सेन
३. रिचर्ड एटनबेरो
४. श्याम बेनेगल
स्पष्टीकरण:- या वेबसाईटवरील 'महात्मा मोहनदास करमचंद गांधी' या लेखाच्या * गांधीजींवरील चित्रपट/नाटके * या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक २ पहा. संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.mpscacademy.com/2016/02/mahatma-mohandas-karamchand-gandhi.html


२४. परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा?
अ. व्हॉलीबॉल
ब. बेसबॉल
क. बास्केट बॉल
ड. हैंड बॉल
१. क, अ, ड, ब
२. अ, ड, ब, क
३. ड, क, अ, ब
४. क, ड, अ, ब 


२५. सायना नेहवाल बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळविणारी ती प्रथम भारतीय महिला आहे. 
ब. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
१. फक्त अ
२. फक्त ब
३. दोन्ही अ आणि ब
४. दोन्ही नाहीत
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Point No २१
http://www.mpscacademy.com/2015/05/ca01-05-2015to10-05-2015.html


२६. म्यानमार मध्ये २०१५ च्या राष्ट्रीय निवडणुकीनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील ______ टक्के जागा स्वतःकरताच राखून ठेवल्या आहेत?
१. २०
२. २५
३. ३३ 
४. ५०
स्पष्टीकरण :- म्यानमार संसदेच्या एकूण ४४० जागांपैकी ११० जागा लष्करी अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://en.wikipedia.org/wiki/Assembly_of_the_Union

२७. 'टाइम' मैगझिनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जैकी कॉलिन्स असा केला होता. जैकी कॉलिन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते. ते कोणते?
१. द वर्ल्ड इज फुल ऑफ मैरीड मेन
२. हॉलीवूड वाइव्ज
३. हॉलीवूड हजबंड्स
४. हॉलीवूड डीव्होर्सेस
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक https://en.wikipedia.org/wiki/Jackie_Collins

२८. इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. त्यांच्याबाबत काय खरे नाही?
१. ते डॉक्टर झिवैगो म्हणून स्मरणात राहतात.
२. उत्कृष्ट ब्रिज प्लेयर म्हणून ओळखले जात/
३. त्यांना अल्झेमर्स (स्मृतीभ्रंश) झाला होता.
४. ते मैकेनाज गोल्ड मधील मैकेना होते.
स्पष्टीकरण :- मैकेनाज गोल्ड मधील मैकेनाची भूमिका ग्रेगरी पेक यांनी साकारली होती. मैकेनाज गोल्डमध्ये ओमर शरीफ यांनी 'कोलोरेडो' ही व्यक्तीरेखा साकारली होती. संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://en.wikipedia.org/wiki/Mackenna%27s_Gold


२९. त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्याने उंचीने ४ फुटपेक्षा कमी असलेल्या २१ वर्षावरील लोकांची मोजणी केली व त्यांना ८०० रु. दर महिना आर्थिक साहाय्य देऊ करून इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला?
१. केरळ
२. गुजरात
३. उत्तराखंड
४. पश्चिम बंगाल
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/Adults-less-than-4-feet-tall-in-Uttarakhand-to-get-Rs-800/month/articleshow/48149156.cms

३०. खुशवंत सिंह जेव्हा इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाचे संपादक होते, तेव्हा विकली ने शिखर गाठले होते. त्यांच्या लिखाणात येतात
I. हिस्ट्री ऑफ शिख्स
II. द ट्रेन टू पाकिस्तान
III. द कंपनी ऑफ वुमेन
IV. द सनसेट क्लब
V. सेक्स, स्कॉच एंड स्कॉलरशिप
VI. विथ मैलीस टुवर्डस वन एंड ऑल
VII. नॉट अ नाईस मैन टु गो
VIII. द गुड, द बैड एंड द रीडीक्युलस 
१. III 

२. IV
३. V
४. VI
स्पष्टीकरण :- खुशवंत सिंह यांचे शेवटचे पुस्तक द गुड, द बैड एंड द रीडीक्युलस हे होते. पण तो पर्याय देण्यात आलेला नाही.


३१. ________ मात्र, अश्म युगानंतर लगेचच लोह युगाची सुरुवात झाली, आणि मध्यंतरीच्या काळात ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाही. 
१. उत्तर भारतामध्ये 
२. पश्चिम भारतामध्ये 
३. दक्षिण भारतामध्ये 
४. पूर्व भारतामध्ये 
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा Click Here


३२. 'दोन कोरड्या रोट्या, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी' या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकपदाची जाहिरात दिली?
१. केसरी
२. स्वराज्य
३. वन्दे मातरम
४. काळ
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.newindianexpress.com/columns/Modis-Emergence-Holds-Lessons-for-the-Media/2014/05/11/article2217534.ece


३३. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जशी गरुडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
१. अमर शेख
२. अण्णाभाऊ साठे
३. प्र.के. अत्रे
४. द. ना. गव्हाणकर
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://shreerangngaikwad.blogspot.in/2011/09/blog-post_16.html


३४. खालील विवरणवरून व्यक्ती ओळखा.
अ. यांना गंगाधर गाडगीळासारखे अर्थशास्त्राचे विद्वान 'आधुनिक भारताचे शिल्पकार' मानतात.
ब. दादाभाई नौरोजी व न्या. रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो.
क. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्व जाणले होते.
१. नाना शंकर सेठ
२. भाऊ दाजी लाड
३. भास्कर तर्खडकर
४. दादोबा पांडुरंग


३५. खालील विवरणवरून व्यक्ती ओळखा
अ. ते पक्के महाविदर्भवादी होते
ब. महाविदर्भास  उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती
क. त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे वाटत होते.
१. बैरिस्टर रामराव देशमुख
२. ग. त्र्य. माडखोलकर
३. डॉ. मुकुंदराव जयकर
४. बापुजी अणे 


३६. पुणे येथे ______ उत्सव साजरा केल्यावर दहा दिवसातच पुण्याचे कलेक्टर रैंड व दुसरऱ्या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली.
१. शिवाजी
२. गणपती
३. दुर्गा
४. नवरात्री


३७. तरुण बंगाली 'यंग इटली'शी परिचित होते.______ यांच्या भाषणातून त्यांचा 'यंग इटली'शी परिचय झाला होता.
१. सुरेंद्रनाथ बैनर्जी
२. रवींद्रनाथ टागोर
३. स्वामी विवेकानंद
४. राजा राम मोहन रॉय


३८. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे?
१. डॉ. राधाकृष्णन आयोग
२. कोठारी आयोग
३. हंटर आयोग
४. वरीलपैकी एकही नाही


३९. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा प्राचीन काळी भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले, कारण.
अ. भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे
ब. ग्रीकांची नाणी आकर्षक होती.
क. ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती
ड. भारतीय नाणी अहतमुद्रा पद्धतीचे असत
१. अ आणि ब बरोबर असून क आणि ड चूक आहेत
२. अ आणि ब चूक असून क आणि ड बरोबर आहेत
३. चारही करणे चुकीची आहेत
४. चारही कारणे बरोबर आहेत


४०. 'पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?
१. बैरीस्टर जीना
२. सर सय्यद अहमद
३. मुहम्मद इक्बाल
४. रहमत खान
संदर्भ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://en.wikipedia.org/wiki/Pakistan_Declaration