०१. मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु म्हणून डॉ. संजय देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल के विद्यासागरराव यांनी डॉ. देशमुख यांची नियुक्ती केली. विद्यमान कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांचा कार्यकाळ ६ जुलै २०१५ रोजी संपुष्टात येणार आहे.डॉ. संजय देशमुख यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. 

०२. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला दिलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घेण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात भोपाळमधील व्ही. के. नसवाह यांनी  दाखल केली आहे. 


०३. मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या अॅमेनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या भारतातील प्रमुखपदी लेखक आणि पत्रकार आकार पटेल  यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.अॅमेनेस्टीचे भारतात तीन मुख्य कार्यालये आहेत.  अॅमेनेस्टी मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी जगभर कार्य करते. १९६१ मध्ये लंडनमधील बॅरीस्टर पिटर बेनेसन यांनी स्थापन केली होती.०४.  राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) परळ येथील एका गिरणीच्या विक्रीत तब्बल ७०९ कोटींचा घोटाळा झाल्याचे सीबीआय चौकशीत उघड झाले असून याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला तसेच एनटीसीचे तत्कालीन अध्यक्ष व एमडी रामचंद्रन पिल्लई व इतर पाच जणांवर  गुन्हा दाखल केला आहे . 


०५. आयआयटी खरगपूरची ओळख नामवंत अभियंत्यासाठी असली तरी लवकरच या प्रतिष्ठित संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. आयआयटी कॅम्पसला लागून असलेल्या तीन एकर भूखंडावर ४०० खाटांचे सुपर स्पेशिलिस्ट हॉस्पिटल उभारले जाणार असून तेथे डॉ. बी.सी.रॉय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था २०१७ च्या अखेरीस पूर्णत्वात येईल.


०६. सरकारने या संस्थेसाठी गेल्या वर्षी २३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संस्थेत एमबीबीएससारखे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेडिकल कॉन्सिलची (एमसीआय) परवानगी मागण्यात आली आहे. आयआयटी खरगपूर ही संस्था अभियांत्रिकी अभ्यासासाठी जगात प्रसिद्ध असून वैद्यकीय शिक्षणात प्रवेश करणारी ही पहिली आयआयटी संस्था ठरणार आहे.


०७. नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांचा वारसा पुढे चालविणार्‍या व कोलकत्ता येथील धर्मादास मिशनरीच्या माजी प्रमुख सिस्टर निर्मला जोशी यांचे २३ जून रोजी हृदयाच्या झटक्याने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.


०८. मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रभावित होऊन निर्मला जोशी यांनी रोमन कॅथलिक धर्माचा स्वीकार केला होता. मदर तेरेसायांचा वारसा पुढे नेणार्‍या निर्मला यांच्याकडे १९९७ मध्ये मिशनरीज ऑफ चॅरीटीजचे प्रमुखपद सोपविण्यात आले होते. केंद्र सरकारने २००९ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते.


०९. चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दूसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुराम खिंडीतून जातो.हिमालयातील सिक्कीम नथुला मार्ग समुद्र सपाटीपासून ४००० मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्‍यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती.


१०. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या वेबसाईटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चाहत्यांनी सचिनला हा गौरव बहाल केला आहे. या सर्वेक्षणासाठी २१व्या शतकातील १०० सर्वोत्तम कसोटी खेळाडुंमधून एका खेळाडुची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला होता. 


११. तर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. या सर्वेक्षणात तब्बल १६००० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २३ टक्के लोकांनी सचिन तेंडुलकर तर १४ टक्के लोकांनी कुमार संगाकाराच्या नावाला पसंती दिली.


१२. नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय दाता परिषद २५ जून रोजी पार पडली. या परिषदेत भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुन:उभारणीसाठी भारत तब्बल १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले.


१३. आता एक अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार असून, आणखी एक अब्ज डॉलरची मदत पुढील पाच वर्षांत करण्यात येणार असून, एकूण मदतीचा आकडा दोन अब्ज डॉलरवर गेला आहे. नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काही भागांची पाहणी केली.


१४. याच परिषदेत चीनने ४८.३ कोटी डॉलरची मदत जाहीर केली असून, नेपाळच्या शाश्वत विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, चीन ‘सिल्क रोड फंड’ मधून वेळोवेळी मदत करणार असून, पुढील वर्षभरात दीड हजार नेपाळी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांनी जाहीर केले.


१५. तसेच जपाननेही २६ कोटी डॉलरची मदत नेपाळसाठी जाहीर केली आहे. यातून घरे, शाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.२५ एप्रिल भूकंपामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे ९००० लोक मृत्यूमुखी पडले.


१६. शहरी भारताचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा २५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. १०० स्मार्ट शहरांचा विकास, अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन (एएमआरयूटी) तसेच पंतप्रधान आवास योजना, ही शहर विकासाची सुसाट इंजिने मानल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत


१७. ‘फोर्ब्स‘ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील १०० सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात येते. 

११. यंदा प्रसिद्ध झालेल्या यादीत भारतातील चार महिला आहेत. यामध्ये  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधति भट्टाचार्य (३० व्या स्थानी),  आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर (३५ व्या स्थानी), बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ (८५ व्या स्थानी) आणि  हिंदुस्तान टाईम्स माध्यम समुहाच्या अध्यक्षा शोभना भारतीया (९३ व्या स्थानी) यांचा समावेश आहे. 

१३. फोर्ब्सच्या या यादीत भारतीय वंशाच्या इंदिरा नुयी (पेप्सिकोच्या अध्यक्षा) आणि पद्मश्री वॉरियर (सिस्को टेक्नॉलॉजीच्या प्रमुख) याही आहेत. फोर्ब्सच्या आज १२ वी वार्षिक यादी प्रसिद्ध केली आहे.  अँजेला मर्केल यांच्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी, दानकर्त्या मेलिंडा गेट्स व फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत.

१४. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे


पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जहीर अब्बास यांनी स्वीकारली आहेत. बार्बाडोस येथील आयसीसीच्या तीन दिवसीय वार्षिक परिषदेदरम्यान अब्बास यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
जहीर अब्बास यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे.


१५. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने संयुक्त राज्य अमेरिका (युएसए) क्रिकेट संघाचे आयसीसीमधील सदस्यत्व रद्द केले आहे.संपूर्ण विचार करून अमेरिका क्रिकेट संघाला निलंबित केल्याचे आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी सांगितले.

१६. अमेरिकेच्या सुप्रिम कोर्टाने शुक्रवारी संपूर्ण देशात समलैंगीक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने हा निर्णय देताना लग्नाचा अधिकार सर्वांना आहे आणि त्यात भेदभाव असू शकत नाही असे म्हटले आहे.न्यायालयाच्या या निकालाचे कोर्टाबाहेर बहुसंख्येने उपस्थित असलेल्या समलैंगिकांनी स्वागत केले असून कोर्टाबाहेरच आनंदाने जल्लोष केल्याचेही समजते.


१७. अमेरिकेतील ३७ राज्यांनी यापूर्वीच समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयामुळे आता उर्वरित १४ राज्यांनाही ही मान्यता देणे बंधनकारक ठरले आहे. ख्रिश्चन परंपरावादींनी मात्र न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

१८. पायाभूत सुविधांचे जाळे व तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने औरंगाबादेत जास्तीत जास्त गुंतवणूक यावी आणि उद्योग उभारले जावेत असा प्रयत्न उद्योग विभागातर्फे सुरू आहे.मंत्रालयात बुधवारी तुर्कस्तानच्या राजदूतांबरोबर झालेल्या बैठकीत याचाच प्रत्यय आला. तुर्कस्तान सरकारने औरंगाबादेत जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सुचवले. 

१९. राज्यात गुंतवणूक न केलेले अनेक देश आता पुढे येत आहेत.तुर्कस्तानची इच्छा त्या देशाचे राजदूत सब्री एरगन यांनी बोलून दाखवली, असे सांगून देसाई म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, पर्यटन व हाउसिंगच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुर्कस्तान तयार आहे.

२०. दिल्लीत दुसरे विमानतळ उभारण्यात येणार असून यासाठीच्या प्रस्तावाला विमान प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर ग्रुपच्या वतीने चालवण्यात येते. त्यामुळे नवीन विमानतळासाठीही या ग्रुपचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे विमानतळ प्राधिकरण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले.

२१. विमान प्राधिकरण मंत्रालयाने नुकताच हा प्रस्ताव मंजूर केला. तो लवकरच कॅबिनेटकडे पाठवण्यात येणार आहे. हे नवीन विमानतळ उभारण्यासाठी नियमांचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण नियमानुसार पहिल्या विमानतळाच्या चोहोबाजूंनी १५० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात नवे विमानतळ उभारता येत नाही.

२२. देशात प्रथमच उत्तर प्रदेश सरकारने १ जुलै रोजी “नो ऍक्‍सिडेंट डे‘ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या दिवशी राज्यातील सर्वच भागातील अपघात रोखणे शक्‍य होणार नाही. पण अपघातप्रवण भागामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून पोलिस तैनात करण्यात येतील.

२३. व्यावसायिक वाहन उद्याेग क्षेत्रात महिंद्रा अँड महिंद्रा समूहाच्या कंपनीने छाेट्या आकाराची नवीन ‘जिताे’ ही मिनी ट्रक बाजारात आणली आहे, त्याबाबत कंपनीचे कार्यकारी संचालक डाॅ. पवन गाेयंका यांनी जहिराबाद (तेलंगणा) येथे कार्यक्रमात घाेषणा केली.याच वेळी महाराष्ट्रातील चाकण प्रकल्पात पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल चार हजार काेटींची गुंतवणूक करून त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

२४. राज्यात प्रथमच ५०० गावांत सॅटेलाईट आधारित पीकविमा योजना लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केली असून ही योजना यशस्वी ठरली तर राज्यातील सर्व गावांसाठी ती टप्प्याटप्प्याने राबविली जाईल असेही त्यांनी सांगितले.

२५. ही योजना सध्या प्रायोगिक पातळीवर सुरू केली जात आहे. खरीप मोसमासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली आहे.या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांना बियाणे, खते शेतकर्‍यांपर्यंत वेळेत पोहोचतात वा नाही यावरही लक्ष केंद्रीत करण्याचे व त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.