०१. इटलीच्या सस्सारी शहरातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत एकूण ९ पदके(८ सुवर्ण व १ कांस्यपदक) पदकांची कमाई केली.  भारताच्या सोनू(६१ किग्रॅ), सोमवीर(८६ किग्रॅ), मौस खत्री(९७ किग्रॅ) आणि हितेंदर(१२५ किग्रॅ), अमित कुमार (५७ किग्रॅ), योगेश्वर दत्त(६५ किग्रॅ), प्रवीण राणा(७० किग्रॅ) आणि नरसिंग यादव(७४ किग्रॅ) यांनी सुवर्णपदके मिळवली. रजनीशला मात्र ६५ किग्रॅ फ्रीस्टाईल कुस्तीप्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.


०२. जगातील सर्वात वयस्कर महिला धावपटू कर्करोगाने त्रस्त असलेल्या हॅरिएट थॉम्पसन (वय ९२ वर्षे) ठरल्या आहेत.  हॅरिएट थॉम्पसन यांनी सॅन दिएगोमध्ये झालेल्या ‘रॉक अँड रोल’ मॅरॅथॉन स्पर्धा ७ सात, २४ मिनिटे आणि ३६ सेकंद या वेळेत पूर्ण केली.‘रॉक अँड रोल’ मॅरॅथॉन स्पर्धेत त्या १७व्यांदा सहभागी झाल्या. मॅरॅथॉन स्पर्धेत धावलेल्या सर्वात वयस्कर महिलेचा मान आजवर ग्लॅडीज् बुरिल यांना जात होता.२०१० होनोलुलु मॅरॅथॉन पूर्ण केली तेव्हा त्यांचे वय ९२ वर्षे १९ दिवस होते. थॉम्पसन यांचे वय ९२ वर्षे आणि ६५ दिवस इतके आहे.


०३. १६वा आयफा पुरस्कार विजेते (मलेशिया क्वालांलपूर) सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्वीन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  (कंगना राणावत-क्वीन), सर्वोत्कृष्ट अभिनेता (शाहिद कपूर-हैदर), सर्वोत्कृष्ट कथा (विकास बहल,चैताली परमार आणि परवेझ शेख-क्वीन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राजकुमार हिरानी-पीके), सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (लय भारी), सर्वोत्कृष्ट स्त्री सहकलाकार (तबू-हैदर), सर्वोत्कृष्ट पुरुष सहकलाकार (रितेश देशमुख-एक व्हिलन), सर्वोत्कृष्ट स्त्री पार्श्वगायक (कनिका कपूर-बेबी डॉल), सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक (अंकित तिवारी-एक व्हिलन), सर्वोत्कृष्ट खलनायक (के.के.मेनन-हैदर), सर्वोत्कृष्ट स्त्री पदार्पण (किर्ती सनॉन -हिरोपंती), सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण (टायगर श्रॉफ-हिरोपंती), सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (शंकर-एहसान-लॉय- टू स्टेटस), 


०४. एस.टी.च्या बस गाडय़ांमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पन्नास गाडय़ांमध्ये मुंबई येथे प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू केली जाणार असून, कालांतराने एस.टी.च्या १७ हजार बसेसमध्ये मोफत वायफाय सुरू केले जाणार आहे. एस.टी.मध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर राज्याच्या कानाकोप-यात वायफाय पोहोचणार आहे.


०५. कालांतराने एस.टी.च्या साध्या, निमआराम व शिवनेरी अशा सुमारे सतरा हजार बसेसमध्ये वायफाय मोडेम बसवण्यात येणार आहेत. ही सेवा तीन टप्प्यात सुरू होणार असून, आगामी सहा महिन्यांत बहुतेक सर्व एस.टी. गाडय़ांत वायफाय सुरू केले जाणार आहे.


०६. सेवार्थ प्रणालीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यामध्ये पहिला क्रमांक अकोला जिल्हा परिषदेचा लागला आहेतर तर रत्नागिरी जिल्हा परिषदेचा द्वितीय क्रमांक लागला आहे. सेवार्थ प्रणालीमुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचा-यांचे वेतन वेळेत होण्यास मदत मिळणार आहे.सर्व जिल्हा परिषदांनी सेवार्थ प्रणालीचा अवंलब करावा, असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. ०७. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अर्थात यूएनडीपी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किनारपट्टी ‘व्हेल, शार्क संवर्धन केंद्र’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गुजरातमधील तज्ज्ञ वनअधिकारी व वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. यांच्याच मदतीने व्हेल शार्क संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात येणार आहे.०८. १६ जून पासून ताजमहाल परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल)च्या वतीने विनामूल्य वाय-फायची सुविधा सुरु होणार आहे. ०९. ही विनामूल्य वाय-फाय सुविधा केवळ पहिल्या ३० मिनिटांसाठी असेल. त्यानंतरच्या प्रत्येक तासाला ३० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे.सुरक्षेच्या कारणास्तव ताजमहालपासून केवळ ३० मीटर परिसरातच ही सेवा पुरविण्यात येणार आहे.


१०. लवकरच आग्रा येथील महाविद्यालये,रेल्वे स्थानके आणि अन्य ठिकाणीही बीएसएनएलच्यावतीने वाय-फाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाने वाय-फाय उभारता येऊ शकतील अशा भारतातील अन्य २५ पर्यटनस्थळेही बीएसएनएलला सुचविली आहेत. हा प्रकल्प ७ हजार कोटी रुपयांचा असल्याचीही माहिती समोर आली आहे.


११. मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्यानंतर राज्य सरकारने मॅगीवर घातलेल्या बंदी विरोधात नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अन्न व औषधद्रव्य प्रशासन विभागाने ५ जून रोजी मॅगीवर बंदी घातली आहे.


१२. फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या महेंद्रसिंह धोनी २३व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी तो २२ व्या स्थानी होता. धोनीची एकूण संपत्ती ३१ मिलियन डॉलर (१९८ कोटी रुपये) एवढी आहे.


१३. या यादीत अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर हा अव्वल स्थानावर आहे. मेवेदर याची यंदाची कमाई ३०० मिलियन डॉलर इतकी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याच्या कमाईत दुपट्टीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा मेवेदरला सर्वांत श्रीमंत खेळाडू घोषित करण्यात आले आहे.


१४. याबरोबरच गोल्फपटू टायगर वुड्स, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आहेत.सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (१३), सेबॅस्टियन व्हेटेल (२१), रॅफेल नदाल (२२) आणि वॅन रुनी (३४) आणि उसेन बोल्ट (७३) या प्रमुख खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे.


१५. ऊस उत्पादकांची थकबाकी चुकती करण्यासाठी केंद्र सरकारने सहा हजार कोटी रुपयांच्या विशेष कर्जाला (सॉफ्ट लोन) मंजुरी दिली आहे. देशभरात 21 हजार कोटी रुपयांची थकबाकी असून, या मदतीनंतर उर्वरित थकबाकी कारखान्यांनी साखर विकून द्यावी, असे सरकारचे म्हणणे आहे.


१६. उसाची थकबाकी चुकती करण्यासाठी द्यावयाच्या सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज एक वर्षासाठी केंद्र सरकारतर्फे दिले जाईल. शेतकऱ्यांना तातडीने रक्कम मिळावी, यासाठी बॅंका साखर कारखान्यांकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे आणि बॅंक खात्याचा तपशील घेतील. त्यानंतर ही रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जाईल. यातून शिल्लक राहिलेली रक्कम कारखान्यांना दिली जाईल. अर्थात, जे साखर कारखाने ३० जूनपर्यंत ५० टक्के थकबाकी चुकती करतील, त्यांनाच या “सॉफ्ट लोन‘चा लाभ घेता येईल. 


१७. इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉलच्या दरात ३२ रुपयांवरून ४२ रुपये अशी वाढ करण्याचाही निर्णय झाला आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचे उचित लाभकारी मूल्य (एफआरपी) २२० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केले आहे. 


१८. याशिवाय साखर उद्योगापुढील समस्यांप्रश्नी  राजकीय, आर्थिक क्षेत्राकडून झालेल्या मागण्यांच्या पार्श्विभूमीवर आयात शुल्क २५ टक्यांकी  वरून ४० टक्के करणे, कच्च्या साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी ३२०० रुपये प्रति मेट्रिक टनांवरून ४२०० रुपये प्रति मेट्रिक टन केले आहे.


१९. नुकतेच भारताच्या हेमंत कानिटकर (वय ७२) या माजी कसोटीपटूचे निधन झाले आहे. कानिटकर यांनी १९७४-७५ च्या मोसमात बलाढ्य वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्यांनी २७.७५च्या सरासरीने १११ धावा केल्या. कानिटकर १९९२-९३ व ९३-९४ हे दोन मोसम ज्युनिअर निवड समितीचे सदस्य होते. ९६-९७ व   ९८-९९ हे दोन मोसम त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती. 


२०. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि १२० लोकांच्या फोन टॅपिंग प्रकरणी केंद्राने चौकशी करावी, अशी मागणी आंध्र प्रदेश सरकारने केली आहे. 


२१. धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयात खटला लढणाऱ्या लाखो लोकांना दिलासा देणारा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाने १० जून रोजी काढला. धनादेश वटणाऱ्या ठिकाणी न्यायालयात खटला लढविता येणार आहे. 


२२. “निगोशिएबल इस्ट्रुमेंट ऍक्ट‘मध्ये केंद्र सरकार यासाठी दुरुस्ती करणार आहे. ज्या ठिकाणाहून धनादेश काढण्यात आला, त्या ठिकाणी खटला दाखल करण्याची आता गरज राहणार नाही. नव्या दुरुस्तीनुसार धनादेश वटण्यासाठी भरला त्या ठिकाणी खटला दाखल करता येईल.


२३. देशभरात १८ लाख लोक धनादेश न वटल्याप्रकरणी खटला लढत आहेत. लोकसभेने या वर्षाच्या सुरवातीला यासंबंधी विधेयक संमत केले आहे. राज्यसभेत हे विधेयक संमत होऊ शकले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाने अध्यादेश काढला.


२४. भारतीय रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकीट आरक्षणाच्या सेवेत काही महत्त्वाचे बदल केले असून  तात्काळ तिकीट रद्द केल्यास येथून पुढे संबंधित प्रवाशाला तिकिटाची ५० टक्के रक्कम परत मिळणार आहे. वातानुकूलित (एसी) क्लासचे तात्काळ तिकीट सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आरक्षित करता येईल. 


२५. इतर स्लीपर क्लासचे तिकीट सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आरक्षित करता येणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वेच्या वतीने ‘तात्काळ विशेष रेल्वे‘ही सुरू करण्याची नवी योजना आहे. तात्काळ विशेष रेल्वे‘च्या आरक्षण कालावधीतही वाढ केली आहे. आता तात्काल विशेष रेल्वेसाठी ६० दिवसांपूर्वीही आरक्षण करता येईल. तर कमीत कमी दहा दिवसांपूर्वी तात्काळ रेल्वे आरक्षण प्रवासी करू शकतील.