राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती

GDP (Gross Domestic Product) स्थूल देशांर्तगत उत्पाद

देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत विशिष्ठ कालावधीमध्ये साधारणतः एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाच्या किमतीची एकूण म्हणजे GDP होय.

यामध्ये त्या देशातील भांडवलाने विदेशातील गुंतवणुकीद्वारे उत्पादित वस्तू व सेवांच्या किमतीचाही समावेश करण्यात येतो. (संदर्भ – रमेश सिंह)

वैशिष्ट्ये

– GDP च्या टक्केवारीत होणारी वाढ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर दर्शविते.

– GDP एखाद्या अर्थव्यवस्थेतील अंतर्गत शक्तीचे दर्शन घडविते.

– GDP अर्थव्यवस्थेतील उत्पादकतेच्या संख्यात्मक अंदाजाचे दर्शन घडवतो परंतु गुणात्मक तत्व यामधून दिसून येत नाही.

– GDP या संकल्पनेचा वापर तुलनात्मक अर्थशास्त्रात आर्थिक अभ्यासासाठी केला जातो.

NDP (Net Domestic Product) निव्वळ देशांतर्गत उत्पाद

स्थूल देशांतर्गत उत्पादातून (GDP) स्थिर भांडवलाचा घसारा वजा केल्यास प्राप्त होणारे मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद होय.
NDP = GDP – घसारा

घसारा ही एक संकल्पना आहे. घसारा म्हणजेच देशातील सर्व स्थिर मानवी वस्तूंची पैशाच्या स्वरूपात मोजलेली एका वर्षातील झीज होय.

वैशिष्ट्ये

– प्रत्येक अर्थव्यवस्थेचा NDP हा त्या देशाच्या GDP पेक्षा नेहमीच कमी असतो. कारण घसारा शून्य करणे आजपर्यंत शक्य झाले नाही.

– अर्थव्यवस्थेतील घसाऱ्याचा दर कमी किंवा जास्त करून आर्थिक रणनीतीत निर्माणाच्या उपकरणाप्रमाणे वापर करता येतो.

– २००० ते २००१ मध्ये अवजड वाहनांच्या घसाऱ्याचा दर २०% वरून ४०% करून वाहन विक्री करण्यात यश आले होते.

– ही संकल्पना देशांतर्गत वापरासाठी उपयुक्त आहे. कारण कोणत्याही एका संसाधन मशिनरी इत्यादींच्या घसाऱ्याचा दर वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेत एकाचवेळेस वेगवेगळा असू शकतो.

– त्यामुळे तुलनात्मक आर्थिक अध्ययनात त्याचा वापर करणे कठीण आहे.

– याद्वारे अर्थव्यवस्थांच्या घसाऱ्याची स्थिती व त्याद्वारे उत्पन्नावर पडणाऱ्या विविध परिणामाचा अभ्यास करण्यात येतो.

GNP (Gross National Product)

जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व देशातून बाहेर एलेल्या उत्पन्नाची वजाबाकी केली जाते.

तेव्हा त्या अंतिम मुलास राष्ट्रीय उत्पाद असे म्हणतात.
GNP = GDP + x – m

x > m — GNP > GDP
x < m — GNP < GDP
x = m — GNP = GDP

x = निर्यातीतून प्राप्त उत्पन्न + परदेशातून नागरिकांनी पाठविलेले उत्पन्न

m = आयातीवरील खर्च + परकीय लोकांनी त्यांच्या देशात पाठवलेली रक्कम

GNP हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या बाह्यशक्तीचे दर्शन घडवितो. एखादया देशाचे product आंतरराष्ट्रीय स्तरावर किती गुणवत्तेचे आहेत याचे अनुमान GNP वरून स्पष्ट होते.

GNP हा राष्ट्रीय उत्पन्नाचे संख्यात्मक व गुणात्मक दोन्ही प्रकारचे स्वरूप स्पष्ट करतो.

NNP (Net National Product) निव्वळ राष्ट्रीय उत्पाद

स्थूल राष्ट्रीय उत्पादातून (GNP) घसारा वजा केल्यास प्राप्त होणारे मूल्य म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पाद होय.
NNP = GNP – घसारा

वैशिष्ट्ये

– NNP लाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात

– NNP ला देशातील एकूण लोकसंख्येने भागले असता देशाचे दरडोई उत्पन्न प्राप्त होते.

– कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाचे मोजमाप करण्याचे हे सर्वोत्कृष्ट परिमाण आहे. कारण यामध्ये अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक, गुणात्मक, घसारा व बाह्यशक्ती इत्यादींचे स्वरूप स्पष्ट होते.

– या संकल्पनेचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तुलनात्मक अभ्यासासाठी करण्यात येतो.

Green GNP

१९७३ मध्ये नॉर्थस्वा तेवीण यांनी हरित GNP ची संकल्पना मांडली.

देशातील नैसर्गिक स्रोत तसेच निसर्गाचे संरक्षण राखून, पर्यावरणाची हानी न करता मिळविलेले GNP म्हणजेच हरित GNP होय.

हरित GNP यालाच ‘Health of Nation’ असेही म्हणतात.

राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित इतर संकल्पना

GNH (Gross National Happines) निव्वळ राष्ट्रीय ख़ुशी भुतानचे नरेश जिग्मे वांगचुक (१९७२) यामध्ये

आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती, सामूहिक जीवन वेळेचा सदुपयोग, जीवनस्तर, सुशासन आदींचा वापर केला जातो.

हिंदू वृद्धिदरहा शब्दप्रयोग भारतीय अर्थव्यवस्थेच्या वास्तविक वृद्धीदराशी संबंधित आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिले ३ दशक (१९५०-१९८०) भारताचा वृद्धीदर प्रतिवर्ष ३.५% या दराने वाढत होता म्हणून यास हिंदू वृद्धी दर असे म्हणतात.

हा शब्द प्रयोग पहिल्यांदा प्रो. राजकृष्ण यांनी वापरला.

आधारभूत वर्ष

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप चालू किमतींना केले जाते.

मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचे खरे चित्र स्पष्ट होत नाही. कारण या आकडेवारीवर दोन घटकांचा प्रभाव असतो.

०१. वस्तू व सेवांच्या उत्पादनात झालेली प्रत्यक्ष वाढ.
०२. त्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ.

जर राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ पहिल्या कारणामुळे झालेली असेल तर ही वाढ खऱ्या वृद्धीचे सूचक असते.

मात्र केवळ किंमत वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल तर ती वाढ आभासी असते.

म्हणून किंमत पातळीतील बदलाचा प्रभाव घालवून टाकण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप स्थिर किमतींना केले जाते.

त्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून घेतले जाते.

राष्ट्रीय उत्पन्नाच्या शृंखला

CSO ने या शृंखला २०१० मध्ये अभिजित सेनगुप्ता कार्य दलाच्या शिफारशीवरून जाहीर केली.

पहिली शृंखला = १९४८-४९
दुसरी शृंखला = १९६०-६१
तिसरी शृंखला = १९७०-७१
चौथी शृंखला = १९८१-८२
पाचवी शृंखला = १९९३-९४
सहावी शृंखला = १९९९-२०००
सातवी शृंखला = २००४-०५