कर्नाटकात ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना’ सुरू होणार 
कर्नाटक राज्‍य शासन राज्यात ‘मुख्‍यमंत्री अनिला भाग्‍य योजना (MMABY)’ राबविण्याच्या मार्गावर आहे.


‘मुख्‍यमंत्री अनिला भाग्‍य योजना (MMABY)’ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत LPG जोडणी देण्याकरिता सुरू करण्यात येत आहे. मात्र या योजनेत भारत सरकारच्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाची कोणतीही भूमिका नाही.



रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार
रेल्वेच्या नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाला आहे.

करारांतर्गत बी. आर. सिंह रुग्णालय, पूर्व रेल्वे, पेरंबूर रेल्वे रुग्णालय, दक्षिण रेल्वे, उत्तर रेल्वेचे केंद्रीय रुग्णालय, पश्चिम रेल्वेचे जे. आर. रुग्णालय आणि उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेचे केंद्रीय रुग्णालय या ठिकाणी आयुष सुविधा उभारली जाणार.

वर्तमानात भारतीय रेल्वे स्थापना संचालनालयाच्या कार्मिक कल्याण कोषमधून १२६ होमिओपॅथी आणि ४० आयुर्वेदिक वैद्यकीय केंद्र चालवीत आहे.

आयुष मंत्रालय ही आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, सोवा-रिग्पा (पारंपारिक तिबेटी औषध) आणि इतर स्वदेशी औषध प्रणाली इत्यादी क्षेत्रांमध्ये विकास, शिक्षण आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने भारतामधील एक सरकारी संस्था आहे. 

मार्च १९९५ मध्ये भारतीय औषधी व होमिओपॅथी प्रणाली म्हणून हे विभाग तयार करण्यात आले. ९ नोव्हेंबर २०१४ पासून याला AYUSH मंत्रालय म्हणून ओळखले जाऊ लागले.



कथकली नर्तक माधव वासुदेवन नायर यांचे निधन
कथकली नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध माधव वासुदेवन नायर यांचे एका कार्यक्रमात कलाप्रदर्शनादरम्यान मंचावरच कोसळून निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

माधव वासुदेवन नायर हे कथकली नृत्यप्रकारासाठी ओळखले जात होते. ते दक्षिण केरळच्या विशिष्ट शैलीचे कापलिंगट्टू शाळेचे अनुयायी होते. ते पद्मभूषण सन्मान विजेते होते.


ट्रॅपिस्ट १ ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे सात ग्रह 
पृथ्वीपासून ४० प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ट्रॅपिस्ट १ या लाल ताऱ्याभोवती एकूण सात पृथ्वीसदृश ग्रह सापडले असून तेथे जीवसृष्टीस आवश्यक असलेला पाणी हा घटक असण्याची शक्यता आहे.

ट्रॅपिस्ट १ ग्रहमाला गेल्या वर्षी २०१६ मध्ये सापडली असून त्याचे आणखी संशोधन करण्यात आले असता तेथे पृथ्वीसारखे सात ग्रह सापडले आहेत. तसेच ते पृथ्वीइतक्या आकाराचे असून त्यांची नावे ट्रॅपिस्ट १ बी, सी,डी इ, एफ व एच अशी आहेत.

युरोपियन सदर्न ऑब्झव्‍‌र्हेटरीत स्वित्र्झलडच्या बर्न विद्यापीठाचे सिमॉन ग्रीम यांनी संगणकीय प्रारूपांच्या मदतीने हे संशोधन केले असून त्यात ग्रहांच्या घनताही ठरवल्या आहेत. 

तर ट्रॅपीस्ट १ बी व सी यांचा गाभा खडकाळ असून त्यांचे वातावरण पृथ्वीपेक्षा दाट आहे. ट्रॅपिस्ट १ डी हा हलका असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तीस टक्के आहे. ट्रॅपिस्ट १ इ हा पृथ्वीपेक्षा जास्त घनता असलेला ग्रह असून त्याचा गाभा लोहाचा असावा. ट्रॅपिस्ट १ इ हा इतर ग्रहांपेक्षा जास्त खडकाळ आहे. 

ट्रॅपिस्ट 1 एफ, जी, एच हे ताऱ्यापासून दूर असल्याने तेथे बर्फ असू शकतो . जास्त घनता असलेले पण ताऱ्याच्या जवळ नसलेले ग्रह यात आहेत, असे झुरिच विद्यापीठाच्या कॅरोलिन डॉर्न यांनी सांगितले आहे. 



देशाच्या इतिहासात प्रथमच अवकाशस्थानकात बॅडमिंटनचा सामना खेळला गेला
अवकाशवीरांनी देशाच्या इतिहासात प्रथमच अवकाशस्थानकात बॅडमिंटनचा सामना खेळला तर रशियाच्या रॉसकॉसमॉस या अवकाश संशोधन संस्थेने त्याचा व्हिडिओ जारी केला असून त्यात रशिया, अमेरिका, जपानचे अवकाशवीर सहभागी होते. तसेच अवकाशात बॅडमिंटनचा सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. 

रशियाचे अवकाशवीर अलेक्झांडर मिसुरकिन व अँटन शाकापलेरोव विरुद्ध अमेरिकेचा मार्क व्हँड हेइ व जपानचा नोरिशिंगे कनाई यांच्यात हा सामना झाल्याचे रॉसकॉसमॉसने म्हटले आहे.



‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण 
अमेरिकेच्या स्पेसएक्स SpaceX कंपनीने जगातील सर्वाधिक ताकदीच्या ‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 

फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथील नासाच्या ऐतिहासिक प्रक्षेपण केंद्रातून ‘फाल्कन’ अवकाशात पाठवले गेले आहे. तसेच या रॉकेटसोबत एलन मस्कची स्पोर्ट्स कारही अवकाशात पाठवण्यात आली आहे.

‘फाल्कन’ ६३.८ टन वजनांचे रॉकेट असून, हे वजन जवळपास दोन अंतराळ यानांच्या बरोबरीचे आहे. तसेच सेच १३० फूट लांबीच्या या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन लावण्यात आले आहेत.

तर हे जगातील सर्वाधिक ताकदीचे हे रॉकेट टेस्लातील अब्जाधीश एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने तयार केले आहे