तिसऱ्या योजनेनंतरच्या तीन वार्षिक योजना

वार्षिक योजना

याला योजनांच्या सुट्टीचा काळ असे म्हणतात. याचा कालावधी १९६६-१९६९ आहे.
तिसर्‍यायोजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य, औद्योगिक क्षेत्रातशिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा अभाव, या कारणांमुळे सरकारला चौथी योजनालगेच सुरू करता आली नाही.
त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रियास्थगित करावी लागली.

४थी योजना पुढे ढकलण्याचा प्रस्ताव तत्कालीन नियोजन आयोगाचेअध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांनी मांडला.

त्यानंतर १९६६ ते १९६९ या काळात तीनवार्षिक योजना राबविल्या गेल्या

या तीन वार्षिक योजनेत हरित क्रांतीवर भर दिला गेला.१९६६ च्या खरीप हंगामात हरीत क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला.

पहिल्या दोन वार्षिक योजनात कृषी क्षेत्राला महत्त्व देण्यात आले तर तिसऱ्या वार्षिक योजनेत उद्योगाला महत्त्व दिले.

१९६६ मध्ये रुपयाचे अवमूल्यन (३६.५%) केले गेले.

एक वर्षीय योजनेची मूळ संकल्पना राजकृष्ण यांची होती.

सरकती योजना – (Rolling Plan) संकल्पना – प्रा. रॅग्नर नर्क्स

परकीय मदत तीन वार्षिक योजनांमध्ये ३६.४% (सर्वाधिक) इतकी मिळाली होती.

पहिली वार्षिक योजना

कालावधी १९६६-१९६७

या काळात ६ जून १९६६ रोजी रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.

या काळात भारतात हरित क्रांतीला  सुरुवात झाली.

अजून एका दुष्काळाला सामोरे जावे लागले. १९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला.

या योजनेचा प्रस्तावित खर्च २०८१ कोटी रु. इतका होता. मात्र प्रत्यक्षात २२२१ कोटी रु. खर्च झाले.

जागतिक हरित क्रांतीचे जनक : डॉ. नॉर्मन बोरलॉग
भारतीय हरित क्रांतीचे जनक : डॉ. एम.एस. स्वामिनाथन
महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक : वसंतराव नाईक

दुसरी वार्षिक योजना

कालावधी : १९६७ -६८
खर्च : २२६४ कोटी रु.

अर्थव्यवस्थेचीपरिस्थिती सुधारण्यात सुरुवात झाली.

कारण हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानामुळेव पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादन वाढू लागले.

या काळात विशेष आहार योजना राबविली गेली

१९६७- ६८ मध्ये अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले.

तिसरी वार्षिक योजना

कालावधी : १९६८ -६९
खर्च : २३५९ कोटी रु.

या काळात सकल आहार योजना राबविली गेलीअन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या.

व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली.चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली.