सौरभ वर्मा उपविजेता

०१. भारताच्या सौरभ वर्माला बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत फ्रान्सच्या पाचव्या मानांकित  लुकास कोव्र्हीने सरळ सेटमध्ये सौरभवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. लुकासने ४३ मिनिटांच्या लढतीत बिगरमानांकित सौरभचा २१-१९, २१-१९ असा पराभव केला.
नेमबाजी विश्वचषकात भारताला तीन सुवर्णपदके
०१. आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. शुभंकर प्रामाणिक, संभाजी पाटील यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले. 

०२. शुभंकर प्रामाणिकने अझरबैजान येथे सुरू असलेल्या स्पर्धेत २०५.५ गुणांची कमाई करत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात बाजी मारली. चेक प्रजासत्ताकच्या फिलीप नेपेजचॅल (२०५.२) आणि रोमानियाच्या ड्रॅगोमीर लोर्डाचे (१८५.१) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. 

०३. या स्पर्धेत २७ देशांतील २७९ नेमबाजांनी सहभाग घेतला आहे. पात्रता फेरीत शुभांकरने ६१३.८ गुणांसह सहावे स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 

०४. संभाजीने २५ मीटर स्टॅण्डर्ड पिस्तूल प्रकारात भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने ५६२ गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाच्या सेर्गेई इव्हग्लेव्हस्की (रौप्य) आणि जेम्स अ‍ॅशमोर (कांस्य) यांना पराभूत केले. 

०५. सांघिक प्रकारातही संभाजीने गुरमीत आणि रितुराज सिंग यांच्यासह दिवसातील तिसरे सुवर्ण जिंकले. याच्यासह भारताने रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले.


०६. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गायत्री निथ्यानदम, सोनिका आणि आयुशी पोद्दार यांचा या संघात समावेश होता.हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला ए.पी.ए.क्यू.जी चे सदस्यत्व
०१. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. हे सदस्यत्व ‘मतदानाच्या हक्कासह पूर्ण सदस्यत्व’ या वर्गातील आहे.

०२. एपीएक्युजीचे सदस्यत्व इंटरनॅशनल एअरोस्पेस क्वॉलिटी ग्रुप अंतर्गत प्राप्त करणारा भारत हा जगात सातवा देश आहे. 
इतर देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि जपानचा समावेश आहे, असे कंपनीने निवेदनाद्वारे कळविले आहे.

०३. एअरोस्पेस क्वॉलिटीमध्ये सुधारणा घडविण्याचे काम करणाऱ्या एअरोस्पेस क्वॉलिटीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एचएएल जागतिक पातळीवर पोहोचला आहे. आता एचएएल जागतिक पातळीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ शकेल तसेच सध्याचा आणि नवा दर्जा सुधारणे व त्याचा आढावा घेणे यातही त्याला भाग घेता येईल, असे एचएएलचे मुख्य कार्यकारी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी सांगितले.भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद
०१. भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनने एक परिषद स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. चीनमधील हुनान प्रांतात या परिषदेचे मुख्यालय राहील. भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीन सरकारने स्थापन केलेली ही पहिली अधिकृत सरकारी संस्था ठरणार आहे.

०२. चायना कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ इंटरनॅशनल ट्रेड (सीसीपीआयटी) ही ती संस्था स्थापन केली जाणार आहे. तिचा कार्यकाळ २ वर्षांचा राहील. हुनानमधील सीसीपीआयटीच्या उप समितीचे चेअरमन हे जियान यांनी नव्या संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली. 

०३. हुनानची प्रांतिक राजधानी चांगशा येथील सीसीपीआयटीच्या कार्यालयातूनच नव्या संस्थेचे कामकाज चालेल. नवी दिल्ली व हैदराबाद येथेही कार्यालये असतील. भारतात होणाऱ्या चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहित करणे तसेच समन्वय करणे ही कामे संस्था करील.

०४. भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय व्यापार ७0,७१ अब्ज डॉलरचा आहे. २0१५ मध्ये चीनची जागतिक आयात-निर्यात २४.५९ निखर्व युआन होती. गेल्याच महिन्यात भारत-चीन वित्तीय वाटाघाटी झाल्या. त्यावेळी चीनचे वित्त उपमंत्री शी योआबीन यांनी सांगितले होते की, गेल्या वर्षीपर्यंत चीनची भारतातील गुंतवणूक ४.0७ अब्ज डॉलर होती.जनधन व मुद्रा योजनेत महाराष्ट्र पहिला 
जनधन आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आलं आहे. मुद्रा योजनेमुळे घरी व्यवसाय करणाऱ्या तसेच लघु, मध्यम आणि कुटिरोद्योग करणाऱ्यांनाही कर्ज मिळेल. त्यांची आर्थिक प्रगती होईल.