उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर
०१. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा, तसेच व्यवसाय सुरू करण्याची पद्धती सोपी व सहज करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे. 


०२. आंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.


०३. केंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन) ने सोमवारी उद्योग व्यासायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात महाराष्ट्राला ९ क्रमांकावर दर्शविण्यात आले आहे.

०४. यात गुजरातचीही घसरण झाली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात पहिल्या स्थानावर होते.

०५. क्रमवारी
१.तेलंगणा, आंध्रप्रदेश  २.गुजरात  ३.छत्तीसगड  ४.मध्यप्रदेश  ५.हरियाणा  ६.झारखंड  ७.राजस्थान  ८.उत्तराखंड  ९.महाराष्ट्रदिल्लीमध्ये होणार आपत्ती व्यवस्थापन परिषद
०१. आपत्तीची संभाव्यता आणि तीव्रता कमी करण्याच्या संदर्भात गेल्या वर्षी जपानमध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापनविषयक परिषदेतील निर्णयांच्या अंमलबजावणीची रूपरेषा तयार करणे. तसेच या कामात विविध देशांनी परस्परांना सहकार्य करणे, मदतीची देवाणघेवाण आदी विषायांवरील आशियाई देशांची तीन दिवसांची मंत्री परिषद ३ नोव्हेंबर पासून दिल्लीत सुरू होणार आहे. 

०२. परिषदेच्या अखेरीस आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा “दिल्ली जाहीरनामा” जारी केला जाणार आहे. या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची यामध्ये मुख्य भूमिका असेल. 

०३. जपानसह सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. 
एकंदर चार हजार प्रतिनिधी परिषदेस उपस्थित राहतील. यामध्ये सुमारे ११०० परदेशी प्रतिनिधी असतील, तर अन्य उपस्थितांमध्ये राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे प्रमुख, तज्ज्ञ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अव्वल
०१. नीती आयोगाच्या वार्षिक अहवालात महाराष्ट्र सर्वाधिक शेती अनुकूल राज्य ठरले आहे. शेतीपूरक योजनांच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे. 

०२. परंतु उद्योग क्षेत्रात राज्याची पिछेहाट झाली असून महाराष्ट्र तब्बल दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. औद्योगिक क्षेत्रात आंध्र प्रदेशाने पहिले स्थान पटकावले आहे.

०३. कृषी क्षेत्रात महाराष्ट्रानंतर गुजरात आणि राजस्थानने स्थान पटकावले आहे. कृषी क्षेत्रात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड, तामिळनाडू व जम्मू काश्मीर या राज्यांची स्थिती वाईट आहे.


०४. औद्योगिक क्षेत्रात २०१५ साली पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरातची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने बाजी मारली आहे. भारत पाकिस्तानातील ८ अधिकाऱ्यांना परत बोलावणार
०१. भारताने पाकिस्तानातील आपल्या आठ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली.

०२. पाकिस्तानने सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. गुप्तहेरी प्रकरणी पाकिस्तान भारताच्या दोन अधिकाऱ्यांना माघारी पाठवणार असल्याच्या चर्चा सुरू होती. 

०३. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एक अधिकाऱ्याला गुप्तहेरी प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पाकिस्तानचे सहा अधिकारी माघारी गेले आहेतव्हाईट हाऊसमध्ये ओबामांनी साजरी केली दिवाळी०१. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी केली. ओबामा यांनी २००९ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती. यंदाही ही परंपरा कायम राखली.


०२. आगामी काळात नवे राष्ट्राध्यक्ष ही परंपरा कायम राखतील, अशी आशाही यावेळी ओबामा यांनी व्यक्त केली.

०३. संयुक्त राष्ट्रसंघामध्येही यंदा प्रथमच दिवाळी साजरी करण्यात आली असून, त्यानिमित्त येथील मुख्यालयावर रोषणाई करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीवर लावलेली ‘हॅप्पी दिवाली’ हे शब्द आणि पारंपरिक दिव्याची प्रतिकृती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

०४. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प भारतीय समुदायापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांच्या सुनेने व्हर्जिनियातील एका हिंदू मंदिरात जाऊन दिवाळी साजरी केली आहे. ट्रम्प यांच्या एरिक या मुलाची पत्नी लारा ट्रम्पने हिंदू मंदिरात जाऊन दिवाळी साजरी केली.