०१. विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी ५० लाखांची लाच देताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार ए. रेवनाथ रेड्डी यांना अटक केली. तेलंगणा विधान परिषदेच्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवारास मतदान करावे यासाठी रेड्डी यांनी अँगो-इंडियन आमदार एल्विस स्टिफन्सन यांना लाच देऊ केली होती.


०२. २७ व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा बार्सिलोना संघाने जिंकली.कँप नोऊमध्ये झालेल्या अंतिम लढतीत अॅ थ्लेटिक बिल्बाओचा ३-१ असा पराभव करत बार्सिलोनाने २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली. बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक्स हे आहेत. 


०३. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचा प्रसिद्ध झालेला अहवालानुसार भारत देशातले किती १९ कोटी लोक उपाशी आहेत.


०४. बेकायदा बाळगलेले प्राणी, पक्षी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अमानवी वागणूक मिळू नये, त्यांची व्यवस्थित सांभाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे.ही याचिका ‘पेट लव्हर्स असोसिएशन’ या संस्थेने मांडली होती. न्या. ए. के. सिकरी आणि न्या. यू. यू. ललित यांच्या सुट्टीतील खंडपीठापुढे ही याचिका सादर केली होती.


०५. संस्थेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी अन्य याचिकाकर्त्यांसह संस्थेची बाजू मांडली. संस्थेने गुजरात हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या ‘पक्ष्यांनाही मूलभूत हक्क असतात,’ या स्वरूपाच्या निकालाच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. 


०६. लष्करातील निवृत्त जवान, कर्मचारी यांच्यासाठी समान श्रेणी, समान पेन्शन’ (वन रँक, वन पेन्शन) ही योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. 


०७. भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या सुमारे २० लाख कर्मचाऱ्यांची ही दीर्घ काळची मागणी आहे. समान श्रेणीवर असताना व समान सेवाकालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समान पेन्शन मिळावे. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या तारखेचा त्यात विचार करू नये, अशी निवृत्त कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.


०८. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे फिलिस्तीन, जॉर्डन आणि इस्त्राइल या देशांचे दौरे करणार आहेत. इस्त्राइलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. २००३ मध्ये इस्त्राइलचे तत्कालीन पंतप्रधान एरिअल शेरॉन भारत दौऱ्यावर आले होते. भारताच्या दौऱ्यावर येणारे पहिले इस्त्राइली पंतप्रधान होते. 


०९. चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान असलेले ऑटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) विकसित करण्यात चीनमधील शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्सिंघुआ विद्यापीठ आणि पूर्व चीनच्या झेजिअँग प्रांतातील त्झेक्वान टेक्नॉलॉजी या दोन संस्थांतील शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्झेक्वान टेक्नॉलॉजी ही संस्था आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते.


१०. चिली, कोलंबिया यांसारख्या काही देशांत एटीएममधून पैसे काढण्यासाठी बोटाचे ठसे द्यावे लागतात. ते जुळले तरच पैसे काढता येतात. अमेरिकेसारखे अनेक देश गुप्तता, तसेच अधिक खर्चाच्या कारणामु‍ळे हे तंत्रज्ञान वापरत नाहीत. 


११. ‘काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न व संपत्ती) विधेयक २०१५’ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली असून, १ एप्रिल २०१६ पासून हा कायदा अंमलात येणार आहे. अघोषित परकीय उत्पन्न आणि संपत्तीच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी आणलेले हे विधेयक १३ मे रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यापूर्वी दोन दिवस लोकसभेने हे विधेयक संमत केले होते.


१२. माहिती न देणाऱ्यास कमीत कमी ५० हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल. कर अधिकाऱ्यांकडून कोणत्याही व्यक्तीला विदेशात काळा पैसा जमा असल्याच्या संशयावरून समन्स, नोटीस हे पोस्ट किंवा कुरिअर सेवा किंवा ई-मेल, फॅक्स अशा स्वरूपात पाठविण्यात येईल. 


१३. हे विधेयक लागू होण्यापूर्वी नागरिकांना विदेशात असलेली अघोषित संपत्तीबाबत खुलासा करण्यासाठी अल्पावधी देण्यात येईल. या कालावधीत ते ३० टक्के कर आणि ३० टक्के दंड भरून संपत्तीबाबतची स्थिती स्पष्ट करू शकतात.


१४. दरवर्षी अवघे १२ रुपये देऊन दोन लाख रुपयांचा अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना’ ही सामजिक सुरक्षा योजना आयसीआयसीआय लॉम्बार्ड, बजाज अलियान्झ, रिलायन्स जनरल, युनिव्हर्सल सॉम्पो, इफ्को टोकियो आणि फ्युचर जनराली या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी स्वीकारली आहे. 


१५. टर्की येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत  भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने कोरियाच्या चांग हे जिन हिला सरळ सेटमध्ये नमवून वर्ल्डकपमधील महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. 


१६. आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंबेडकर-पेरियार स्टुडंट सर्कल (एपीएससी) नामक फोरमची स्थापना १४ एप्रिल २०१४ रोजी केली होती. 


१७. कोलकाताहून अगरतला व्हाया बांगलादेश बस सेवा ०१ जून २०१५  पासून सुरु करण्यात येणार आहे. 


१८. ललित भनोत यांची  एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


१९. १९७१च्या स्वातंत्र्य युद्धात पाठिंबा दिल्याबद्दल बांगलादेशने अटलबिहारी वाजपायी यांचा गौरव केला. 


२०. एलबीटी रद्द करून त्याऐवजी सध्याच्या व्हॅटमध्ये वाढ करण्याचे राज्य सरकारने ठरविले असून राज्यात एलबीटी रद्द करण्याची घोषणा ०१ ऑगस्ट २०१५ पासून केली आहे. एलबीटी रद्द केल्यास राज्य सरकारला मुंबई महापालिका वगळून इतरांना सुमारे ६८७५ कोटी रुपये दरवर्षी द्यावे लागणार आहेत. 


२१. महापालिकांच्या २०१० ते २०१५ या मागील पाच आर्थिक वर्षांत ज्या वर्षी एलबीटीचे सर्वाधिक उत्पन्न असेल तितकी रक्कम राज्य सरकार एलबीटीच्या बदल्यात महापालिकांना देणार आहे. मागील पाच वर्षांतील एलबीटीचे सर्वाधिक आर्थिक वर्षाचे उत्पन्न त्यासाठी गृहित धरण्याचे अर्थ खात्याने ठरविले आहे. तसेच व्हॅटमध्ये सरसकट दहा टक्के वाढ करायची की महापालिकांच्या उत्पन्नाच्या आधारे वाढ करायची या प्रमुख पर्यायातला एक पर्याय स्वीकारण्यात येणार आहे.


२२. राज्यांतील सर्व शाळांत कोणत्या २१ जूनरोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.  संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. 


२३. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघातील १७५ देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. महासभेने इतक्या मोठ्या संख्येने मंजूर केलेला हा पहिलाच प्रस्ताव आहे.  इतक नव्हे तर एखाद्या देशाने सादर केलेला प्रस्ताव ९० दिवसांच्या आत मंजूर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


२४. महासभेच्या जागतिक आरोग्य आणि परराष्ट्र धोरण अंतर्गत जगभरातील १९३ देशांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या प्रस्तावाला जगभरातील सर्व खंडातील आणि उपखंडातील देशांनी मान्यता दिली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघातील पाच कायम स्वरुपी सदस्य असलेल्या पाच देशांनी आणि सुरक्षा परिषदेतील देशांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. 


२५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. ११ डिसेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या-GA एकमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून २१ जून ला मंजूरी दिली.