०१. ब्राझीलचा नेयमार या  स्टार फुटबॉलपटूवरविरुद्ध स्पेनच्या न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  २०१३ मध्ये बार्सिलोना क्लबशी करार करताना नेयमारचे वडील तसेच त्याला पूर्वीचा क्लब सँटोस यानी आर्थिक फसवणूक केल्याचे राष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे. 

०२. २३ वर्षीय नेयमार दोन वर्षापूर्वी बार्सिलोनाशी करारबद्ध झाला. या कालावधीत स्पॅनिश लीगची तीन आणि चँपियन्स लीगचे एक जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला आहे.

०३. भारतावर समात करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी विजय  मिळवत बांगलादेशने २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे. 

०४. गॅरी वेबर टेनिस स्पर्धेचे जेतेपद(२०१५) पटकाविणारा खेळाडू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आहे. ग्रास कोर्टवरील या स्पर्धेच्या अंतिम लढतीत फेडररने इटलीच्या अँड्रीयस सेपीवर ७-६ (१), ६-४ अशी मात केली. फेडररचे हे एटीपी कारकिर्दीतील एकूण ८६वे विजेतेपद ठरले.

०५. या स्पर्धेतील फेडररचे हे सलग तिसरे आणि एकूण आठवे जेतेपद ठरले. मोसमातील त्याचे हे चौथे जेतेपद ठरले.फेडररने यापूर्वी २००३, २००४, २००५, २००६, २००८, २०१३, २०१४मध्ये ही स्पर्धा जिंकली. आठ वेळा ही स्पर्धा जिंकणारा फेडरर पहिलाच टेनिसपटू आहे. 

०६. क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेचे जेतेपद (२०१५) पटकाविणारा खेळाडू अँडी मरे आहे.  त्याने फायनलमध्ये द. आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. याआधी जॉन मॅकेन्रो, बोरिस बेकर, अँडी रॉडिक व लिटन ह्युईट यांनी ही स्पर्धा चारवेळा जिंकली आहे.

०७. २०१५च्या एटीपी मोसमातील मरेचे हे तिसरे जेतेपद. याआधी त्याने माद्रिद व म्युनिच स्पर्धा जिंकली आहे. २०१३च्या विम्बल्डन जेतेपदानंतर मरेने प्रथमच ग्रास कोर्टवरील स्पर्धा जिंकली.


०८. मर्सिडीज कप टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद रोहन बोपण्णा आणि रोमानियाच्या प्लोरिन मर्गिया यांनी पटकावले.  बोपण्णाचे हे पुरुष दुहेरीचे एकूण चौदावे, तर फ्लोरीनच्या साथीत मिळविलेले हे दुसरे विजेतेपद ठरले.


०९. बोपण्णाने फ्लोरिनच्या साथीत माद्रिद मास्टर्सचे जेतेपद मिळविले होते. या मोसमातील बोपण्णाचे हे एकूण चौथे विजेतेपद ठरले. बोपण्णाने कॅनडाच्या डॅनिएल नेस्टरच्या साथीत जानेवारीत सिडनी स्पर्धेत आणि फेब्रुवारीमध्ये दुबई स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.


१०. भारतातील मॅगीच्या आयातीवर नुकतीच ऑस्ट्रेलिया या  देशानेसुध्दा बंदी घातली आहे. 


११. लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर महाराष्ट्र सरकारने ४० लाख पौंड (४० कोटी रुपये)  मोजून खरेदी केले.  विद्यार्थीदशेमध्ये १९२० च्या दशकात डॉ. आंबेडकर यांचे या घरामध्ये वास्तव्य होते. येथील “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स” या संस्थेमध्ये डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणाचे धडे गिरवले होते.


१२. डॉ. आंबेडकरांचे हे निवासस्थान भारत सरकारने खरेदी करावे यासाठी लंडनमधील “फेडरेशन ऑफ आंबेडकराईट्‌स अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन‘ (फॅबो) या संस्थेने सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. २ हजार ५० स्क्वेाअर फूट एवढ्या विस्तीर्ण भागावर असलेली वास्तू पूर्वीपासूनच अनेकांच्या आकर्षणाचा बिंदू होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने या निवासस्थानाच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. 

१३.  केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त मोबाईल ब्लड बॅंक ही एप सेवा कार्यान्वित केली आहे. ‘मोबाईल ब्लड बॅंक’ ऍपमुळे जवळ असलेल्या ब्लड बॅंकेची माहिती मिळण्यास सोपे जाणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमन परिषदेनी परवानाधारक असलेल्या २७६० ब्लड बॅंकांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. 


१४. ब्लड बॅंकांची माहिती राष्ट्रीय आरोग्य पोर्टलवर उपलब्ध आहे.  राजधानीमधील ७६ तर देशभरात ५२४ ब्लॅड बॅंकांची माहिती हाती आली असून, लवकरच ती अपलोड केली जाणार आहे. शिवाय, ‘थॅंक यू फॉर सेव्हिंग माय लाइफ‘ असे स्लोगनला नाव देण्यात आले आहे.


१५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल माध्यमांतील आपली उपस्थिती आणखी लोकाभिमुख करण्यासाठी नवे पाऊल टाकले असून त्यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाइल अॅप’ लाँच केले.या माध्यमातून युजर्सना महत्त्वाची माहिती, सरकारी घोषणा, योजनांची माहिती तत्काळ मिळवता येईल. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेले मेसेज आणि ईमेल थेट मिळवता येईल. 


१६. अँड्रॉइड ओएसवरील या अॅपचा उद्देश हा लोकांना मोदींशी थेट संवाद आणि विचार तसेच सूचना शेअर करण्याची संधी देणे हा आहे..या अॅप्लिकेशनच्या विवरणात म्हटले आहे की, हे अॅप डाऊनलोड करा व कुठेही ताजे अपडेट्स मिळवा. नरेंद्र मोदी अॅपच्या वैशिष्ट्यांत ताज्या बातम्या आणि अपडेट्ससोबतच थेट ईमेल व मेसेज मिळवता येईल. याशिवाय मन की बातमध्ये थेट पंतप्रधानांसोबत संवाद साधता येईल.


१७.  नवे कॅबिनेट सचिव म्हणून आयएएस अधिकारी प्रदीप कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या १३ जून २०१५ पासून ते सचिवपदाचा कार्यभार हाती घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रदीप कुमार सिन्हा यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली.


१८. सध्याचे कॅबिनेट सचिव अजित कुमार सेठ यांचा पुढील महिन्यात सचिवपदाचा कार्यकाल संपत आहे. त्यानंतर सिन्हा कार्यभार हाती घेणार आहेत. सिन्हा हे १९७७च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडररचे आयएएस अधिकारी आहेत.देशातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांपैकी ते एक आहेत. सिन्हा जुलै २०१३ पासून उर्जा सचिवपदी कार्यरत आहेत.१९. आता १४ एप्रिल ‘समरसता दिन’ म्हणून साजरा करणार केंद्र सरकार.
केंद्रीय मंत्रीमंडळाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आता ‘समरसता दिन’ म्हणून साजरा करण्याबाबतच निर्णय घेतला 


२०. देशातील दूरदर्शन आणि चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी सुप्रसिद्ध अशा ‘फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि कालावधी यांच्यात बदल करावे, ही विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मागणीला दीर्घ काळानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


२१. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने ‘एफटीआयआय’ला ‘नॅशनल इंपॉर्टन्स’ म्हणून जाहीर केले आहे. एफटीआयआय ही एक स्वायत्त संस्था असल्याने अभ्यासक्रम निश्चितीचे स्वातंत्र्य.तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडेचार, पाच वर्षाचा कालावधी लागत असे.


२२. नव्या अभ्यासक्रमाच्या आखणीत विभाग प्रमुख, संचालक, तज्ञ आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग. संस्थेला मिळणा-या ८० कोटींच्या निधीपैकी त्यातील शैक्षणिक साधनांसाठी ३७ कोटी तर उर्वरीत साधनसामुग्रीसाठी. विद्यार्थ्यांना अद्ययावत सर्व्हर रुम, क्लासरुम, कॅमेरे, प्रोसेसिंग युनिट उपलब्ध होणार.


२३. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या वतीने दिला जाणार आर्यभूषण पुरस्कार सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते कल्लाप्पाअण्णा आवाडे यांना तर नरुभाऊ लिमये यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर झाला आहे.


२४. सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इस्रोने जीएसएलव्ही मार्क-३ हा प्रक्षेपक डिसेंबर २०१६ पर्यंत प्रक्षेपित करण्यात येईल.सध्या सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या आदित्य-१ या उपग्रहाच्या बांधणीचे कामही इस्रोमध्ये वेगात सुरू आहे. येत्या चार वर्षांमध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल.इस्रोने सध्या जीएसएलव्ही मार्क-३ च्या प्रक्षेपणावर लक्ष केंद्रित केले आहे. 


२५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क सॅटेलाईटची संकल्पना मांडली होती. त्यानुसार सार्क देशांनी अवकाश मोहिमांमध्ये भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.तसेच संयुक्त अरब अमिरातीनेही मंगळयान मोहिमेबाबत चर्चा केल्याचे कुमार यांनी सांगितले. अरब देश चांद्रयान मोहिमांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे कुमार म्हणाले. दक्षिण कोरिया उपग्रहीय साधनांबाबत सहयोग करण्याची शक्‍यता आहे.