भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर 

०१. ब्रिटिशवंशीय शास्त्रज्ञ डेव्हिड थोउलेस, डंकन हेल्डन आणि मायकल कोस्टेरलिट्स यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. मंगळवारी नोबेल पुरस्कार समितीने पुरस्काराची घोषणा केली. द्रव्याच्या स्थितीवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे तिघेही ब्रिटिश वंशाचे असले तरी काम अमेरिकेत करतात.


०२. डॉ. थोउलेस (वय ८२) हे वॉशिंगटन विद्यापीठात, डॉ. हेल्डन (वय ६५) हे प्रिंन्स्टन विद्यापीठ तर डॉ. कोस्टेरलिट्स (वय ७३) हे ब्राऊन विद्यापीठात कार्यरत आहेत. भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सेसने त्यांना नोबेल पुरस्कारची घोषणा केली आहे. 

०३. १९८० च्या दशकात त्यांनी हे संशोधन केले होते. दशकापूर्वी केलेल्या संशोधनास नोबेल पुरस्कार क्वचितप्रसंगीच देण्यात येतो.
०४. आठ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (९३६००० डॉलर किंवा ८३४००० युरो) व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. थोलेस यांना निम्मी रक्कम, तर उर्वरित रक्कम हाल्डेन व होस्टरलित्झ यांना अर्धी-अर्धी मिळणार आहे. १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

०५. अद्भुत गुणधर्माच्या द्रव्यांची गुपिते उलगडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.ज्या क्षेत्रात द्रव्य विचित्र अवस्था धारण करते अशा एका नव्या शाखेचे दार या वैज्ञानिकांनी खुले केले आहे व त्यांनी या द्रव्याच्या वेगळ्या अवस्था व त्यातील बदल यावर संशोधन केले आहे. 


०६. अतिवाहक पदार्थ, महाद्रायू (सुपरफ्लुइड्स) व चुंबकीय पटले यावर त्यांचे पायाभूत संशोधन आहे. द्रव्यांच्या काही अवस्थांत त्यांचे गुणधर्म फार वेगळे असतात व त्यांचा वापर विविध कामांसाठी करता येतो, अशी नवी संकल्पना त्यांनी मांडली.

०७. संघनन द्रव्य भौतिक विज्ञानात या संशोधकांचे कार्य मोठे आहे. १९८० मध्ये थोलेस यांनी विद्युत वाहक थरांमध्ये काही प्रयोग करून त्यातील अवस्थांतरे टिपली होती. त्याचवेळी डंकन व हाल्डेन यांनी काही पदार्थात आढळणाऱ्या लहान चुंबकांच्या मालिकांचे गुणधर्म उलगडले होते. 

०८. वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ इलेक्ट्रॉनिक्स, अतिवाहक व पुंज म्हणजे क्वांटम संगणकात कसे वापरता येतील. द्रव्य व अवकाश यांच्या भौतिक गुणधर्माना विचलित करणाऱ्या बलांचे अस्तित्व ते असताना बाधित होत नाहीत, त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. क्वांटम संगणकात ही कामगिरी मोलाची ठरली आहे. अतिवाहकता ही कमी तापमानाला असते, पण जास्त तापमानाला ती नष्ट का होते याचे कोडे त्यांनी उलगडले.

०९. टोपोलॉजी नावाची एक शाखा भौतिकशास्त्रात आहे, जिच्यात गणितीय पद्धतीने एखाद्या पदार्थाच्या स्तरातील बदल किंबहुना विद्युतवाहकतेसारखे गुणधर्म तपासले जातात. 


१०. कोस्टरलित्झ व थोलेस यांनी अनेक पदार्थाच्या पातळ थरांच्या विद्युत गुणधर्माचा अभ्यास केला. ते सर्व द्विमिती पदार्थ होते. हाल्डेन यांनी एक मिती धाग्यांच्या रूपातील पदार्थाचे गुणधर्म गणितशास्त्रीय पद्धतीने अभ्यासले. 

११. पदार्थाचे अवस्थांतर त्यांचे गुणधर्म बदलवत असते. बर्फाचे पाणी, पाण्याची वाफ ही तापमानावर अवलंबून असलेली अवस्थांतरे आहेत, ती आपल्याला दिसत असतात. थोलेस, हाल्डेन व कोस्टरलित्झ यांनी असे दाखवून दिले, की याशिवाय विद्युत गुणधर्मातील बदलही पदार्थात घडतात. काही वेळा विद्युतरोध कमी तापमानाला संपून जातो व तो पदार्थ अतिवाहक बनतो म्हणजे त्यातून सगळीच्या सगळी वीज इकडून तिकडे वाहून नेली जाते. हे सगळे अवस्थांतरातून घडते. त्याचा अभ्यास गणिताच्या मदतीने करता येतो.


दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या घटली
०१. जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीनंतरदेखील जगभरातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत १० कोटींची घट झाली आहे, अशी माहिती जागतिक बँकेकडून देण्यात आली. 

०२. बँकेच्या नव्या आकडेवारीनुसार, २०१३ साली तब्बल ७६.७ कोटी लोकांचे प्रतिदिन उत्पन्न १.९ डॉलरएवढे होते. अगोदरच्या वर्षात (२०१२) हा आकडा ८८.१ कोटी होता. 

०३. आशियातील लोकांच्या उत्पन्नात अधिक वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती असूनसुद्धा दारिद्र्य नष्ट करीत सर्व देशांची समृद्धीकडे सुरु असलेली वाटचाल उल्लेखनीय आहे, असे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी व्यक्त केले.निवृत्तीनंतर राष्ट्रपती राहणार ३४, कलाम रोड बंगल्यात
०१. जुलै २०१७ मध्ये मुखर्जी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर ते एपीजे अब्दुल कलाम रस्त्यावरील ३४ क्रमांकाच्या बंगल्यात राहणार आहेत. वर्ष २०१२ मध्ये पी. संगमा यांना पराभूत करून प्रणव मुखर्जी राष्ट्रपती बनले होते.

०२. सध्या हा बंगला लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत पी. संगमा यांना वितरित करण्यात आले आहे. या बंगल्यात सध्या संगमा यांचे कुटुंबीय राहतात. संगमा यांचे पुत्र कॉनराड हे मेघालयच्या तुरा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. संगमा यांचे याचवर्षी ४ मार्च रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या मागे मुलगी अगाथा संगमा आणि मुले जेम्स आणि कॉनराड आहेत.

०३. कॉनराड हे पहिल्यांदाच लोकसभेवर गेले आहेत त्यामुळे त्यांना टाईप-VIII प्रकारचा बंगला देता येत नाही. या प्रकारचे बंगले हे उच्च श्रेणीमध्ये येतात. सरकारकडे टाईप VIII प्रकारच्या बंगल्यांची कमतरता आहे. संगमा कुटुंबीयांना हा बंगला रिकामा करावा लागेल अशी माहिती नागरी विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

०४. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २५ जुलै २०१२ रोजी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून पदभार घेतला होता. तत्पूर्वी मुखर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण, अर्थ मंत्रालयासारखी महत्वाची खाती सांभाळली आहेत. ते १९६९ पासून पाचवेळा राज्यसभेचे सदस्य तर २००४ पासून दोन वेळा त्यांनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे.अभय योजनेत १३००० कोटी केवळ हैद्राबादमधून

०१. अघोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या अभय योजनेत सर्वाधिक काळा पैसा असलेल्या शहरात हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली आघाडीवर आहेत. 

०२. या योजनेत देशभरातून ६५ हजार कोटी रूपये काळा पैसा समोर आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. 

०३. यातील निम्म्याहून अधिक रक्कम या तीन शहरातून आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्वाधिक काळा पैसा हा हैदराबादमध्ये असून येथून १३ हजार कोटी रूपयांच्या अघोषित उत्पन्नाचा खुलासा झाला आहे. मुंबई आणि दिल्लीतून आठ-आठ हजार कोटी रूपयांची संपत्ती उजेडात आली आहे. ही सर्व रक्कम एकूण रक्कमेच्या ३० टक्के इतकी आहे. 

०४. सर्वाधिक कमी अघोषित उत्पन्न हे केरळ आणि ओडिशा या राज्यातून झाले आहे. येथून ५०० कोटींहून कमी रक्कम मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.आकांक्षा हगवणे जागतिक युवा बुद्धिबळ विजेती
०१. पुण्याच्या आकांक्षा हगवणेने रशियात झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेच्या विजेतेपदावर नाव कोरले. या कामगिरीदरम्यान तिला दुसरा आंतरराष्ट्रीय महिला मास्टरचा नॉर्म मिळाला. मागील वर्षी सेऊल येथे झालेल्या स्पध्रेत तिला पहिला नॉर्म मिळाला होता.

०२. खँटी मॅनसिस्क येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत १६ वर्षांखालील मुलींच्या गटात भारताच्या आकांक्षाला १२वे मानांकन देण्यात आले होते. मात्र आकांक्षाने ११ फेऱ्यांमध्ये नऊ गुणांची कमाई करीत जेतेपद पटकावले. तिने आठ सामने जिंकले, दोन बरोबरीत सोडवले, तर सातव्या फेरीत रशियाच्या पोलिना शुवालोव्हाविरुद्ध तिला पराभवाचा धक्का बसला. शेवटच्या फेरीत तिने पोलंडच्या अ‍ॅलिसजा स्लिविकाला नमवले.

०३. आकांक्षाच्या खात्यावर या स्पध्रेआधी २३६२ गुण जमा होते, यात आता ९८ गुणांची भर पडणार आहे. येत्या गुणांकनांच्या यादीत आकांक्षा २३०० गुणांचा टप्पा ओलांडणार आहे. जे महिला ग्रॅण्डमास्टरच्या बरोबरीचे आहेत.

०४. मागील दोन महिन्यांत आकांक्षाने जिंकलेली ही तिसरी महत्त्वाची स्पर्धा आहे. १६ वर्षांखालील वयोगटासाठी राष्ट्रकुल अजिंक्यपद पटकावल्यानंतर कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पध्रेत १७ वर्षांखालील वयोगटात ती अजिंक्य ठरली होती.

०५. जागतिक स्पध्रेत १४, १६, १८ वयोगटांत भारताचे एकंदर १८ मुले आणि मुली सहभागी झाले होते. यापैकी फक्त आकांक्षाला पदक जिंकण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पध्रेत तिला थेट आणि विशेष प्रवेश देण्यात येणार आहे. या विजयाचे श्रेय आकांक्षाने आपल्या वडिलांना आणि प्रशिक्षक जयंत गोखले यांना दिले.
किरेन डिसूझाची ऐतिहासिक कामगिरी
०१. नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने १ ऑक्टोबरला ऐतिहासिक कामगिरी करताना जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या २४६ किलोमीटर अंतराची ‘स्पार्टाथॅलोन’ यशस्वीपणे पूर्ण केली. या वार्षिक स्पर्धेचे आयोजन ग्रीसच्या अथेन्स आणि स्पार्ट यांच्यादरम्यान करण्यात आले होते.

०२. अशी कामगिरी करणारा २३ वर्षीय किरेन भारताचा पहिला स्पर्धक ठरला. त्याने हे अंतर ३३ तास ३ मिनिट २५ सेकंद वेळेत पूर्ण केले. या शर्यतीदरम्यान त्याने १०० मैल अंतर १८.३७ तासांमध्ये पूर्ण करण्याचा पराक्रम करताना १५९.५ किलोमीटर अंतरावर असलेला ४७ वा चेक पॉर्इंट गाठला.

०३. सहभागी ३७० स्पर्धकांमध्ये त्याला ८६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. शर्यत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांसाठी पुरस्कार नव्हता. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा ओलिव्हच्या पानाचा मुकुट देऊन गौरव करण्यात आला आणि पुरस्कार म्हणून इरोटस नदीचे जल प्रदान करण्यात आले.

०४. २०१२ पासून किरेन या शर्यतीसाठी तयारी करीत होता. या शर्यतीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय ठरला. तसेच या शर्यतीपूर्वी किरेनला ६० किलोमीटर अंतराच्या शर्यतीचा ‘अल्ट्रा मॅराथॉनपटू’ म्हणून गौरविण्यात आले होते.

०५. गत वर्षी किरेनने १०० मैलांची सालोमन भट्टी लेक्स अल्ट्रा मॅरेथॉन जिंकून सर्वांत वेगवान भारतीय अ‍ॅथलिटचा मान मिळवला होता. 
किरेन डिसूझा लद्दाखची २२२ किलोमीटर अंतराची अल्ट्रा शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय अ‍ॅथलिट होण्याचा मान मिळवला होता.‘कॉफिन’मध्ये पार्किन्सन विरोधी गुणधर्म
०१. कॅफिनमधील काही रासायनिक संयुगे पार्किन्सन रोगाची वाढ थोपवतात असे दिसून आले आहे. पार्किन्सन आजारात चेतासंस्थेत बिघाड होऊन अनियंत्रित थरथर, स्नायू जड होणे हे आजार होतात व हालचालींवर मर्यादा येतात. मध्यम व वयस्कर लोकांत हे दिसून येते. 

०२. मेंदूतील डोपॅमाइन तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने हे घडते. न्यूरॉन्सचा एकमेकांशी संवाद डोपॅमाइनमुळे होत असतो. ए सायन्युक्लीन हे प्रथिन डोपॅमाइनचे नियंत्रण करीत असते. पार्किन्सनमध्ये हे प्रथिन गुंडाळलेल्या अवस्थेत राहून डोपॅमाइन तयार करणारे न्यूरॉन्स मरतात. एक प्रथिन चुकीचे गुंडाळले गेले तर त्यामुळे अनेक वाईट परिणाम होतात.कॅनडातील सासकाटचेवान विद्यापीठ याबाबत संशोधन करीत आहे.   

०३. सध्याच्या उपचारात शिल्लक न्यूरॉन्समध्ये डोपॅमाइनला उत्तेजन दिले जाते, पण ते केवळ पुरेसे न्यूरॉन्स उरलेले असतील तरच उपयोगाचे असते. डोपॅमाइन निर्माण करणाऱ्या पेशी वाचवण्यासाठी ए सायन्युक्लीन प्रथिनाची चुकीची घडी होणे टाळले पाहिजे, असे जैव रसायनशास्त्रज्ञ जेरेमी ली यांनी सांगितले.

०४. यातील आव्हाने बरीच असली तरी बायफंक्शनल डिमर औषधांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. कॅफिन स्कॅफोल्डचा उपयोग पार्किन्सन रोखण्यासाठी होऊ शकेल असे दिसत आहे. 

०५. निकोटिन, मेटफॉर्मिन व अमिनाइनडन या रसायनांचा समावेश अभ्यासात करण्यात आला, त्याबरोबर रसागिलाइन या औषधाचाही त्यात समावेश होता. यीस्टच्या प्रारूपावर काही प्रयोग करण्यात आले असता एएस प्रथिन हे पार्किन्सन ज्यामुळे होतो त्या पेशींना मरण्यापासून रोखते असे दिसून आले आहे.