चालू घडामोडी २३ व २४ डिसेंबर २०१७

संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर 
सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनवाढी संबंधीचे विधेयक 21 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यामुळे न्यायाधीशांच्या वेतनात सुमारे अडीचपट वाढ होणार आहे.

कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (वेतन आणि सेवा) संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर केले.

या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर न्यायाधीशांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या वेतनाएवढी वाढ होणार आहे. न्यायाधीशांची वेतनवाढ जानेवारी 2017 पासून लागू होणार आहे. त्याशिवाय घरभाडे भत्ता एक जुलैपासून तर वाहतूक भत्ता 22 सप्टेंबर 2017 पासून लागू होईल. या कायद्यानुसार, सेवानिवृत्त न्यायाधीशांनाही वेतनवाढ मिळणार आहे.नौका ‘ICGS सुजय’ सेवेत दाखल
भारतीय तटरक्षक दलाची गस्ती नौका ‘ICGS सुजय’ भारतीय सेवेत दाखल करण्यात आली आहे.

किनाऱ्यापासून 105 मीटरपर्यंतच्या गस्तीसाठीच्या 6 नौकांच्या मालिकेतली ही सहावी नौका आहे. ही 2350 टन वजनी नौका 23 नॉटिकल मैल किमान गतीने मार्गक्रम करते. अत्याधुनिक साधनांनी सज्ज अशी स्वदेशी बनावटीची आहे. 

या नौकेद्वारे मुख्यत: पूर्व समुद्री किनारा तसेच ओडिशा व पश्चिम बंगालच्या सागरी राज्यांना सुरक्षा देण्यात येईल.

‘ICGS सुजय’ ओडिशाच्या पारादीपमध्ये कमांडर तटरक्षक क्षेत्र (ईशान्य) च्या संचालन व प्रशासनाखाली आहे. ही नौका गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारा तयार केली गेली. यावर 30MM CRM 91 नेव्हल गन, एकीकृत ब्रिज प्रणाली, एकीकृत यंत्र नियंत्रण प्रणाली (IMCS), विद्युत व्यवस्थापन प्रणाली (PMS) तसेच उच्च-शक्ती अग्निशमन प्रणाली बसविण्यात आली आहे.ग्रामीण जनतेच्या आर्थिक समावेशनासाठी ‘दर्पण’ प्रकल्पाचा शुभारंभ
21 डिसेंबर 2017 रोजी ‘डिजिटल ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिस फॉर ए न्यू इंडिया (DARPAN/दर्पण)’ या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

‘दर्पण’ प्रकल्प बँकेची सुविधा नसलेल्या ग्रामीण लोकसंख्येच्या वित्तीय समावेशनासाठी सुरू केला गेला आहे. प्रकल्पांतर्गत, ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी यासाठी टपाल कार्यालयाच्या शाखा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येणार आहेत. 

प्रकल्पासाठी 1400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत टपाल कार्यालयाच्या 43,171 शाखा ‘दर्पण’ उपक्रमांतर्गत समाविष्ट झाल्या आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘नवीन ग्राहक संरक्षण विधेयक’ मंजूर केले
केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्राहकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी प्राधिकरण गठित करण्याकरिता ‘नवीन ग्राहक संरक्षण विधेयक-2017’ मंजूर केला आहे. जुन्या ‘ग्राहक संरक्षण अधिनियम-1986’ च्या जागी हे विधेयक आणले गेले आहे.

विधेयकामध्ये कंपन्यांद्वारे भेसळ व भ्रामक जाहिरातींच्या बाबतीत दंडात्मक कारवाई व तुरुंगवासाची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. सोबतच यामध्ये भ्रामक जाहिरातींना हाताळण्यासाठीही तरतूद आहे, त्यानुसार जर कोणी नामांकित व्यक्ती भ्रम उत्पन्न करणार्‍या जाहिरात करत असेल तर त्यावर प्रतिबंध लावण्यात येईल.ममंग दाय, रमेश कुंतल मेघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्यकार ममंग दाय आणि रमेश कुंतल मेघ यांना यावर्षीचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार-2017’ जाहीर झाला आहे.

ममंग दाय यांना ‘द ब्लॅक हिल’ या कादंबरीला ‘इंग्रजी’ गटातला तर रमेश मेघ यांना ‘विश्व मिथक सरीत सागर’ या टीकात्मक साहित्याला ‘हिंदी’ गटातला पुरस्कार मिळाला.

अन्य काही विजेते - महाराष्ट्राच्या श्रीकांत देशमुख (मराठी कवितासंग्रह - ‘बोलावे ते आम्ही..’), अनुवादक सुजाता देशमुख (मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार - ‘गौहर जान म्हणतात मला !’), जगदीश लाछानी (सिंधी निबंधमाला) आणि रानेन तोईजंबा (मणिपुरी, नाटक)


साहित्य अकादमी पुरस्कार हा 22 अनुसूचित भाषांसह इंग्रजी आणि राजस्थानी अश्या 24 प्रमुख भारतीय भाषांमध्ये साहित्यात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

पुरस्कार 24 भाषांमध्ये सात कादंबर्‍या, प्रत्येकी पाच कवितासंग्रह आणि लघुकथा, टीकात्मक साहित्याची पाच कामे, एक नाटक आणि निबंधमाला पुस्तके यांना दिला गेला.
NCC चे महानिदेशक - लेफ्टनंट जनरल बी. एस. सहरावत
लेफ्टनंट जनरल बी. एस. सहरावत यांची ‘राष्ट्रीय विद्यार्थी सेना’ (National Cadet Corps -NCC) च्या महानिदेशक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी विनोद वशिष्ठ यांच्या जागी पदभार सांभाळला.

लेफ्टनंट जनरल सहरावत राष्‍ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (खडकवासला) आणि भारतीय सैन्‍य प्रबोधिनी (देहरादून) चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना डिसेंबर 1980 मध्ये कुमाऊं रेजमेंटच्या 13 व्या बटालियन (रेजांग ला) मध्ये नियुक्त केले गेले होते. 

त्यांना 2008 साली बिहारमध्ये कोसी नदीला आलेल्या पुराच्या घटनेदरम्यान त्यांच्या योगदानासाठी सेना पदक मिळाले.

राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) ही देशातील तरुणांना शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्व यामध्ये प्रोत्साहन देणारी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे. याची 1948 साली स्थापना करण्यात आली व याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे.UNGA ने जेरूसलेमबाबतचा अमेरिकेचा निर्णय नाकारला
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी मानण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध मतदान केले आहे.

भारत सहित 128 देशांनी अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध आपले मत दर्शविले. तर 9 देशांनी निर्णयाला सहमती दिली आणि 35 देशांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले.

जेरुसलेम राजधानीचे ठिकाण करण्यावरून इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घकाळापासून विवाद सुरू आहेत. दोनही देश जेरुसलेम हा आपल्या देशाचा भाग असून आपली राजधानी असल्याचा दावा वारंवार करत आहेत. 

यहुदी धर्म, इस्लाम व ख्रिश्चन धर्माचे मुख्य ठिकाण म्हणून जेरुसलेम शहराची ओळख असल्याने हा आंतरराष्ट्रीय विवादाचा मुद्दा बनत आहे.राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर 
भारतात गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन यांच्या स्मृतीत दरवर्षी 22 डिसेंबरला ‘राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा करतात.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात श्रीनिवास रामानुजम यांना श्रद्धांजली देत वर्ष 2012 ला ‘राष्ट्रीय गणित वर्ष’ म्हणून घोषित केले होते. सोबतच गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जन्मतारीख 22 डिसेंबरला ‘राष्ट्रीय गणित दिवस’ देखील घोषित केले गेले.

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी मद्रासपासून 400 किलोमीटर दूर इरोड गावात झाला होता. त्यांचे प्रारंभीक शिक्षण कुम्भकोणमला झाले.

त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यान त्यांच्या जी. एस. कार यांचे गणित विषयावरील पुस्तक वाचण्यात आले आणि तेव्हापासून गणित विषयात त्यांची आवड निर्माण झाली.

ब्रिटनचे प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. हार्डी यांनी रामानुजन यांची प्रतिभा ओळखून त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश करवून दिला आणि तेथे त्या दोघांनी गणिताला नवे आयाम दिले. त्यांचे 6 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले.

श्रीनिवास रामानुजन यांनी 5000 हून अधिक प्रमेयांची (थ्योरम) निर्मिती केली होती, ज्यांना अनेक दशकानंतरही सोडवले गेले नाही. गणितातील विश्लेषण, संख्या सिद्धांत, इंफिनाइट सिरिज आणि सतत अपूर्णांक यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रामानुजन रॉयल सोसायटीचे सर्वांत तरुण फेलो होते आणि भारतातील फक्त दुसरे सदस्य होते आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणून ते पहिले भारतीय सदस्य होते.