०१. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार गेल्या वर्षी आपल्या अण्वस्त्र क्षमतेत वाढ करणारा एकमेव देश चीन  आहे. संस्थेच्या अहवालानुसार, २०१४ या वर्षात चीनच्या अण्वस्त्रांमध्ये दहाने वाढ होऊन ही संख्या २६०वर गेली आहे. चीनने २०११ मध्ये आपल्या अणू कार्यक्रमावर ७.६ अब्ज डॉलर खर्च केला होता. याच काळात अमेरिकेचा खर्च ६१.३ अब्ज डॉलर असा प्रचंड होता. मात्र, या खर्चात अमेरिका हळूहळू घट करत असताना चीन मात्र त्यात वाढ करताना दिसत आहे.


०२. अमेरिका आणि रशियाकडे सर्वाधिक संख्येने अण्वस्त्रे आहेत. या दोन्ही देशांनी आपल्या अण्वस्त्रांमध्ये घट केल्याने २०१० ते २०१५ या काळात सुमारे ७,१०० अण्वस्त्रे कमी झाल्याचा अंदाज आहे. तरीही, अद्यापही अमेरिकेकडे ७,२६० आणि रशियाकडे ७,५०० अण्वस्त्रे आहेत. जगात एकूण नऊ देश अण्वस्त्रधारी आहेत. अमेरिका, चीन आणि रशियाव्यतिरिक्त ब्रिटन, फ्रान्स, भारत, पाकिस्तान, इस्राईल आणि उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.


०३. राज्याच्या सहयोगी महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


०४. इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरचे अध्यक्ष सिराजुद्दीन कुरेशी व इतिहासकार जे. एस. राजपूत यांनी लिहिलेल्या ‘एज्युकेशन ऑफ मुस्लिम’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रकाशन समारंभाला कतार, बहरीन, इजिप्त व इंडोनेशियासह सार्क राष्ट्रांचे राजदूत उपस्थित होते.


०५. जगातील सर्वोच्च हिमशिखर अशी ओळख असलेला एव्हरेस्ट पर्वत नेपाळमध्ये आलेल्या विध्वंसक भूकंपाने नैऋत्य दिशेला ३ सेंटीमीटरने सरकला आहे.अशी बातमी चीनचे सरकारी चायना डेलीने दिले आहे. नॅशनल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्वेइंग, मॅपिंग अँड जिओ इन्फॉर्मेशनच्या अहवालाचा हवाला देत हे वृत्त देण्यात आले आहे.

०६. विशेष म्हणजे नेपाळमध्ये आलेल्या ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाआधी एव्हरेस्ट ईशान्येच्या दिशेने वाढत असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. गेल्या काही दशकांमध्ये एव्हरेस्ट ईशान्य दिशेला ४० सेंटीमीटर सरकल्याचेही स्पष्ट झाले आहे. 


०७. दरवर्षी किमान ४ सेंटीमीटर या वेगाने हे शिखर सरकत आहे. त्याचवेळी एव्हरेस्टची उंचीही याकाळात ३ सेंटीमीटरने वाढलेली आहे. आता मात्र नेपाळ भूंकपाने ईशान्येऐवजी नैऋत्य दिशेकडे एव्हरेस्ट सरकला आहे. त्यातही नेपाळमधील पहिल्या भूंकपाचा एव्हरेस्टवर परिणाम जाणवला मात्र ७.३ तीव्रतेच्या दुसऱ्या भूंकपाने कोणताही परिणाम झालेला नाही, असेही चीनच्या वृत्तपत्राने नमूद केले आहे.


०८. ब्रिटनच्या आधुनिक राष्ट्र-राज्याचा पाया रचणारी ‘मॅग्ना कार्टा’ ही ऐतिहासिक सनदेने १५ जून २०१५ रोजी ८०० वर्षे पूर्ण केली आहे.  ‘मॅग्ना कार्टा’ला ८०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या कराराच्या प्रतिमेची थेम्स नदीच्या किनाऱ्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली.


०९. ब्रिटनच्या आधुनिक राष्ट्र-राज्याचा पाया रचणारी ‘मॅग्ना कार्टा’ ही ऐतिहासिक सनद प्रत्यक्ष लिहिणाऱ्या दोन लेखनिकांना शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. दोन्ही लेखनिक चर्चच्या बाजूने या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


१०. इंग्लंडमध्ये १२१५मध्ये जॉन या राजाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्याविरोधातील बंडानंतर, कँटरबरीच्या आर्चबिशपच्या पुढाकाराने करार तयार करण्यात आला होता. या कराराची सनद म्हणजेच ‘मॅग्ना कार्टा’! या करारानंतर राजाच्या अधिकारांमध्ये लक्षणीय प्रमाणात कपात झाली. या ऐतिसाहिक कराराच्या सनदेला ८०० वर्षे पूर्ण झाले आहेत.


११. मॅग्ना कार्टा (लॅटिन – महान सनद; शब्दशः अर्थ – महान कागद)

तथा मॅग्ना कार्टा लिबर्टेटम (स्वातंत्र्यांची महान सनद) ही इ.स. १२१५मध्ये इंग्लंडमध्ये लिहीण्यात आलेली सनद आहे. त्यावर ब्रिटनचा तत्कालीन राजा एडवर्ड पहिल्याची स्वाक्षरी आहे. स्वातंत्र्याची व्याख्या करणाऱ्या काही दस्तावेजांपैकी मॅग्नाकार्टा एक आहे. 


१२. अर्वाचीन राष्ट्रघटना (उदा. अमेरिकेचे अमेरिकेचे संविधान व हक्कनामा) तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या संघटनावर या सनदीचा सगळ्यात जास्त प्रभाव दिसून येतो. या सनदीला लोकशाहीच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा कागद समजण्यात येतो.


१३. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यासाठी केंद्र सरकारने www.eex.dcmsme.gov.in हे  जॉब पोर्टल सुरू केले आहे. डिजिटल इंडिया, स्किल इंडिया व मेक इन इंडिया या तीन योजनांना पाठिंबा देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे हे एक प्रकारे इम्प्लॉयमेंट एक्स्चेंज तयार करण्यात आले आहे.


१४. भारतीय संघाला २०१८च्या फुटबॉल वर्ल्डकपसाठीच्या एएफसी पात्रता फेरीत गुआमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. या लढतीत भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केलेला एकमेव गोल त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला ५० वा गोल (८७व्या सामन्यात)  ठरला.  भारताकडून तो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे. 


१५. माजी कर्णधार बायचुंग भूतियाने १०७ सामन्यांत ४२ गोल केले आहेत. तर, आय. एम. विजयन यांच्या नावावर ७९ सामन्यांत ४०, तर शब्बिर अली यांच्या नावावर ७२ सामन्यांत २३ गोल जमा आहेत. पी. के. बॅनर्जी यांनी ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १९ गोल केले आहेत.


१६. केरळ पर्यटन व आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्टेफी ग्राफ या  प्रसिद्ध जर्मन महिला टेनिसपटूला निवडण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. 


१७. केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध बनावट पदवी प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्लीतील पटियाला न्यायालयाने मान्य केली असून पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. इराणी यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत अहमर खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.


१८. फेसबुकवरील “मालिशिअस सॉफ्टवेअर‘ शोधून त्यांना काढून टाकणारे सिक्युनरिटी टूल फेसबुकने कार्यान्वित केले आहे. या सुविधेमुळे फेसबुक सुरु असताना पार्श्व भूमीवर “क्लियनअप टूल‘ काम करणार आहे. हा टूल संगणकावर काही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्याबाबत युजरला माहिती देईल. 


१९. तसेच हा टूल संबंधित संशयास्पद प्रकार हटविणार आहे. यासाठी फेसबुकने कास्परस्काय लॅबसह इसेट, एफ-सिक्युाअर आणि ट्रेंड मायक्रो या सिक्युहरिटी फर्मची मदत घेतली आहे. वेब हल्ले करणाऱ्यांचे फेसबुक हे मोठे ध्येय आहे. पाचपैकी एक हल्ला हा फेसबुकवर झालेला असतो.


२०. ‘दी ग्रेट खली‘च्या सहभागानंतर भारतीय वंशाचे सतेंदर (वय ३४  उंची ६ फूट ४ इंच  वजन १०५ किलो) आणि  लव्हप्रीत (वय २६ उंची ६ फूट वजन ९८  किलो) हे दोन स्पर्धक “डब्ल्यूडब्ल्यूई एनएक्साटी‘मध्ये सहभागी होणार आहे. 


२१. सतेंदर माजी जागतिक कबड्डी लीग विजेता आहे, तर लव्हप्रीत हेवीवेट गटातील दोन वेळचा राष्ट्रीय विजेता मल्ल आहे.सतेंदर मूळ हरियानाचा आहे. पूर्वी ही मालिका गाजविलेला “अंडरटेकर‘ त्याचे प्रेरणास्थान आहे. लव्हप्रीतने जोरदार चढायांनी कबड्डीचे मैदान गाजविले आहे.


२२. भूकंपामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक बॅंकेने ५० कोटी  डॉलरचा निधी उभारला आहे. भूकंपामुळे नेपाळचे ६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून, ते भरून काढण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लागेल. यातील वीस कोटी डॉलर हे घरांच्या उभारणीवर खर्च केले जाणार असून, अन्य दहा कोटी डॉलर थेट नेपाळ सरकारला रोख स्वरूपात दिले जाणार आहेत. 


२३. आणखी दहा ते वीस कोटी डॉलरचा निधी अन्य प्रकल्पांकडून पुनर्बांधणीच्या कार्याकडे वळविला जाणार आहे. नेपाळमधील चारपैकी एका नागरिकाचे रोजचे उत्पन्न हे १.२५ डॉलरपेक्षाही कमी आहे. तसेच भूकंपामुळे देशातील गरिबांची संख्या सात लाखांच्या घरात पोचली आहे. मागील वर्षी आफ्रिकी देशांना इबोला विषाणूचा सामना करण्यासाठी जागतिक बॅंकेने चाळीस कोटी डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला होता. 


२४. मालाड-मालवणीतील विषारी दारूप्रकरणी स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव – महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २५. युरोपमधील सर्वांत वृद्ध असलेल्या नझरसिंग या  व्यक्तीचे नुकतेच निधन झाले. नझरसिंग यांचा जन्मदाखला नसल्यामुळे “गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस‘ने त्यांची दखल घेतली नाही. १९६५ मध्ये ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तेथे कामगार म्हणून त्यांनी काम केले.