सुषमा स्वराज यांना ‘ग्लोबल थिंकर्स’च्या यादीत स्थान
०१. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना २०१६ ग्लोबल थिंकर्सच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.


०२. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, संयुक्त राष्ट्राच्या महासचिव बान की मून, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल आणि अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल लॉरेटा लिंच यांच्यासह स्वराज यांनी ‘डिसिजन मेकर्स’च्या श्रेणीत स्थान मिळवले आहे.

०३. त्यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरचा योग्य वापर केल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यापासून ते पासपोर्टमध्ये केलेल्या बदलांसाठी त्यांनी ट्विटरचा वापर आक्रमकपणे केला होता. 

०४. त्यामुळे सुषमा स्वराज यांना ‘कॉमन ट्विपल्स लीडर’चा किताबही देण्यात आला आहे.एलआयसी अध्यक्षपदी व्ही.के. शर्मा यांची निवड
०१. आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष म्हणून व्ही. के. शर्मा यांची सरकारने बुधवारी निवड केली. शर्मा यांची निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

०२. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने व्ही. के. शर्मा यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून शर्मा यांना ८० हजार रुपये फिक्स्ड वेतन दरमहा देण्याचे नक्की केले आहे. 

०३. १९८१ मध्ये शर्मा एलआयसीमध्ये डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर या पदावर रुजू झाले. एलआयसीमध्ये त्यांनी एलआयसी हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. शर्मा हे सध्या एलआयसीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.ग्रीसमध्ये अडीच हजार वर्ष जूने शहर सापडले
०१. ग्रीसमधल्या पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अथेन्सपासून काही किलोमीटर अंतरावर एका शहराचा शोध लागला आहे. गेले अनेक वर्ष याबाबत संशोधन सुरु होते. त्यामुळे हे शहर ‘लॉस्ट सीटी’ म्हणून ओळखले जात होते. 

०२. उत्खनना दरम्यान सापडलेले हे शहर अडीच हजार वर्ष जूने असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणारे रॉबीन रॉनल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्खनन सुरु असून, या शहराचे क्षेत्रफळ ९९ एकरमध्ये पसरलेले असावे. 

०३. काही मनोरे, भितींचे अवशेष यांचे संशोधन करत असताना येथे शहर असावे असा अंदाज संशोधकांनी बांधला. काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाला इसवी सन पूर्व ५०० शतकातील जुनी मातीची भांडी आणि काही नाणी देखील या ठिकाणी सापडली होती.

०४. नव्याने शोध लागलेले हे ठिकाण उत्तर अथेन्सपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. थायलंडच्या नव्या राजाकडून दीडलाख कैद्यांना माफी
०१. थायलंडचे जगातील् सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले राजे भूमिबोल अदुल्यादेज यांच्या निधनानंतर गादीवर आलेल्या राजा महा वजिरालाँगकॉर्न यांनी देशातील दीड लाख कैद्यांची शिक्षा माफ करण्याची अथवा शिक्षा कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 

०२. रॉयल राजपत्रात या संदर्भातली घोषणा प्रसिद्ध केली गेली आहे. यात थायलंडमध्ये सर्वात मोठा गुन्हा मानला जाणारा शाही अपमान या गुन्ह्याखाली कैदेत असलेल्यांचाही समावेश केला गेला आहे. थायलंडमध्ये शाही अपमान या गुन्ह्यासाठी अत्यंत कडक कायदे आहेत. 

०३. मात्र याचा फायदा बलात्कार व हत्येखाली तुरूंगात असलेल्या कैद्यांना मिळणार नसल्याचेही स्पष्ट केले गेले आहे.मंगळावर बोरॉनच्या अस्तित्वाचा दावा
०१. मंगळावर बोरॉनचे अस्तित्व प्रथमच दिसून आल्याने तेथील भूजल हे प्राचीन काळात सक्ष्मजीवसृष्टीस अनुकूल होते असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे.

०२. मंगळावरील कॅल्शियम सल्फेटच्या ज्या खुणा आहेत, त्यात बोरॉन सापडला असेल, तर तेथील परिस्थिती पृथ्वीप्रमाणेच एके काळी असावी असे म्हणता येते व तेथे भूजल असावे, त्याचे पीएच मूल्य उदासीन ते अल्कलाइन दरम्यान असावे व हे ० ते ६० अंश तपमानाला सापडलेल्या कॅल्शियम सल्फेट वाहिकांमध्ये सापडलेल्या बोरॉनमुळे दिसून येते, असे अमेरिकेतील ‘लॉस अल्मॉस नॅशनल लॅबोरेटरी’चे पॅट्रिक गॅसदा यांनी म्हटले आहे.

०३. मंगळावरच्या रोव्हर गाडीवर लावण्यात आलेल्या केम कॅम म्हणजे रासायनिक रचनेचा अभ्यास करणाऱ्या कॅमेऱ्याने मंगळावर बोरॉन असल्याचा शोध लावला आहे.

०४. बोरॉनचा संबंध कोरडवाहू जमिनीशी असतो जेथे पाण्याचे बाष्पीभवन झालेले असते पण क्युरिऑसिटी रोव्हरने शोधलेल्या बोरॉनचे पर्यावरण परिणाम अजून चर्चेत आहेत. क्युरिऑसिटी रोव्हरने जसा उंचावर प्रवास केला तेव्हा तेथे जास्त माती व जास्त बोरॉन दिसून आला.अँडी आणि जेमी मरे आयटीएफचे सर्वोत्कृष्ट खेळाडू
०१. अँडी मरे आणि त्याचा भाऊ जेमी मरे यांची आयटीएफचे (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. एकाच वर्षात पुरुष विभागात एकेरी आणि दुहेरीत दोन भावांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

०२. महिला विभागात एकेरीत अँजेलिक किर्बर सर्वोत्कृष्ट ठरली. स्टेफी ग्राफ (१९९६) नंतर प्रथमच जर्मनीची खेळाडू या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. 

०३. अँडी मरे याने या मोसमात विंबल्डनसह एकूण नऊ विजेतीपदे मिळविली. त्याचबरोबर ऑलिंपिकचे दुसरे सुवर्णपदकही पटकावले. मोसमाची अखेरची स्पर्धा जिंकून मरेने जागतिक क्रमवारीत जोकोविचला देखील मागे टाकले. 

०४. दुहेरीत जेमी मरे आणि ब्रुनो सोआरेस, तर महिलांमध्ये कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्तिना म्लाडेनोविच यांनी हा पुरस्कार मिळविला.शशिकला एआयडीएमकेच्या महासचिव
०१. शशिकला नटराजन यांना जयललिता यांच्या निधनानंतर ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्‌च्या महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा पक्षाचे प्रवक्ते पोनैय्या यांनी आहे.

०२. शशिकला नटराजन या पक्षाच्या सदस्या नव्हत्या. पण त्यांच्या नियुक्तीसाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्याची तयारी असल्याचे देखील पक्षप्रवक्त्यांनी म्हटले आहे. 

०३. २०११ साली शशिकला यांच्यावर जयललिता यांच्यावर स्लो पॉइजनचा प्रयोग केल्याच्या आरोप झाला होता.  जयललिता यांच्या त्या नंतर जवळच्या मानल्या जाऊ लागल्या. जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत मोदी
०१. जगातील सर्वाधिक शक्तीशाली ‘टॉप १०’ व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलल्या या यादीत नवव्या क्रमांकावर नरेंद्र मोदी यांचे नाव आहे.

०२. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सलग चौथ्या वर्षी यादीतील पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

०३. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनाही दहाव्या क्रमांकावरील स्थान मिळाले आहे.

०४. यंदाच्या वार्षिक यादीमध्ये जगातील १०० कोटी लोकांमधून एका व्यक्तीची निवड करण्यात आली असून अशा ७४ सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींचा यात समावेश आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे.

०५. या यादीत रोमन कॅथलिक चर्चचे पोप फ्रान्सिस, बिल ऍण्ड मेलिंदा गेटस्‌ फाऊंडेशनचे बिल गेटस्‌, गुगलचे संस्थापक आणि ‘अल्फाबेट’चे अध्यक्ष लॅरी पेज यांचाही समावेश आहे.ट्रंप यांच्या आर्थिक सल्लागार समितीत इंद्रा नूयी
०१. भारतीय वंशाच्या व पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आर्थिक सल्लागार समितीत नियुक्ती केल्याचे जाहीर केले गेले आहे. 

०२. नूयी यांच्याबरोबरच स्पेसएक्स व टेस्लाचे संस्थापक इलोन मस्क व उबरचे सीईओ ट्रेविस कालानिक यांचीही या समितीत निवड केली गेली आहे.

०३.  विशेष म्हणजे अध्यक्षपद निवडणुक काळात नूयी या हिलरींच्या समर्थक होत्या तर मस्क यांनी ट्रंप कधीच चांगले नेते होऊ शकत नाहीत असे मत व्यक्त केले होते.

०४. प्रशासनाने मात्र अमेरिकेत व्यवसाय वातावरण वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रासह काम करणार असल्याचे व सरकार अमेरिकेत नवीन नोकर्‍या निर्माण करण्यासाठी खासगी क्षेत्राला सवतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.