एल्फिन्स्टन रोड आता प्रभादेवी
०१. मुंबईतील एका विमानतळाचा व एका रेल्वेस्थानकाचा नामविस्तार आणि दुसऱ्या एका रेल्वेस्थानकाचे नामांतर करण्यास शुक्रवारी विधानसभेत एकमताने मंजुरी दिली.


०२. विधानसभेने मंजूर प्रस्तावानुसार ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई’ याचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई’ असा करण्यात येणार आहे. 

०३. छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वेस्थानकाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, असा करण्यात येणार आहे, तर एल्फिन्स्टन रोड या रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘प्रभादेवी’ असे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

०४. सीएसटी स्थानकाचे आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे नाव होते.तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी कोची येथे देशातील पहिली निवासी शाळा
०१. शैक्षणिकक्षेत्रात प्रगत असलेल्या केरळमध्ये या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल उचलले गेले असून केरळमधील कोची येथे देशात प्रथमच तृतीयपंथीय मुलांसाठी निवासी शाळेची स्थापना होणार आहे. 

०२. या शाळेचे नाव सहज आंतरराष्ट्रीय विद्यालय असे असून येथे तृतीयपंथीय मुलांना राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती या तृतीयपंथीय कार्यकर्त्या विजयराज मल्लिका, माया मेनन आणि फैसल सीके यांनी दिली.

०३. या विद्यालयात सुरुवातीला १० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार असून मुक्त शाळा पद्धतीच्या अभ्यासक्रमानुसार हे विद्यार्थी १० किंवा १२ वीची परीक्षा देतील अशी माहिती देण्यात आली आहे. 

०४. या शाळेचा शुभारंभ ३० डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती कल्की सुब्रमण्यम यांनी दिली. ट्रांस इंडिया फाउंडेशनच्या सहा कार्यकर्त्या ही शाळा चालविणार आहेत.

०५. या शाळेसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी एक अपंग आहे आणि एक परराज्यातील आहे.स्थलांतरात भारत पहिल्या क्रमांकावर
०१. अन्य देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. १.५६ कोटी भारतीय परदेशात राहत असल्याची बाब ‘प्यू रिसर्च’च्या अहवालातून समोर आली आहे. 

०२. तर इतर देशाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित नागरिक राहतात. 

०३. जागतिक लोकसंख्येच्या ३.३ टक्के लोक आंतरराष्ट्रीय प्रवासी असल्याचेही यात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

०४. यात म्हटले आहे की, २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३५ लाख भारतीय संयुक्त अरब अमिरातमध्ये राहतात.  स्थलांतरित राहत असलेला हा जगातील सर्वात मोठा दुसरा भाग आहे.  

०५. मेक्सिको – अमेरिकेशिवाय संयुक्त अरब अमिरात आणि पार्शियन खाडीत अन्य देशांत राहणाऱ्या भारतीयांची संख्या गत दशकात वाढली आहे.१९९० मध्ये ही संख्या २० लाख होती, २०१५ मध्ये ८० लाख झाली. तेलाने समृद्ध असलेल्या या भागात बहुतांश लोक उत्पन्नाच्या आशेने गेलेले आहेत.क्यूपार्टिनोच्या  महापौरपदी सविता वैद्यनाथन
०१. कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टीनो शहराच्या महापौरपदी प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकी महिला निवडून आली आहे. 

०२. अ‍ॅपलच्या मुख्यालयामुळे हे शहर जगभर ओळखले जाते. सविता वैद्यनाथन यांनी क्यूपर्टीनोच्या नव्या महापौर म्हणून गेल्या आठवड्यात शपथ घेतली. 

०३. एमबीए पदवीधारक सविता यांनी माध्यमिक शाळेत गणिताच्या शिक्षक म्हणून तसेच व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून काम केले आहे.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग कालवश
०१. नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे मेरिलँड येथे मंगळवारी निधन झाले. शिलिंग यांनी हार्वर्ड तसेच मेरिलँड विद्यापीठात प्राध्यापकी केली होती. 

०२. शिलिंग यांना २००५मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते.स्पर्धात्मक परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या गणितीय गेम थिअरीचा त्यांनी प्रभावी वापर केला होता.नगराध्यक्षांचे अधिकार वाढविले
०१. राज्य सरकारने नगराध्यक्षांचे अधिकार वाढविणारे महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५, यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता सादर केलेले विधेयक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताच्या आधारावर मंजूर केले. 

०२. या विधेयकानुसार आता नगराध्यक्षांना पहिल्या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून सभेचे संचालन करता येईल. तसेच उपाध्यक्षाच्या निवडणुकीत समान मते पडल्यास निर्णायक अतिरिक्त मत देण्याचा अधिकारही नगराध्यक्षांना राहणार आहे.

डॉ. माशेलकर ‘एनएआय’चे फेलो
०१. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अमेरिकेच्या प्रतिष्ठीत नॅशनल अॅकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्सचे (एनएआय) फेलो म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.

०२. ‘एनएआय’ ही संस्था अमेरिकी पेटंट मिळवलेल्या जगभरातील नामवंत संशोधकांची फेलो म्हणून निवड करते. 

०३. ‘एनएआय’चे फेलो म्हणून निवड झालेले डॉ. माशेलकर हे भारतात राहून संशोधन करणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. २०१६ या वर्षासाठी ‘एनएआय’ने जगभरातील १७५ ज्येष्ठ शास्त्रज्ञांची फेलो म्हणून निवड केली असून, त्यात भारतामधून डॉ. माशेलकर यांचा एकमेव सहभाग आहे. 

०४. बौद्धिक स्वामित्व हक्क या विषयामधील योगदान आणि सर्जनशीलतेच्या चळवळीच्या उभारणीसाठी डॉ. माशेलकर यांची एनएआयचे २०१६ या वर्षाचे फेलो म्हणून निवड झाली आहे. 

०५. बोस्टन येथे सहा एप्रिल २०१७ रोजी होणाऱ्या सहाव्या वार्षिक समारंभात डॉ. माशेलकर यांचा फेलो म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.रॉ प्रमुखपदी अनिल कुमार तर आयबीचे राजीव जैन
०१. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्तचर संघटना रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ) आणि देशांतर्गत गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांच्या नव्या प्रमुखांच्या नियुक्त्या शनिवारी करण्यात आल्या.

०२. रॉच्या प्रमुखपदी अनिल कुमार धसमना तर आयबीच्या प्रमुखपदी राजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांचाही कार्यकाळ प्रत्येकी दोन वर्षांचा असेल. 

०३. धसमना हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मध्य प्रदेश केडरचे असून केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विशेष सचिव होते. त्यांनी रॉमध्ये २३ वर्षे सेवा बजावली आहे. 

०४. जैन हे १९८0 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते झारखंड केडरचे असून आयबीमध्येच विशेष संचालक पदावर कार्यरत होते. दिनेश्वर शर्मा यांच्याकडून १ जानेवारी रोजी ते कार्यभार स्वीकारतील.रावत नवे लष्करप्रमुख तर धनोआ हवाई दलाचे प्रमुख
०१. भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने आज लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली.

०२. तर नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचे नाव जाहीर केले आहे. 

०३. सध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेतील. दोन महिन्यांपूर्वीच रावत यांच्याकडे लष्कराचे उपप्रमुखपद सोपविण्यात आले होते. १९७८ मध्ये गोरखा रायफल्समधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती.

०४. लष्करप्रमुख कोण असेल, हे ठरविण्याचा केंद्र सरकारचा अधिकार असला तरी रावत यांच्याहून वरिष्ठ असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्करप्रमुखपद दिले आहे.

०५. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

०६. धानोआ सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या लढाऊ विमानांमधून उड्डाण केले असून, कारगिल युद्धावेळी रात्रीच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांनी थेट सहभाग घेतला आहे.एमसीए अध्यक्षपदाचा पवारांचा राजीनामा
०१. लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

०२. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची कमाल मर्यादा निश्‍चित केली आहे. 

०३. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व शिफारशी मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्वीकारल्या असल्याचे सांगण्यात येत असून, आता त्यांच्या राजीनाम्याबाबत व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे.

०४. शरद पवार हे यापूर्वी दोनवेळा एमसीएचे अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती.