राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक १ [स्पष्टीकरण व उत्तरासहित] [प्रश्न १ ते २०]

०१. खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही?
१. अरुणाचल प्रदेश
२. हरियाना 
३. त्रिपुरा 
४. राजस्थान
संदर्भ :- पुढील लिंकवर जा https://en.wikipedia.org/wiki/List_of_political_parties_in_India


०२. खालील विधाने विचारात घ्या. यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
अ. १९३५च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गवर्नर जनरलकडे होते. 
ब. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत.
क. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.
१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क
४. अ, ब आणि क 
स्पष्टीकरण:- या वेबसाईटवरील केंद्र राज्य संबंध - कार्यकारी संबंध या लेखाच्या * कायदेविषयक विषयांची विभागणी * या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक ५,६ व ७ पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://www.mpscacademy.com/2015/07/union-state-relations-legislative-relations.html


०३. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात?
१. राज्यसभेचे अध्यक्ष
२. राज्यसभेचे उपाध्यक्ष
३. लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद
४. राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सभासद
स्पष्टीकरण:- या वेबसाईटवरील राज्यसभेचे सभापती व उपसभापती या लेखाच्या * सभापतींचे अधिकार व कार्ये * या मुद्द्यातील पॉइंट पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://www.mpscacademy.com/2015/08/chairman-and-vice-chairman-of-rajysabha.html


०४. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ. घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्यांकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची गरज नसते.
ब. घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही
१. फक्त अ
२. फक्त ब
३. दोन्ही अ आणि ब
४. वरीलपैकी एकही नाही
स्पष्टीकरण : वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
या वेबसाईटवरील घटनादुरुस्ती प्रक्रिया : भाग १ या लेखाच्या * घटनादुरुस्ती प्रक्रिया * या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक २ पहा आणि * घटनादुरुस्तीच्या पद्धती * या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक ३ पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://www.mpscacademy.com/2015/06/amendment-procedure-part1.html


०५. खालीलपैकी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही?
१. नागरी सेवांमध्ये भरती, बढती आणि नियंत्रणाच्या पद्धतीसंबंधी शासनास सल्ला देणे.
२. सनदी सेवकांचे अधिकार आणि हितसंबंधांची काळजी घेणे.
३. सनदी सेवकांच्या अपिलांची सुनावणी करून त्यांच्या तक्रारी दूर करणे.
४. राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यावर देखरेख करणे. 
संदर्भ :- टाटा मैकग्रो हिल, जनरल स्टडीज २०१५ पेपर १, इंडियन पॉलिटी एंड गवर्नन्स, पेज क्रमांक १२८, प्रश्न क्रमांक ५८१ खालील लिंकवर क्लिक करा. Click Here


०६. खालील विधाने विचारात घ्या. त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. अयोग्य हेतू (malafide)च्या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकुम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो.
ब. अन्य विधीनियमाप्रमाणे वटहुकुम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो.
क. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकुम जारी करता येत नाही.
१. अ आणि ब
२. ब आणि क
३. क आणि ड
४. अ, ब आणि क
स्पष्टीकरण:- खालील लिंकवर क्लिक करा 
http://www.yourarticlelibrary.com/indian-constitution/the-nature-of-ordinance-making-power-of-the-president-of-india/5551/
http://www.gktoday.in/various-issues-around-ordinance-making-power-of-president-of-india/


०७. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही?
१. सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन
२. समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य
३. समान नागरी कायदा
४. संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे


०८. खालील विधाने विचारात घ्या. त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच (House of Commons) सदस्य असले पाहिजेत.
ब. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते.
१. फक्त अ
२. फक्त ब
३. दोन्ही अ आणि ब
४. दोन्ही नाहीत.स्पष्टीकरण :इंग्लंडमध्ये १९०२ पर्यंत हाउस ऑफ लॉर्डचा सदस्य सुद्धा पंतप्रधान बनू शकत होता. परंतु त्यानंतर केलेल्या काही दुरुस्तीमुळे, पंतप्रधानाने हाउस ऑफ कॉमन्सचे प्रतिनिधित्व केलेच पाहिजे असे ठरविले गेले. भारतात कोणत्याही सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान बनू शकते. परंतु सहा महिन्याच्या आत त्याला एका सभागृहाचा सदस्य बनावे लागते.


०९. नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा

अ गटब गट
अ. निरंकुश नकाराधिकारI. विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे, अथवा ते परत न पाठवणे
ब. गुणात्मक नकाराधिकारII. कायदेमंडळ यावर सध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते
क. तात्पुरता नकाराधिकार कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते
ड. पॉकेट नकाराधिकार विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे
     अ      ब      क      ड 
१.   I       II     III     IV
२.  IV    III     II       I
३.  IV    III      I       II
४.  III     IV     II      I


१०. खालील विधाने विचारात घ्या: त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
अ. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.
ब. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली.
क. ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपालसंबंधी करण्यात आलेली नाही.१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क
४.अ, ब आणि क
संदर्भ व स्पष्टीकरण साठी आमच्या साईटच्या खालील पेजना भेट द्या
http://www.mpscacademy.com/2015/07/governor-of-state.html
http://www.mpscacademy.com/2016/03/governor-of-state-part-2.html

११. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे?
१. उपपंतप्रधान
२. माजी राष्ट्रपती
३. घटक राज्याचे राज्यपाल
४. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
संदर्भ व स्पष्टीकरण : https://en.wikipedia.org/wiki/Indian_order_of_precedence


१२. पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत. यातील कोण डावखोरे नाहीत?
I . बराक ओबामा 
II . बिल क्लिंटन
III . महात्मा गांधी 
IV . नरेंद्र मोदी
V . बिल गेट्स
VI . टॉम क्रुज
VII . मेरिलिन मोनरो
VIII . अंजलीना जोली
IX . अमिताभ बच्चन
X. सचिन तेंडूलकर 
१. महात्मा गांधी
२. नरेंद्र मोदी
३. अमिताभ बच्चन
४. वरीलपैकी कोणीही नाही


१३. 'इंडियन ओपिनियन' हे वर्तमानपत्र कोठून सुरु करण्यात आले?
१. बंगाल प्रांत
२. ब्रिटन
३. दक्षिण आफ्रिका
४. फ्रान्स
स्पष्टीकरण:- या वेबसाईटवरील 'महात्मा मोहनदास करमचंद गांधी' या लेखाच्या * दक्षिण आफ्रिका * या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक ३ पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.mpscacademy.com/2016/02/mahatma-mohandas-karamchand-gandhi.html


१४. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे?
१. चीन
२. इटली
३. फ्रान्स 
४. स्पेन
संदर्भ व स्पष्टीकरण : https://en.wikipedia.org/wiki/World_Heritage_Site


१५. भारतीय लष्कराच्या मुलभूत रणांगण संरचने (basic  Field  Formation ) बाबत जोड्या लावा
       संघटन           प्रमुखपदी 
अ. बटालियन       I. मेजर जनरल
ब. डिव्हीजन        II. मेजर अथवा कैप्टन
क. प्लाटून          III. कर्नल 
ड. कंपनी             IV. कॅप्टन किंवा लेफ्टनंट

      अ      ब      क      ड 
१.   I       II      III     IV
२.  IV     III     II       I
३.   I       II      IV     III
४.  III      I       IV     II
संदर्भ व स्पष्टीकरण :- https://en.wikipedia.org/wiki/Indian_Army#Basic_Field_Formations


१६. ____________ यांची साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी 'पोलादी पडदा' ही संज्ञा प्रथम वापरली गेली?
१. सर विन्स्टन चर्चिल
२. फ्रैंकलिन रुझवेल्ट
३. थिओडोर रुझवेल्ट
४. मार्शल टिटो
संदर्भ व स्पष्टीकरण :- या वेबसाईटवरील 'सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे - भाग १' या लेखाच्या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक २६ पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  http://www.mpscacademy.com/2015/05/ca-qus-ans.html


१७. फक्त ________ हा खंड वाळवंटाशिवाय आहे?
१. ऑस्ट्रेलिया
२. आफ्रिका
३. उत्तर अमेरिका
४. युरोप
संदर्भ व स्पष्टीकरण :- या वेबसाईटवरील 'सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे - भाग २' या लेखाच्या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक १३ पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.mpscacademy.com/2015/06/gk-qus-ans-part2.html

१८. केंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही?
अ. स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे कि , राज्ये केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात 
ब. केंद्राचे वित्तीय स्त्रोत लवचिक नाहीत
१. फक्त अ
२. फक्त ब
३. दोन्ही अ आणि ब
४. दोन्ही नाहीत


१९. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१. अतिरेकी विरोधी पथकाची (ATS) निर्मिती महाराष्ट्र शासनाद्वारे २००४ साली करण्यात आली.
२. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाची (CRPF) भूमिका अत्यंत महत्वाची आणि प्रमुख अशी असते.३. जलद कृती दल (RAF) ही केंद्रीय राखीव पोलिस दलाची विशेष शाखा आहे.
४. विशेष सुरक्षा गट (SPG) हा विशिष्ट स्थळांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो.
स्पष्टीकरण :- खरेतर ATS ची स्थापना १९९० मध्ये आफताब अहमद खान यांच्याद्वारे केली गेली होती. मात्र काही कारणास्तव ATS जानेवारी १९९३ मध्ये बंद करण्यात आले. ८ जुलै २००४ रोजी परत महाराष्ट्र शासनाकडून याची स्थापना करण्यात आली. सध्या उपलब्ध कागदपत्रात देखील हीच दिनांक आहे. 
विशेष सुरक्षा गट (SPG) हा विशिष्ट लोकांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो.


२०. विवाहित मुलींकरिता त्यांच्या माहेरच्यामार्फत साजरा केला जाणारा 'निन्गोल चाकौबा' हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे?
१. अरुणाचल प्रदेश 
२. मणिपूर
३. लद्दाख
४. सिक्कीम
संदर्भ व स्पष्टीकरण :- या वेबसाईटवरील 'सामान्य ज्ञान जनरल नोट्स' या लेखाच्या मुद्द्यातील पॉइंट क्रमांक १७ पहा. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.mpscacademy.com/2015/05/GK1.html