साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे
डोंबिवलीत होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी एकतर्फी विजय मिळवला. 


डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासह प्रसिद्ध गीतकार-कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी व जयप्रकाश घुमटकर हे मैदानात होते. डॉ. काळे यांनी मोठे मताधिक्य मिळवीत बाजी मारली.

संमेलनाध्यक्ष झालेले नागपुरातील साहित्यिक
ग. त्र्यं. माडखोलकर
आ. रा. देशपांडे (कवी अनिल)
कुसुमावती देशपांडे
वि.भि. कोलते
वामनराव चोरघडे
राम शेवाळकर
मारुती चितमपल्ली
डॉ. अक्षयकुमार काळे

विजय चौधरीची महाराष्ट्र केसरी हॅट्ट्रिक
‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा प्रबळ दावेदार असलेल्या जळगावच्या विजय चौधरीने अनुभव आणि तांत्रिकदृष्ट्या सरस खेळाच्या जोरावर पुण्याचा प्रतिभावा युवा मल्ल अभिजित कटके याचे आव्हान परतवून लावत प्रतिष्ठेच्या गदेवर आपले नाव कोरले. 

डबल महाराष्ट्र केसरी विजयने सलग तिसऱ्यांदा कुस्ती क्षेत्रातील ही सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. 

मुंबईच्या नरसिंग यादवनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसराच मल्ल ठरला.कोहलीने केली सर ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी
इंग्लिश गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत असलेल्या विराट कोहलीने भारत आणि इंग्लंडमध्ये मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत द्विशतक साजरं केलंच, त्या सोबतंच त्याने माजी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

एका वर्षात ३ द्विशतकं ठोकत कोहलीने ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

यावर्षी वेस्ट इंडिज विरोधात कोहलीने पहिलं द्विशतक केलं तर त्याचं दुसरं द्विशतक न्यूझिलंडविरोधात इंदोर कसोटीत आलं. मुंबई कसोटीत त्याने २३५ धावा काढून वर्षातलं तिसरं द्विशतक साजरं केलं.अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी जपानने सोडले रॉकेट
पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या अंतराळातील कचरा काढण्यासाठी आणि त्यांची निर्मिती कमी करण्यासाठी जपानने एक यान सोडले आहे. 

या यानाला अर्धा मैल म्हणजेच ७०० मीटर लांब शेपटी जोडलेली असून ती अॅल्युमिनियमचे तुकडे आणि स्टीलच्या तारांनी बनविलेली आहे. निट्टो सीमो कं. या मासेमारी कंपनीच्या सहकार्याने हे उपकरण तयार करण्यात आले आहे.

अंतराळात सध्या १० कोटी कचऱ्याचे तुकडे असल्याचा अंदाज आहे. यात जुने उपग्रह, उपकरण आणि रॉकेटचे भाग यांचा समावेश आहे. याला कूनोतोरी असे नाव देण्यात आले असून जपानी भाषेत त्याचा अर्थ करकोचा असा होतो.

यातील काही भाग अत्यंत वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यांचा वेग २८,००० प्रति तास आहे.  पृथ्वीभोवती फिरणाऱ्या दळवळणाच्या उपग्रहांना त्यामुळे भयंकर अपघात किंवा हानी होऊ शकते.

सोव्हियत रशियाने १९५७ साली ‘स्पुटनिक’ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला होता. तेव्हापासून हा कचरा जमा झाला आहे.

दक्षिण जपानच्या तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून शुक्रवारी या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या दिशेने ते झेपावले आहे. या रॉकेटची शेपटी अंतराळातील वस्तूंची भ्रमणकक्षा बदलून त्यांना वातावरणाच्या दिशेने ढकलेल. तिथे या वस्तू जळून जातील.जगातील सर्वांत मोठा बोगदा कार्यान्वित
जगातील सर्वांत मोठा बोगदा असलेल्या स्वित्झर्लंडमधील गॉटहार्ड बेस टनेलमधून रविवारी प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. या बोगद्याचे उद्घाटन यंदा जूनमध्ये करण्यात आले होते.

रविवारी झ्युरिच ते लुगानो रेल्वे प्रवासी घेऊन या बोगद्यातून धावली.

हा बोगदा ५७ किलोमीटरचा आहे. तो बांधण्यासाठी १७ वर्षे लागली असून, त्यासाठी १.८ कोटी डॉलर खर्च आला आहे. या बोगद्याच्या बांधणीत पारंपरिक ब्लास्ट अँड ड्रिल या तुलनेने जोखमीच्या पद्धतीऐवजी टनेल बोअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
भारतचा व्हिएतनामशी नवा नागरी अणुकरार
व्हिएतनामसोबत एक नवा नागरी अणुकरार भारताने केला आहे. भारताला या कराराद्वारे दक्षिण-मध्य एशियन देशांमधील व्हिएतनामसोबतचे मित्रत्वाचे नाते आणखी मजबूत करता येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

मोदी म्हणाले की, हा करार आण्विक शक्तीच्या शांततापूर्ण उपयोगासाठी केला आहे. 

व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षा थी किम गान यांनी भारताला भेट देऊन हा करार केला असल्याची माहिती विकास स्वरुप यांनी प्रसारमाध्यमांना दिलीमॉरिशसमध्ये रंगणार आगरी साहित्य संमेलन
आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे १५ वे आगरी साहित्य संमेलन या वर्षी सातासमुद्रापार म्हणजेच मॉरिशसमध्ये २५ ते २७ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान होत आहे. 

वाशीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत आगरी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी ही घोषणा केली.

या संमेलनामध्ये कवीवर्य अशोक नायगवाकर, कवी अरुण म्हात्रे, कवी डॉ. मेहश केळुस्कर, डॉ. विश्वास मेहंदळे यांचा सहभाग असेल. संमेलनामध्ये स्थानिक साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे.