डिजिटल लॉकरमध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी
०१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘डिजिटल लॉकर योजने’चा देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. या लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते. 


०२. अवघ्या दीड वर्षात २६ लाख ६६ हजार ८३२ इतके नागरिक हे लॉकर वापरत आहेत. 
फेब्रुवारी २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. सध्या डिजिटलचे युग असल्याने सर्वच क्षेत्रांत पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. प्रदूषणामुळे आशियात दरवर्षी ८ लाख लोकांचा मृत्यु
०१. आग्नेय आशियात दरवर्षी आठ लाख लोकांचा हवा प्रदूषणाशी निगडित विकाराने मृत्यू होतो, त्यातील ७५ टक्के मृत्यू हे हृदयविकार व फुप्फुसाच्या कर्करोगाने होतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. जगात दहापैकी ९ व्यक्ती खराब हवा नाकावाटे आत घेत असतात. 

०२. हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ९० टक्के मृत्यू हे कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील आहेत. तीनपैकी दोन मृत्यू हे आग्नेय आशियात होत असतात.

०३. वाहतुकीची अकार्यक्षम साधने, घरात वापरण्याची खराब इंधने, कोळसा प्रकल्प व औद्योगिक प्रदूषण यामुळे हवेचे प्रदूषण होत असते. 

०४. यातील ९४ टक्के मृत्यू असंसर्गजन्य रोग म्हणजे हृदयरोग, पक्षाघात व श्वासाच्या विकारांनी होतात. फुप्फुसाचा कर्करोग व हवेचे प्रदूषण यांचा जवळचा संबंध आहे. 

०५. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी किमान ७,९९,००० लोक हवा प्रदूषणाने मरतात. 

०६. २०१६ मध्ये भारतात ६,२१,१३८ लोकांचा मृत्यू झाला. भारतात हृदयरोग, श्वसनाचे विकार व फुप्फुसाचा कर्करोग यांचे प्रमाण जास्त आहे. 

०७. भारतात हृदयरोगाने २,४९,३८८ लोकांचा मृत्यू होतो, तर १,९५,००१ लोकांचा पक्षाघाताने मृत्यू होतो. श्वसनाच्या रोगाने १,१०,५०० तर फुप्फुसाच्या कर्करोगाने २६,३३४ लोकांचा मृत्यू होतो. भारतातील माहिती २०१२ मधील आकडेवारीच्या आधारे आहे. ९४ टक्के अकाली मृत्यू हे फुप्फुसाचा कर्करोग व श्वसनाच्या विकारांनी होतात.मराठी सक्तीचा मार्ग मोकळा
०१. महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ मार्च १९९३ व १५ सप्टेंबर १९९३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे इयत्ता पाचवी ते दहावी या शिक्षणक्रमासाठी मराठी माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा विषय म्हणून अनिवार्य केला होता. 

०२. ते धोरण संविधानातील अनुच्छेद १४, २९ व ३० मधील अनुक्रमे कायद्यापुढे समानता, अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचे संरक्षण आणि शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क यांचा भंग करणारे आहे, असे म्हणत जुहू पार्ले एज्युकेशन सोसायटी आणि इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

०३. मात्र हे धोरण अनुच्छेद १४, २९ व ३० यांचा भंग करत नाहीत असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने जुहू पार्ले एज्युकेशन सोसायटी आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर या प्रकरणात न्यायनिर्णयाद्वारे दिलेला आहे.

०४. महाराष्ट्र शासन या निर्णयास अनुसरून मराठी माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या महाराष्ट्र आणि केंद्रीय शिक्षण मंडळे, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळे व अन्य शिक्षण मंडळांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेला मराठी विषयाचा अभ्यासक्रम अनिवार्य करू शकेल.कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत गगनजितला विजेतेपद
०१. भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

०२. गगनजितचा एशियन टूरमधील सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाऱ्या २८ वर्षीय गगनजितने चार राऊंडमध्ये ६८, ६६, ६८ व ६७ गुणांची (कार्ड) खेळी केली. 

०३. गगनजितने जबरदस्त खेळी करून झिम्बाब्वेचा स्कॉट व्हिन्सेंट आणि स्थानिक गोल्फपटू तेईवू किमला एका शॉटच्या अंतराने मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले. 
गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण १ लाख ९६ हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले. 

०४. तसेच गगनजितने एशियन टूरमध्ये २०१३ मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते.जपानचे ओहसुमी यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल
०१. जपानचे ख्यातनाम शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पेशींमधील विघटन आणि पुनर्रचनेविषयी संशोधन केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

०२. योशिनोरी ओहसुमी 
हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजे मायक्रोबायॉलॉजिस्ट असून त्यांचा जन्म १९४५ मध्ये जपानमधील फुकूओका येथे झाला. १९७४ मध्ये त्यांनी टोकियो विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील विद्यापीठात त्यांनी तीन वर्ष काम केल्यावर ते पुन्हा टोकियोत परतले आणि १९८८ मध्ये त्यांनी संशोधन गटाची स्थापना केली. २००९ पासून ते टोकियोतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
०३. ओहसुमी यांनी १९९० च्या दरम्यान पेशींमधील ऑटोफाजी याविषयी संशोधन केले होते. यानुसार पेशींचे विघटन करुन त्यांची पूनर्रचना होणे शक्य असल्याचे त्यांच्या संशोधनातून समोर आले होते. या संशोधनातून मधूमेह, कर्करोग आणि अन्य रोगांवरील उपचारपद्धतीमध्ये मदत झाली.

०४. ७१ वर्षीय ओहसुमी यांना १९९० मध्ये कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटने सर्वोत्तम संशोधनासाठी सन्मानित केले होते. २०१२ मध्ये ओहसुमी यांना जागतिक पातळीवर मिळवलेल्या यशासाठी जपानमधील क्योटो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

०५. जपानचे योशिनोरी ओसुमी हे संशोधनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी त्यांनी पेशींच्या स्वभक्षणावर संशोधनासाठी १९८८ मध्ये वेगळी प्रयोगशाळा सुरू केली. 

०६. मानवी शरीरात लायसोसोम नावाचा जो भाग असतो त्यातील ऑरगॅनेलीत प्रथिनांचा ऱ्हास कसा होतो, याचा शोध घेताना त्यांनी यिस्टच्या पेशींचा अभ्यास केला. पेशींची आत्महत्या किंवा स्वनाश होतो पण यातही खराब पेशीतील काही भाग काढून ते लायसोसोमकडे फेरवापरासाठी पाठवले जातात.

०७. मानवी शरीरातील पेशींचा मृत्यू व नवीन पेशी निर्माण होणे या प्रक्रियेत बिघाड झाला तर अनेक रोग होतात.

०८. यिस्टच्या पेशी इतक्या लहान असतात की सूक्ष्मदर्शकातूनही ही प्रक्रिया उलगडणे शक्य नव्हते त्यामुळे ओसुमी यांनी नवीन युक्ती करताना यिस्टमधील व्हॅकुलीच्या प्रथिन ऱ्हासाची प्रक्रिया प्रथम बिघडवली व त्याचा परिणाम पेशींचे स्वभक्षण म्हणजे ऑटोफॅगीवर काय होतो ते तपासले. 

०९. यिस्टच्या पेशीत उत्परिवर्तन करून त्यांच्यातील ऑटोफॅगी प्रक्रिया थांबवून परिणाम तपासले. त्यानंतर व्हॅक्युओलीत ऱ्हास न झालेल्या प्रथिनांची म्हणजे व्हेसिकलची गर्दी झाली. 

१०. या प्रक्रियेशी संबंधित जनुकेही त्यांनी शोधून काढली. त्याबाबतचा शोधनिबंध १९९२ मध्ये प्रसिद्ध झाला. 

११. १९५० मध्ये पेशींमधील ऑर्गनेलीचा शोध लागला होता. त्यात प्रथिने, कबरेदके व मेद यांना पचवणारी विकरे शोधली गेली होती. पेशीतील हे कार्य करणारा भाग म्हणजे लायसोसोम व तेथे पेशी नष्ट केल्या जातात किंवा ज्यात शक्य असेल तिथे दुरुस्त केल्या जातात. लायसोसोमच्या शोधासाठी बेल्जियमचे ख्रिस्तीयन द डय़ुव यांना १९७४ मध्ये वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

१२. सुरुवातीला ओहसुमी हे  रसायनशास्त्राकडे वळले पण त्यात फार संधी नाही, असे समजल्याने ते रेणवीय जीवशास्त्राकडे वळले. त्यांना नोकरी नव्हती, मग त्यांनी एका विद्यापीठात उंदरातील बाह्य़पात्र फलनाचा अभ्यास केला. 

१३. नंतर त्यांनी यिस्टच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या ज्या शोधाला नोबेल मिळाले. तो शोध त्यांनी वयाच्या ४३व्या वर्षी लावला होता. ते वैद्यकशास्त्रात नोबेल मिळवणारे जपानचे सहावे संशोधक आहेत. आतापर्यंत जपानच्या २३ जणांना विविध शाखांत नोबेल मिळाले आहे.