चंदीगढ होणार देशातले पहिले कॅशलेस शहर
०१. केंद्रशासित चंदीगढ देशातले पहिले कॅशलेस शहर बनत असून १० डिसेंबरपासून या शहरातील सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. 


०२. त्यासाठी प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून त्यानुसार सर्व ई संपर्क केंद्रांना डिजिटल मोडने पेमेंट स्वीकारण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.
त्यासाठी कार्ड स्वॅप मशीन्सची पूर्तताही केली गेली आहे.

०३. १० डिसेंबरपासून प्रशासन कार्यालयात रोख रकमेने भरणा करता येणार नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.‘अमूल’ बाजारात आणणार उंटाचे दूध
०१. आगामी तीन महिन्यात ‘अमूल’ उंटाचे दूध बाजारपेठेत आणणार आहे.

०२. या दुधाच्या उत्पादनाचा प्रकल्प कच्छ येथे तयार असून हे दूध ५०० मिली च्या पॅकींगमध्ये उपलब्ध होणार आहे. उंटाचे दूध बाजारपेठेत उपलब्ध करून देणारा ‘अमूल’ हा देशातील सर्वप्रथम ब्रँड’ ठरणार आहे.जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘सुवर्ण’नायक राजकिशोर
०१. शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय हवाई दलाच्या नायक राजकिशोरने ७० किलो गटात जगज्जेतेपदाला गवसणी घालून भारताच्या खात्यावर दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली. 

०२. त्यानंतर ८० किलो गटावर वर्चस्व गाजवताना ए. बॉबी सिंगने सुवर्णपदक आणि प्रमोद सिंगने कांस्यपदक प्राप्त केले.

०३. जागतिक शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्तीशी निगडित स्पर्धाच्या दुसऱ्या दिवशी भारताने दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदकांची कमाई करीत एकंदर पदकांची संख्या आठपर्यंत (३ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य) अशी वाढवली आहे. 


०४. यजमान थायलंडने पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि एक कांस्यपदकासह शनिवारी ११ पदके मिळवताना आपली एकंदर पदकसंख्या २६पर्यंत वाढवली आणि वर्चस्व अबाधित राखले.

०५. गुवाहाटीच्या नॉर्थ फ्रंटियर रेल्वेत नोकरी करणाऱ्या ४३ वर्षीय बॉबीला हे पाचवे सुवर्णपदक मिळाले आहे. याआधी त्याने चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदके मिळाली होती.प्रफुल्ल पटेल आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी
०१. आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या ज्येष्ठ उपाध्यक्षपदी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

०२. पटेल यांच्या उपाध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये भारताला २०१७ साली होणा-या फिफाच्या १७ वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे.‘हार्ट ऑफ एशिया’ परिषद  
०१. अमृतसरमध्ये होत असलेली ‘हार्ट ऑफ एशिया’ संघटनेची ही सहावी परिषद असून, तिचा मुख्य उद्देश दहशतवाद नष्ट करणे हा आहे.

०२. या परिषदेची सुरवात २ नोव्हेंबर २०११ मध्ये इस्तंबुलमध्ये झाली होती.

०३. अफगाणिस्तानामध्ये स्थैर्य आणि समृद्धी आणणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असून १४ देश या परिषदेचे सदस्य आहेत.

०४. या संघटनेमध्ये भारतासोबत अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, इराण, कझाकिस्तान, किर्घीस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान, तुर्कस्तान, तुर्केमिनिस्तान आणि संयुक्त अरब अमितराती यांचा समावेश आहे
मकाऊ ओपन स्पर्धेत सायनाचा पराभव
०१. भारताची बॅडमिंटन तारका आणि अव्वल मानांकित सायना नेहवाल हिला गत दोन लढतींतील संघर्षानंतर अखेर अपयशाचे तोंड पाहावे लागले.

०२. सायनाला मकाऊ ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी आपल्यापेक्षा २१६ रँकिंगने पिछाडीवर असणाऱ्या चीनच्या झांग यिमान हिच्याकडून १२-२१, १७-२१ असा सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला.‘सी हॉक्स’ टीमचा ओपन वॉटर स्वीमिंग’मध्ये जागतिक विक्रम
०१. अथांग सागर पार करण्याचे उद्दिष्ट ठेवून सूर मारणाऱ्या ‘सी हॉक्स’ या सहा जणांच्या टीमने शुक्रवारी गोव्यात अनोखा विक्रम नोंदवला.’ओपन वॉटर स्वीमिंग’ या प्रकारातील हा जागतिक विक्रम ठरला. 

०२. या टीमने आतापर्यंत एकूण ५४८ किलोमीटरचे अंतर पार केले. 

०३. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला ८ वर्षे पूर्ण झाली. हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर परमवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा जलतरणपटूंनी ही मोहीम मुंबईतून सुरु केली. त्याचा सहावा दिवस गोव्यात शुक्रवारी संपला. 

०४. गेट वे आॅफ इंडिया’पासून या मोहिमेस सुरुवात झाली होती. १००० किलोमीटरचे अंतर पार करुन गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डसाठी या टीमचा हा प्रयत्न आहे. ही मोहीम मंगळुरू येथे संपुष्टात येईल. १४ दिवस आणि ४ रात्री असा या जलतरणपटूंचा प्रवास असेल.केंद्र सरकारच्या जाहिरातींवर आतापर्यंत १,१०० कोटींचा खर्च
०१. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १ जून २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीतीलजाहिरातींच्या खर्चाचा तपशील दिला असून या संदर्भात ग्रेटर नोयडामधील माहिती अधिकार कार्यकर्ते रामवीर सिंह यांनी अर्ज दाखल केला होता.

०२. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश असलेल्या केंद्र सरकारच्या जाहिरातींवर आतापर्यंत १,१०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये टिव्ही, इंटरनेट, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचा समावेश असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.