नागरी सेवा दिन २१ एप्रिल 
दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिन’ पाळला जातो. यावर्षी नवी दिल्लीत १२ व्या नागरी सेवा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘एम्यूलेटिंग एक्सलेंस-टेकअवेज फॉर रिप्लिकेशन’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

१९४७ साली २१ एप्रिलला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेट्काफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते. या दिनाच्या स्मृतीत २००६ साली नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमापासून नागरी सेवा दिन नियमितपणे साजरा होत आहे.



हिपॅटायटीस आजाराला प्रतिबंध आणि नियंत्रित करण्यासाठी उपक्रम 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विषाणूजन्य हिपॅटायटीस आजाराच्या संक्रमणाला प्रतिबंध आणि नियंत्रित करण्यासाठी एक एकात्मिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हिपॅटायटीस म्हणजे संसर्गामुळे यकृतावर येणारी सूज आहे.

या उपक्रमासाठी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी ५१७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

योजनेनुसार, आरोग्य मंत्रालयाने २६ मोठ्या आणि ४ लहान राज्यांमध्ये कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य NHM अंतर्गत राज्य समन्वय खाते स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आजाराच्या निदानासाठी ५० राज्य प्रयोगशाळांची स्थापना करण्यात येणार. पुढील तीन वर्षांच्या कालावधीत १०० उपचार आणि ६६५ परीक्षण केंद्रे उघडण्याचा उद्देश्य ठेवण्यात आला आहे.


बर्मिंगहॅम राष्ट्रकुल २०२२ खेळांमधून नेमबाजी खेळाला वगळण्यात आले 
२०२२ साली बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी क्रिडा प्रकाराला वगळण्याचा निर्णय आयोजक समितीने घेतला आहे.

राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. १९३० सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. स्पर्धेला १९५४ साली ब्रिटिश एम्पायर खेळ, त्यानंतर ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ आणि १९७० सालापासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ आणि १९७८ साली राष्ट्रकुल खेळ हे नाव दिले गेले. राष्ट्रकुल खेळ महासंघ (CGF) याचे लंडनमध्ये मुख्यालय आहे.



मुखाम्मेदकलाय अबीलगाजीयेव किर्गिझस्तानचे नवे पंतप्रधान 
किर्गिझस्तानच्या संसदेने मुखाम्मेदकलाय अबीलगाजीयेव यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.

सापर इसाकोव्ह यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने विश्वास मत गमावल्यानंतर अबीलगाजीयेव यांची निवड करण्यात आली आहे.

किर्गिझस्तान सिल्क रोडलगत असलेला एक मध्य आशियाई देश आहे. या देशाची राजधानी बिश्केक शहर असून राष्ट्रीय चलन किर्गिझस्तानी सोम हे आहे. या देशात किर्गिझ, रशियन या अधिकृत भाषा आहेत.



मिग्वेल डियाज-कॅनल क्यूबाचे नवीन राष्ट्रपती 
क्यूबामध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ५७ वर्षीय मिग्वेल डियाज-कॅनल यांचा विजय झाला असून त्यांची औपचारिकपणे देशाच्या राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली आहे.

१९५९ सालच्या क्रांतीनंतर पहिल्यांदाच शेवटचे नाव कास्त्रो नसलेल्या व्यक्तीसाठी मतदान केले गेले आहे. क्यूबाचे माजी राष्ट्रपती राऊल कास्त्रो यांनी राष्ट्रपती पदाचा त्याग केल्यानंतर प्रथमच या पदासाठी ११ मार्च २०१८ ला निवडणूक आयोजित केली गेली होती.

८६ वर्षीय कास्त्रो यांनी २००६ साली फिदेल कास्त्रो यांच्या तब्येतीमुळे त्यांच्या जागी देशाचे राष्ट्रपती पद सांभाळले. कायदेशीररित्या त्यांनी २००८ साली फिदेल कास्त्रो यांनी पद सोडल्यानंतर ते कायदेशीरपणे राष्ट्रपती पदावर आलेत आणि २०१३ साली पुन्हा एकदा निवडून आलेत. जवळपास ६० वर्षापासून क्यूबामध्ये कास्त्रो बंधू सत्तामध्ये होते.

क्यूबा कॅरेबियन समुद्रात स्थित एक बेटराष्ट्र आहे. हवाना देशाची राजधानी आहे आणि क्युबियन पेसो हे राष्ट्रीय चलन आहे.