०१. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एबीसी) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. सुटीतील न्यायालय याबाबत आदेश देऊ शकत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि आय. एस. मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.


०२. केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेमुळे केंद्र सरकारच्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळते आहे. त्यामुळे त्यास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सुधीर असोसिएट या लॉ फर्मने दाखल केली आहे. 


०३. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  करण्याचे संपूर्ण अधिकार देण्याबाबतची अधिसूचना २१ मे रोजी केंद्र सरकारने काढली आहे. या अधिसूचनेस आव्हान देणारी याचिका कायद्याचे विद्यार्थी असलेल्या विभोर आनंद यांनी दाखल केली आहे.


०४. मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याची माहिती नासाने जाहीर केली आहे.त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्यता व्यक्त करण्यास बळ मिळाले आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने सांगितले आहे.


०५. नासाच्या याच यानाने मंगळावरील मातीचे नमुने गोळा केले असून ते घेऊन तो पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे. याच यानाला मंगळावरील विवरामध्ये काचेचा संचय सापडला आहे. नीली फोस्से नावाच्या विवरापासून ६५०किलोमीटर अंतरावर हा संचय सापडला आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या संशोधनात पृथ्वीवरील पूर्वीच्या जीवसृष्टीने आपला पुरावा काचेच्या स्वरुपात जतन करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.


०६. “बर्मीज बिन लादेन‘ असे म्यानमारमधील बौध्द भिक्षु आशीन विराथु यांना म्हटले जाते. म्यानमारमध्ये रोहिंग्या(मुस्लीम समुदाय)-बौद्ध संघर्षाचा मोठा इतिहास आहे. प्रामुख्याने जून २०१२मध्ये म्यानमारमधील राखीन प्रांतामध्ये झालेल्या मोठ्या दंगलीच्या मालिकेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमटले. 


०७. त्या काळात विराथु यांनी मोठ्या निर्दयीपणे लाखो रोहिंग्याची कत्तल घडवून आणली होती. म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात झालेल्या मोठ्या हिंसाचाराचे पितृत्व प्रामुख्याने या बौद्ध भिक्षु असलेल्या विराथु याच्याकडे जाते.


०८. बॉलिवूड सुपरस्टार व आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खान याने कॅरेबियन प्रिमियर लीगमधील त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाची खरेदी केली आहे. शाहरुख खानने हॉलिवूड अभिनेता मार्क वाल्बर्ग आणि जेरार्ड बटलर यांच्या साथीने या संघाची मालकी मिळविली आहे. 


०९. वल्बर्ग आणि बटलर यांच्याकडे यापूर्वीच कॅरेबियन प्रिमियर लीगमधील संघांची सहमालकी आहे. वेल्बर्ग यांच्याकडे बार्बाडोस ट्रेन्डन्ट आणि बटलर यांच्याकडे ख्रिस गेलच्या नेतृत्वाखाली जमैका तलावा संघाची सहमालकी आहे. 


१०. काही दशहतवादी संघटना-
– एनएससीएन (के)- नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग)- एस.एस.खापालांग 
– उल्फा-आय युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-स्वतंत्र-परेश बारुआ 
– केवायकेएल-कांगलेई यावोल कन्ना लुप
– युनायटेड नैश्नल लिबरेशन फ्रंट (यु.एन.एल.एफ.) 
– पीपल्स रीवाल्युशण पार्टी ऑफ कान्ग्लाईपाक 
– काल्न्ग्लाईपाक कम्युनिस्ट पार्टी (के.सी.पी)
– ऑपरेशन न्यू कान्ग्लाईपाक (ओ.एन.के.)
– मियाम्गी यओल लान्मी (MYL)
– नागालैंड बेस्ड नैशनल सोशालीस्ट कौन्सिल ऑफ नागालैंड-इसक मुईवाह (NSCN-IM)
– झोमी रीवोल्युशनरी आर्मी (ZRA)
– कान्ग्लाई यओल कांना लूप (KYKL)

– अचिक नैश्नल व्होलंटीयर कौन्सिल (ANVC)


११. वाहनउद्योग, धातू तसेच औद्योगिक क्षेत्रात चिकटवण्यासाठी वापरला जाणारे रासायनिक पदार्थ – अधेसिव्ह, सिलन्ट आणि फंक्शनल कोटिंगसाठी उत्पादनांची पुरवठादार असलेल्या हेंकेल अधेसिव्ह टेक्नोलॉजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (जर्मन समूह हेंकेल उपकंपनी) तीन कोटी युरोच्या गुंतवणुकीतून पुण्याजवळ करकुंभ येथे भारतातील सर्वात मोठा अधेसिव्ह प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.


१२. २०१७ सालच्या सुरुवातीस या प्रकल्पातून उत्पादनास प्रारंभ होणे अपेक्षित आहे. गुरुवारी कुरकुंभ येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच हेंकेल ग्रुप इंडियाचे अध्यक्ष जेरेमी हंटर यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात या प्रकल्पाची कोनशिला बसवण्यात आली.


१३. सुमारे २०,००० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ८०,००० मेट्रिक टन एवढय़ा अधेसिव्हचे उत्पादन घेतले जाणार असून त्यातून देशातील औद्योगिक क्षेत्राची गरज कंपनी भागवणार आहे.


१४. २५ वर्षांपूर्वी परम महासंगणक विकसित करून भारतीय शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी जगाला भारतीयांची प्रतिभा दाखवून दिली होती. आता पुन्हा भारतीय वंशाच्या युवकाने थेट पाण्यावर आधारित संगणकाची निर्मिती करून विज्ञान जगतात यशाची पताका फडकविली आहे.


१५. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक प्रकाश आणि त्यांच्या चमूने हा ड्रॉपलेट कॉम्युटर विकसित केला आहे. भौतिक शास्त्रातील तत्त्वांचा वापर करीत हलत्या पाण्याच्या थेंबांचा वापर करून हा संगणक तयार करण्यात आला आहे.


१६. विशेष म्हणजे जेव्हा एक दशकापूर्वी प्रकाश याच विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच त्यांच्या डोक्यात अशा प्रकारचा पाण्यावर आधारित संगणक तयार करण्याची कल्पना घोळत होती. आज त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.भौतिकशास्त्रातील तरल गतिकी या तत्त्वाचा आधार घेऊन ड्रॉपलेट फ्युड डायनॅमिक्सने या संगणकाचे परिचलन करण्यात येते.


१७. आम आदमी पक्षाचे दिल्ली सरकारमधील मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्या राजीनाम्यानंतर करावल येथील आ. कपिल मिश्रा दिल्लीचे नवे कायदामंत्री झाले आहेत.याआधी पाणीपुरवठा मंडळाचे उपाध्यक्ष असणारे कपिल तरुण नेते असून चांगले वक्ते आहेत. बोगस पदवी प्रकरणी तोमर यांना चार दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंजूर केला.१८. सरहद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार २०१५’ प्रकाशसिंह बादल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख १ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे. 


१९. दक्षिण अमेरिकेतील प्रमुख संघांमध्ये रंगणारी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा चिली (Santiago) देशात होणार आहे. ही स्पर्धा सर्वात जास्त उरुग्वे संघाने १५ वेळा जिंकली आहे. त्यानंतर हि स्पर्धा २०१६ साली युनायटेड स्टेट, २०१९ साली ब्राझील व २०१३ साली इक्वेडोर येथे होणार आहे. २०. मँचेस्टर युनायटेड हा संघ फुटबॉल जगतात सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या क्लब ठरला असून याचे बाजारमुल्य १.२ अब्ज डॉलर आहे. 


२१. वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या डीएलएफ लिमिटेडचा सिनेमागृह व्यवसाय या क्षेत्रातील आघाडीच्या पीव्हीआर ने घेतला आहे. तर कार्निव्हल समूहाने अनिल अंबानी यांच्या बिग सिनेमाचे तर जुलै २०१४ मध्ये आयनॉक्सने सत्यम सिनेप्लेक्स चे अधिग्रहण केले होते. 


२२. टाइम्स आशिया रँकिंगमध्ये  भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला. त्यात इंडीयन इन्स्टिट्यूट आँफ सायन्स (३७), पंजाब विद्यापीठ (३८), आयआयटी रुरकी (५५), आयआयटी मुंबई (५७), आयआयटी दिल्ली (६५), आयआयटी कानपूर(६९), आयआयटी मद्रास(७८), अलीगढ मुस्लीम विद्यापीठ(९०), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (९६) व्या स्थानावर आहे. 


२३. हत्ती साठी भारतातील पहिले विशेष रुग्णालयात केरळ राज्यात उभरले जात आहे.  

२४. प्रवासी, व्यक्तिगत आणि कार्गो वाहतूक अधिक सुकर होण्यासाठी भारत, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ या चार “सार्क ” देशांनी “मोटार वाहन करारा”ला मान्यता दिली आहे. 

२५. २ जून २०१५ रोजी ईरेडा (Indian Renewable Energy Development Agency Limited) या कंपनीला मिनी रत्न चा दर्जा देण्यात आला.