०१. शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) या हानिकारक पदार्थाचे मोठे प्रमाण आढळल्यामुळे देशातील विविध राज्यसरकारने मॅगी नूडल्सवर बंदी घातली आहे. फ्युचर ग्रुप’ने मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘फ्युचर ग्रुप’च्या अधिपत्याखाली असलेल्या देशभरातील ‘बिग बाजार’, ‘निलगिरी सुपरमार्केट’ आणि ‘इजी-डे’ या सर्व रिटेल मॉल्समधून मॅगी हद्दपार होणार आहे.


०२. देशात पर्यटनाचे महत्त्व वाढवण्यासाठी ११०० बेटे व ३०० दीपगृहे तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव आहे. 


०३. चीनच्या हुबेई प्रांतात यांगत्से या नदीत वादळाने ‘द ईस्टर्न स्टार शिप’ हे क्रूझ बोट बुडून ४५० जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.पूर्व चीनच्या नानजिंग येथून हे जहाज चोक्विंगकडे जात होते. प्रवास चालू झाल्यानंतर काही तासातच वादळ आले व एक ते दोन मिनिटातच जहाज जिलानी येथे बुडाले. 


०४. यांगत्से नदी ६३०० कि.मी. लांब असून ती आशियातील सर्वात मोठी नदी आहे. हे क्रूझ जहाज ७६ मीटर लांब असून त्यात ४०६ प्रवासी व ४७ कर्मचारी होते.


०५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे (शतकोत्तर रौप्य महोत्सवी) जयंती वर्ष सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर झाले. त्याचेही हे शताब्दी वर्ष आहे.


०६. भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) नुकतेच बांगलादेश मध्ये विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेशमधील एका कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत “एलआयसी बांगलादेश लिमिटेड‘ या नावाने एलआयसीचे काम सुरू होईल. सध्या भारताव्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये एलआयसीचे काम सुरू आहे.


०७. “नेट न्युट्रॅलिटी‘बाबत ए.के.भार्गव यांच्या  अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 


०८. मानसरोवर- चांदपोल या ९.६ किलोमीटर मेट्रो मार्गाचे जयपूरची मेट्रो

रेल्वेसेवेचे उद्‌घाटन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावर नऊ स्थानके आहेत. मानसरोवर, न्यू आतीश मार्केट, विवेक विहार, श्याेमनगर, रामनगर, सिव्हिल लाइन्स, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅंप आणि चांदपोल अशी या स्थानकांची नावे आहेत.


०९. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे फेज-१ ए आणि फेज-२ बी असे दोन भाग करण्यात आले होते. त्यात मानसरोवर- चांदपोल हा टप्पा पूर्ण झाला असून, आता चांदपोल- बडी चौपाड या फेज-१ बी टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. 


१०. अवघ्या चार वर्षांत पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यासाठी सुमारे २०२३ कोटी रुपये खर्च झाला आहे. या मार्गावरील चांदपोल हे पूर्ण भूमिगत स्थानक आहे. मार्गाच्या रक्षणासाठी ७८९ पोलिस तैनात केले जातील. एकूण कर्मचार्यांमध्ये तीस टक्के महिला कर्मचारी, हेही जयपूर मेट्रोचे वैशिष्ट्य आहे.


११. रसायनशास्त्राचे नोबेल विजेते आयर्विन ए. रोझ, यांचे निधन ३ जून २०१५ रोजी झाले. रोझ यांचा जन्म १६ जुलै १९२६ रोजी ब्रुकलिन येथे झाला. १९४८ मध्ये ते शिकागो विद्यापीठातून पदवीधर झाले. नंतर १९५२ मध्ये जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट झाले. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते सदस्य होते.


१२. आयर्विन ए. रोझ यांना २००४ मध्ये डॉ. सिचॅनहॉवर व डॉ. हेर्शको यांच्यासमवेत रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले होते. त्यांचे संशोधन हे पेशी जुनी व निकामी झालेली प्रथिने शोधून त्यांचे रूपांतर नवीन प्रथिनांत कसे करतात याविषयी होते.


१३. १९७५ च्या सुमारास वैज्ञानिकांनी एक छोटे प्रथिन शोधून काढले, ते अनेक सजीवांच्या उतींमध्ये सापडत होते म्हणून त्याला उबिक्विटिन असे संबोधले जात होते, पण त्या प्रथिनाचे कार्य कुणाला माहिती नव्हते. नंतर त्यांनी हेश्र्को व सिचॅनहॉवर यांच्या मदतीने संशोधन करून पेशींमधील प्रथिने कशी तुटतात हे शोधले. या संशोधनातून पुढे मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगावर ‘व्हेलकेड’ हे औषध तयार करण्यात आले.


१४. Environmental Democracy Index (EDI) पहिल्या आवृत्ती नुसार भारत २४ व्या क्रमांकावर आहे. Washington-based World Resources Institute (WRI) and Access Initiative या संस्था द्वारे निर्देशांक जाहीर करण्यात आला.पहिले दहा देश पुढील प्रमाणे : लिथुआनिया, लाटव्हिया, रशिया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम, हंगेरी, बल्गेरिया, पनामा आणि कोलंबिया.


१५. भारतीय हवाई दलाचे मिराज 2000 हे लढाऊ विमान 21 may यमुना मथुरेजवळ एक्‍स्प्रेस-वेवर यशस्वीरित्या उतरले. कोणत्याही कारणामुळे विमानतळ वापरण्यायोग्य स्थितीत नसेल तर लढाऊ विमान उतरवण्यासाठी जवळचा मोठा रस्ता हा एक पर्याय असू शकतो असेही वायुदलाने सांगितले.


१६. सध्या जर्मनी, पोलंड, स्वीडन, दक्षिण कोरिया, तैवान, फिनलंड, स्विर्त्झलंड, सिंगापूर आणि पाकिस्तानमध्ये विमानतळ बंद पडल्यास लढाऊ विमान उतवण्यासाठी मोठ्या रस्त्यांचा पर्याय प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे.


१८. आय.एन.एस. करवत्ती (INS Kavaratti) भारतीय नौदलात दाखल. ही पाणबुडीविरोधी युद्धनौका प्रोजेक्ट २८ अंतर्गत बनवण्यात आली.  याच प्रोजेक्ट मधील आय.एन.एस. कामोर्ता हि पहिली युद्धनौका होती जी २०१४ मध्ये सेवेत आली. 


१९. हंगेरीचे लेखक लाझ्लो क्राझ्नाहोर्काय (Laszlo Krasznahorkai) यांना २०१५ चा मॅन बुकर पुरस्कार प्रदान. 


२०. International Association of Athletics Federations (IAAF) तर्फे आयोजित शांघाय, चीन येथे झालेल्या Diamond League series मध्ये विकास गौडास कांस्य पदक. विकास ने २०१४ कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते तसेच एशियन गेम्स मध्ये रौप्य पदक मिळवले


२१. दोहा येथे सुरू असलेल्या सिनिअर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या नरसिंग पंचम यादव याने पुरुषांच्या ७४ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे महिलांच्या फ्री स्टाईल ४८ किलो वजन गटात भारताच्या विनेश हिने अंतिम फेरीत धडक मारली.


२२. सिरियाक जोसेफ यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (National Human Rights Commission NHRC) च्या अध्यक्षपदी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तर्फे निवड करण्यात आली.


२३. सहा राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नेमणूक 
  झारखंड – द्रौपदी मुर्मू 
  मणिपूर – सईद अहमद 
  अरुणाचल प्रदेश – जे.पी. राजखोवा 
  मिझोरम – लेफ्ट.जन. (निवृत्त) निर्भय शर्मा 
  त्रिपुरा – तथागता रॉय 
  मेघालय – व्ही. शन्मुगंथन 


२४. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या जगभरातील युजर्ससाठी २९ जुलै पासून “विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. 


२५. हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या ८८ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हवामान विभागाने यापूर्वी एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाज यंदा ९३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्यानंतर हवामानात झालेले बदल आणि त्याचा नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. सर्वसाधारणपणे ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर दुष्काळी स्थिती समजण्यात येते. ८८ टक्क्यांच्या सुधारित अंदाजामध्ये हवामान विभागाने चार टक्क्यांची वाढ किंवा घट होण्याची शक्यताही गृहीत धरली आहे. यंदा मराठवाडा, खान्देश तसेच विदर्भातील काही भागांत या महिन्याअखेर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.