राज्यसरकारतर्फे वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल ‘ऍप’अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ‘ऍप’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. 


‘गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि.’ या कंपनीने बनविलेले Ambulance.run हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ‘ऍप’ आहे. 
या ‘ऍप’व्दारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने रुग्णसेवेचे आरक्षण करू शकतात.

‘गोल्डन हवर सिस्टीम्स’ ही औद्योगिक नीती तथा संवर्धन विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया प्रोग्रामद्वारे आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शिफारस केलेली कंपनी आहे.आता दिव्यांगांना मिळणार ‘युनिक कार्ड’
‘डिजिटल इंडिया’ कडे वाटचाल करताना पारदर्शकता यावी, विविध शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा, बोगस अपंग लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी आता दिव्यांगांना लवकरच रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणीही बोगस अपंगांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगांच्या विविध सवलती लाटणाऱ्यांवर शासनाने आता टाच आणली आहे. 

अपंगांसाठीच्या सवलती लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा, यासाठी युनिक कार्ड तयार करून देत कार्डधारक अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 

तसेच यासाठी लवकरच दिव्यांगांचा शासनातर्फे नव्याने सर्व्हे करण्यात येणार असून, खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना या ‘युनिक कार्ड’च्या माध्यमातून बाहेर काढले जाणार आहे. यासाठी देशभरातील दिव्यांगांच्या संख्येची माहिती एकत्रित केली जात आहे.भारत हा जगात दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक
इंटरनॅशनल स्टेनलेस स्टील फोरम (ISSF) च्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१६ मधील भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश म्हणून समोर आला आहे. 

२०१६ साली भारतात पोलाद उत्पादन वाढून ३.३२ दशलक्ष टनांवर (९% वाढ) पोहचले आहे.

चीन हा जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे. तिसर्‍या स्थानी जपान आहे.पंतप्रधानांच्या हस्ते आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेच्या ५२ व्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२-२६ मे २०१७ दरम्यान गांधीनगर, गुजरात येथे आयोजित आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन करण्यात आले. 

भारतात AfDB ची वार्षिक बैठक आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. .ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सैन्य, मनुष्यबळ, सांस्कृतिक आदी क्षेत्रांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून भारत-आफ्रिका संबंध राखले जात आहे. सध्या विकासाच्या दृष्टीने भारताच्या परदेशी व आर्थिक धोरणासंदर्भात आफ्रिका खंडाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.

भारत हा आफ्रिकेतील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. सन २०१०-११ ते सन २०१४-१५ या काळात भारत-आफ्रिकेमधील व्यापार दुप्पटीने वाढून $७२ अब्जवर पोहोचला होता. मात्र सन २०१५-१६ मध्ये हा व्यापार $56 अब्जवर घसरला. 

भारत-फ्रान्स ने स्थापन केलेल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) च्या दृष्टीने आफ्रिका एक महत्त्वपूर्ण प्रदेश आहे, कारण ISA सोबत जुळलेल्या २४ सदस्य राष्ट्रांमध्ये अर्ध्याहून अधिक राष्ट्रे आफ्रिका खंडातील आहेत.

आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक ग्रुप (AfDB) ही आफ्रिकन देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी लास्टोन एम. द्वारा स्थापित एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे. 
याचे मुख्यालय ट्यूनिस, ट्युनिशिया येथे आहे. यात ७८ देशांची सदस्यता आहे.

AfDB ची १० सप्टेंबर १९६४ रोजी स्थापना झाली आणि त्यात तीन संस्थांचा समावेश आहे. ते आहेत – आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, आफ्रिकन डेव्हलपमेंट फंड आणि नायजेरिया ट्रस्ट फंड. १९८३ साली भारत AfDB मध्ये सहभागी झाले.आश्विन ठरला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
भेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिलेल्या स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विन याला सीएट क्रिकेट रेटिंगच्या (सीसीआर) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले. 

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि आरपीजीचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते आश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यंदाच्या मोसमात भारताने घरच्या मैदानावर १३ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये आश्विनने प्रतिस्पर्धी संघांना आपल्या तालावर नाचवले. या दीर्घ मोसमामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ सामन्यांपैकी १० सामन्यांत बाजी मारली. 

विशेष म्हणजे आश्विनने गेल्या १२ महिन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करताना ९९ बळी घेण्याचा पराक्रम केला.लेनिन मोरेनो यांनी इक्वाडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली
लेनिन मोरेनो यांनी इक्वाडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.
पुढील चार वर्षांसाठी त्यांनी राफेल कोरिया यांच्याकडून पदभार घेतला.WHO चे नवीन महासंचालक: डॉ. टेडरोस अदानाम गिब्रेयेसस
जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे नवीन महासंचालक म्हणून डॉ. टेडरोस अदानाम गिब्रेयेसस यांची निवड करण्यात आली आहे. ते डॉ. मार्गारेट चॅन यांच्या जागेवर पदभार घेतील.

डॉ. गिब्रेयेसस यांचे इथियोपिया सरकारने नामांकन दिले होते आणि ते १ जुलै २०१७ पासून त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ सांभाळतील