१०० टक्के आधार असणाऱ्या राज्यामध्ये हिमाचलचा समावेश
०१. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, तेलंगाणा, हरियाणा, पंजाब व चंडीगड राज्यांनंतर आता हिमाचल प्रदेशही १०० टक्के आधार कार्ड वितरीत करणारे राज्य बनले आहे. या यादीतले हे सहावे राज्य बनले आहे. 

०२. हिमाचल प्रदेशातील ७२ लाख ५२ हजार ८८० नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे.न्यूटनच्या जुन्या पुस्तकाची ३.७ अब्ज डॉलर्सला विक्री
०१. आयझॅक न्यूटन यांच्या गतिविषयक तीन नियमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची बांधणीची प्रत (बाऊंड कॉपी) लिलावात ३.७ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या प्रचंड रकमेला विकली गेली आहे.


०२. आजवर कुठल्याही लिलावात विकण्यात आलेले शास्त्रीय विषयावरील हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक आहे.

०३. १६८७ साली लिहिण्यात आलेले ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’ या पुस्तकाचे वर्णन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी “बहुधा आजवर कुठल्याही माणसाने केलेली सगळ्यात मोठी बौद्धिक प्रगती”, असे केले होते.

०४. बकऱ्याच्या कातडीने झाकलेल्या या पुस्तकासाठी १ ते दीड अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी किंमत येईल, अशी ‘ख्रिस्तीज’ या ऑक्शन हाऊसला अपेक्षा होती.भारताचे युवा जुनियर हॉकी संघ ‘जगज्जेते’
०१. भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २ – १ ने पराभवाची धूळ चारून ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. 

०२. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारतीय संघाने विश्वचषक पटकावला होता. तब्बल १५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला.व्हेनेझुएलात नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर
०१. बँकांमध्ये झालेली गर्दी, नोटांची कमतरता आणि देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी शनिवारी नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. आता जानेवारीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

०२. सरकारने १०० बोलिव्हरची नोट रद्द करून ५००, २००० आणि २०००० बोलिव्हरची नवी नोट बाजारात आणली होती. तसेच नोटा बदलून घेण्यासाठी फक्त ७२ तासांचा वेळ देण्यात आला होता.

०३. व्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून, सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे. देशातील काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. दातार यांना ‘गल्फ इंडियन एक्सलन्स’ पुरस्कार
०१. ‘मसालाकिंग’ म्हणून ज्ञात असलेले ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय (जय) दातार यांना ‘एनडीटीव्ही’तर्फे ‘गल्फ इंडियन एक्सलन्स’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 

०२. दुबई क्रीक हाइट्स येथील हयात रिजन्सी हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात ‘ओम्नियत प्रॉपर्टीज’ या मालमत्ता विकास कंपनीचे विक्री व विपणन संचालक मोहम्मद हमीद यांच्या हस्ते हा पुरस्कार दातार यांना प्रदान करण्यात आला.

०३. डॉ. दातार यांना संयुक्त अरब अमिरातीत (युएई) रिटेल सेवांमध्ये दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.तुर्कीमध्ये रशियन राजदुताची हत्या
०१. रशियाचे तुर्कीमधील राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कार्लोव्ह आज येथील एक प्रदर्शनास भेट देण्यास गेले असताना त्यांच्यावर एका बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला. विश्वसुंदरीचा क्राऊन स्टेफनी डेलने पटकावला
०१. २०१६ चा विश्वसुंदरीचा क्राऊन प्यूएर्तो रिकोच्या स्टेफनी डेल वेलाने पटकावला असून स्टेफनी डेले वेनाला डोमिनिकन रिपब्लिक आणि इंडोनेशियाच्या सौंदर्यवतींना मागे टाकत विश्वसुंदरी २०१६चा मान मिळाला.

०२. स्पॅनिश, इंग्लिश आणि फ्रेंच भाषा १९ वर्षीय स्टेफनी डेल वेनेला अवगत असल्यामुळे मनोरंजन विश्वात करिअर करण्याची तिची इच्छा आहे.स्टेफनीला २०१५ची विश्वसुंदरी स्पेनची मिरिया लालागुनाने मुकुट परिधान केला. 


०३. फर्स्ट रनरअप मिस डॉमिनिकन रिपब्लिक यारिट्झा मिगुएलिना रेयेस रमिरेज ठरली तर मिस इंडोनेशिया नताशा मॅनुएला सेकंड रनरअप होती.  केनिया आणि फिलिपाईन्सच्या सौंदर्यवतींनीही पहिल्या पाचमध्ये जागा मिळवली.

०४. भारताची प्रियदर्शनी चॅटर्जी ब्युटी कॅटेगरीच्या टॉप फाईव्हमध्ये पोहोचली. पण मुख्य स्पर्धेत तिला जागा मिळवता आली नाही. फेमिना मिस इंडिया २०१६ ची विजेती प्रियदर्शनी मूळची गुवाहाटीची असून ती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी आहे.पाकिस्तानातही नोटबंदी, संसदेत प्रस्ताव मंजूर
०१. भारताने नोटाबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही हाच कित्ता गिरवला आहे. पाकिस्तानच्या संसदेने सोमवारी ५ हजाराची नोट बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

०२. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी टप्प्या टप्प्याने ५ हजार रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाकिस्तानने दीड महिन्याच्या कालावधीनंतर हे पाऊल उचलले आहे.

०३. ही नोट बंदी ३ ते ५ वर्षात टप्प्या टप्प्याने लागू केली जाईल, असं वृत्त पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलं आहे.देशातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नागपुरात
०१. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प सुरू करण्याचा प्रयोग देशात प्रथम नागपूर महापालिकेने सुरू केला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा नागपूरचा हा प्रयोग देशात ७० ठिकाणी विविध शहरात केला जाईल.


०२. सोलापूरच्या एनटीपीसी वीज प्रकल्पासाठी उजनी धरणातील शुद्ध पाण्याऐवजी पुनर्वापर केलेले पाणी वापरण्यात येईल. त्याचप्रमाणे परळी वीज केंद्रासाठी नांदेड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.