चालू घडामोडी १५ आणि १६ ऑगस्ट २०१७

'सी प्लेन'ची चाचणी भारतात होणार
जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे. 

कंपनीने परवानगीसाठी भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाशी संपर्क साधला. या चाचणीत सुरक्षेची चाचपणीही करण्यात येईल. 

पूर्व किनारा किंवा इतर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली.

एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये पहिल्यांदाच स्पाईट जेट या खासगी कंपनीच्या विमान दुरुस्ती सेवेच्या लोकार्पणासाठी ते शहरात आले होते. 

देशातील हवाई वाहतुकीतील ही सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला तोटातून बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 

कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित केली.'भारत-ASEAN युवा परिषद' भोपाळमध्ये आयोजित
14-19 ऑगस्ट 2017 दरम्यान चालणार्‍या 'भारत-ASEAN युवा परिषद' चे आयोजन भोपाळतर्फे करण्यात आले आहे.या परिषदेचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि बाह्य व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केले. 

परिषद असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) च्या 25 व्या वर्धापनदिनाला चिन्हांकित करीत आहे.

ASEAN ही दहा दक्षिण-पूर्व आशियाई राज्यांचा समावेश असलेली एक प्रादेशिक संस्था आहे, जी आंतरसरकारी सहकार्याला प्रोत्साहन देते आणि त्यांच्या सदस्यांमध्ये आर्थिक एकात्मता प्रदान करते. 

8 ऑगस्ट 1967 रोजी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड यांनी याची स्थापना केल्यापासून, याचे सभासदत्व ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार (बर्मा) आणि व्हिएतनाम यांना देण्यात आले.गोरखालँड विवादगोरखालँड विवाद हा दार्जिलिंग आणि कालिंपोंग जिल्ह्यांमध्ये, विशेषत: याचा डोंगराळ भागात, बोलीभाषेवरून नागरिकांमध्ये राजकीय हेतूने झालेला उद्रेक आहे. दार्जिलिंग हा पश्चिम बंगालचा उत्तरेकडील जिल्हा आहे आणि चीन-भारतीय सीमेवरून 441 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

भारतीय घटनेच्या 8 व्या अनुसूचीत नेपाळी भाषेला दार्जिलिंग आणि सिक्कीमची अधिकृत भाषा म्हणून सामील करण्यात आले आहे. या प्रदेशातून भारतीय लष्करात नियुक्त होणार्‍या तुकडीला गोरखा म्हणून ओळखले जाते.

पश्चिम बंगाल राज्य सरकारने संपूर्ण राज्यात शालेय शिक्षणात तीन भाषा शिकविण्यासंबंधी सूत्र प्रस्थापित करण्याचे ठरविले. या अंतर्गत, इयत्ता दहावीपर्यंत बंगाली भाषेला सक्तीचे केले जाणार आहे, मात्र विद्यार्थ्यांना या विषयाची परीक्षा द्यावी लागणार नाही आहे.

पश्चिम बंगाल सरकारच्या या निर्णयामुळे गोरखा जातीय संस्कृती आणि सामाजिक-आर्थिक हितसंबंधांना धोका असल्याचे मानले जात आहे. तसेच पश्चिम बंगालच्या या डोंगराळ प्रदेशात नेपाळी ही अधिकृत भाषा असूनही बंगालीला सक्तीचे केल्या प्रकरणी आंदोलन सुरू झाले. 
शिवाय, सीमावर्ती प्रदेश असल्याने विकासाच्या दृष्टीने हा प्रदेश नेहमीच वादीत असतो.

पश्चिम बंगाल सरकारने आपला वादग्रस्त आदेश मागे घेतला आहे. मात्र 1986-88 साली प्रदेशाला राज्य दर्जा देण्यासंबंधी जुन्या मागणीला पुन्हा एकदा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुढे मांडले आहे. 

या प्रदेशातील संस्कृतीला जपण्यासाठी आणि वैशिष्ट्य अबाधित ठेवण्याकरिता ही मागणी केली जात आहे. या आंदोलनात बिमल गुरुंग यांच्या नेतृत्वात गोरखा जनमुक्ती मोर्चाने (GJM) आघाडी घेतली.रंगमंचावरील अभिनेत्री शोभा सेन यांचे निधन
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेती, रंगमंचावरील जेष्ठ अभिनेत्री शोभा सेन यांचे कोलकातामध्ये वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
सेन यांनी बेथ्यून महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर गणनाट्य संघात प्रवेश केला आणि "नबन्ना" नाटकात प्रमुख भूमिका वठवली. 

नंतर 1943-54 या काळात पीपल्स थिएटर ग्रुपमध्ये 'बॅरिकेड', 'टिनर तलोयार' आणि 'तितूमी' या नाटकात अभिनय केला. तसेच त्यांनी मृणाल सेनच्या 'एक अधुरी कहाणी' आणि 'एक दिन प्रतिदिन', गौतम घोषच्या 'देखा' आणि बासू चटर्जीच्या 'पसंद अपनी अपनी' या चित्रपटात काम केले.धावपटू उसेन बोल्टची निवृत्ती
जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने क्रीडाजगतातून आपली निवृत्ती घेतली आहे. लंडनमधील 2017 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 4x100 मीटर रिले शर्यतीनंतर बोल्टने आपली निवृत्ती जाहीर केली. 
बोल्टने आपल्या कारकि‍र्दीत 8 वेळा ऑलिम्पिक विजेता आणि 11 वेळा विजेता ठरला. त्याने एकूण 23 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे. 

बोल्ट हा 100 मी., 200 मी. आणि 4x100 मी. प्रकारात सलग तीन वेळा ऑलिम्पिक विजेता ठरणारा एकमेव खेळाडू आहे.सर्बियाच्या गोल्डन ग्लॉव्ह महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला 10 पदके
सर्बियातील व्होज्वोदिना येथे खेळल्या गेलेल्या 'गोल्डन ग्लॉव्ह वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2017' स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धानी दोन सुवर्णपदकांसह 10 पदके प्राप्त केलेली आहेत. 

ज्योती (51 किलो) आणि वनलाल्हारीतपूई (60 किलो) यांनी सुवर्ण जिंकले. अंजली (48 किलो), साक्षी (54 किलो), अश्था (69 किलो) आणि अनुपमा (81 किलो) यांनी रौप्य मिळवले. तसेच चार कांस्य पदके भारताला मिळाली.श्रीलंका-भारत कसोटी मालिकेत भारताने 3-0 असा विजय मिळवला
श्रीलंकेत खेळण्यात आलेल्या श्रीलंका-भारत कसोटी क्रिकेट मालिकेत भारताने श्रीलंकेवर 3-0 असा विजय मिळवला

भारतीय फलंदाज शिखर धवनला मालिकावीर आणि हार्दिक पंड्याला सामनावीर घोषित केले गेले.‘इंडिया डे’ महोत्सव जोहान्सबर्गमध्ये आयोजित
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ता दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधील झू लेक रिजॉर्ट येथे 13-14 ऑगस्ट 2017 रोजी ‘इंडिया डे’ महोत्सव आयोजित करण्यात आला.

भारतीय कलेचे प्रदर्शन घडविणारा ‘इंडिया डे’ महोत्सव इंडिया क्लब द्वारा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी परदेशी आणि दक्षिण आफ्रिकन-भारतीय कलाकारांद्वारे संगीत आणि नृत्य कलेचे प्रदर्शन करण्यात आले.नोव्हेंबरमध्ये भारत-चीनचा प्रथम IMMSAREX सागरी सराव आयोजित
हिंद महासागराच्या बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर 2017 मध्ये भारतीय नौदल आणि चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही यांच्यात ‘IMMSAREX’ या सागरी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS) येथे अध्यक्षपदावर असलेल्या बांग्लादेशच्या अध्यक्षतेखाली हा प्रथम आंतरराष्ट्रीय सागरी शोध व बचाव सराव (IMMSAREX) आयोजित करण्यात आला आहे. 

IONS चे सदस्य आणि निरीक्षक देशांची जहाजे आणि विमाने यात सहभाग घेणार आहेत.

IONS हा हिंद महासागराची सीमा असलेल्या देशांचे एक प्रादेशिक मंच आहे, ज्यामध्ये सदस्य देशांचे नौसेनाप्रमुख आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात. 

याची स्थापना फेब्रुवारी 2008 मध्ये झाली. याचे सध्या 23 सदस्य आणि 9 निरीक्षक आहेत. 2014 साली स्वीकारलेल्या ठरावानुसार IMMSAREX आयोजित केले गेले आहे.2021 सालापर्यंत लंडनची जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ घड्याळ बंद राहणार
लंडन (इंग्लंड, ब्रिटन) येथील 19 व्या शतकातील जगप्रसिद्ध क्लॉक टॉवर ‘बिग बेन’ हे घड्याळाच्या आवश्यक दुरुस्ती कार्यासाठी पुढील आठवड्यापासून चार वर्षांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

‘बिग बेन’ला वेस्टमिन्स्टर राजवाड्याच्या ‘एलिझाबेथ टॉवर’ चे नियमित ठोके म्हणून अधिकृतपणे ओळखले जाते. ही ‘ग्रेट बेल’ 157 वर्षांपासून दर तासाला ठोके देते. येथील घंटी 13.7 टन वजनी आहे. टॉवरची उंची 96 मीटर इतकी आहे. 

1859 साली हे टॉवर लोकांसाठी उघडण्यात आले. याची स्थापत्यकला शैली ही गॉथिक रिव्हायवल आर्किटेक्चरची आहे. यापूर्वी 1983 आणि 1985 साली प्रमुख पुनर्रचनात्मक कार्ये केली गेली होती.