मध्य प्रदेशचे आर्थिक वर्ष आता जानेवारी ते डिसेंबर
आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचे सूतोवाच निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केले होते.तिहेरी तलाक खटल्यात सलमान खुर्शिद यांची न्याय मित्र म्हणून नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या तिहेरी तलाक खटल्यात बुधवारी न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद यांची अमायकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती करण्याला मान्यता दिली. 

येत्या ११ मेपासून सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकची कायदेशीर वैधता ठरविण्यासाठी रोज सुनावणी घेण्यात येणार आहे.‘यूपी दिवस’ साजरा करण्याचा निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये यंदा २४ जानेवारी रोजी ‘यूपी दिवस’ साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. 

‘युनायटेड प्रॉव्हिन्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे नामकरण २४ जानेवारी १९५० मध्ये ‘उत्तर प्रदेश’ असे करण्यात आले. त्यामुळे २४ जानेवारी हा ‘यूपी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी राज्यातील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.उत्तर प्रदेशमध्ये गायींसाठी अत्याधुनिक रूग्णवाहिका
उत्तर प्रदेशमध्ये खास गायींसाठी रूग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. आजारी, जखमी असलेल्या गायींना या रूग्णवाहिकेतून गोशाळा किंवा पशु चिकित्सालयात नेण्यात येईल. या रूग्णवाहिकेत एक पशु वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक उपस्थित असेल. 

‘गोवंश चिकित्सा मोबाइल व्हॅन’ नावाच्या या सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी केले. गोरक्षा चिकित्सा मोबाईल व्हॅनची सुविधा सुरुवातीच्या कालावधीत अलाहाबाद, गोरखपूर, लखनऊ, मथुरा आणि वाराणसीत उपलब्ध असेल. 


त्याचबरोबर एक ‘गो सेवा टोल फ्री’ क्रमांकही जारी करण्यात आला आहे. या टोल फ्रीवरून नागरिक गायींची मदत करू शकतात. 

गायींसाठी रुग्णवाहिकेची सुविधा सुरु करणारे उत्तर प्रदेश राज्यातील दुसरे राज्य आहे. याआधी २७ एप्रिल रोजी मध्य प्रदेश सरकारने गायींसाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केले आहे. 
१५ मे रोजी सावलीविरहित दिवस
शून्य सावलीचा दिवस येत्या १५ मे रोजी मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. १५ मे रोजी मुंबईकरांच्या पायाखालची सावली नाहीशी होणार आहे. सूर्याच्या उत्तरायण ते दक्षिणायनमधील प्रवासात सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची जागा बदलत असल्याने हे घडणार आहे.

पाायाखाली सावली येऊन ती नाहीशी होण्याचा हा योग सूर्याच्या उत्तरायण ते दक्षिणायन अशा प्रवासातील कर्क आणि मकर वृत्तामधील प्रदेशात जुळून येणार आहे. या संयोगाला झिरो शॅडो असे म्हटले जात असून वर्षांतून दोन वेळा हा योग अनुभवता येतो. 

पृथ्वी ही लंबवर्तुळाकार असली तरी सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतानाच्या कक्षेस ती लंब नसून साडे तेवीस अंश कललेली आहे. यामुळेच पृथ्वीवर ऋतूची निर्मिती होत असून हिवाळ्यात रात्र ही दिवसापेक्षा मोठी आणि उन्हाळ्यात दिवस हा रात्रीपेक्षा मोठा असल्याची स्थिती निर्माण होते. 

त्याचप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणेदरम्यान साडे तेवीस अंश कलल्यामुळे सूर्योदयाची आणि अस्ताची क्षितिजावरील जागाही दररोज बदलते आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायनही होते. 

हा अनोखा अनुभव घेण्याची संधी महाराष्ट्रातील लोकांना वेगवेगळ्या दिवशी मिळणार आहे. ६ ते २० मे या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेळी ही घटना अनुभवता येईल.

वर्षभरातील मोठी काळरात्र असणाऱ्या २१ डिसेंबर रोजी सूर्यकिरणे ही सरळ दिशेने मकरवृत्तावर पडतात तर वर्षभरातील सर्वात मोठय़ा दिवशी म्हणजे २१ जून रोजी सूर्यकिरणे ही सरळ दिशेने कर्कवृत्तावर पडलेली असतात.

या दोंन्ही स्थितीमुळे सूर्यकिरणे ही वृत्ताच्या वेगवेगळ्या अंशावर वेगवेगळ्या दिवशी पडतात. याच कारणामुळे त्या अंशाखाली येणाऱ्या प्रदेशातील उभ्या वस्तूवर सूर्यकिरणे तळाशी पडतात आणि वस्तूंची सावली काही मिनिटांसाठी नाहीशी होते.चार बॉक्सिंगपटू जागतिक स्पर्धेसाठी पात्र
शिवा थापा, सुमीत संगवान, अमित फंगाल यांनी ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक निश्चित करतानाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. या तिघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली आणि त्यांचे पदक पक्के झाले.

९१ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या सुमीतने तृतीय मानांकित फेंगकाईवर ४-१ असा विजय मिळवला. 
४९ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या अमितने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या कॉर्नेलिस क्वांगू लांगूला ४-१ असे नमवले.

तिसऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे पदक पक्के करताना शिवाने तैपेईच्या च्यु इन लाइवर मात केली. शिवाने २०१३ आणि २०१५ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदकाची कमाई केली होती.