NITI आयोगाकडून SATH कार्यक्रमाला सुरुवात
बदलत्या भारतासाठी राष्ट्रीय संस्थान (National Institution for Transforming India -NITI) आयोगाकडून सहकारी संघवादाच्या कार्यसूचीवर अंमलबजावणीसाठी ‘‘सस्टेनेबल अॅक्शन फॉर ट्रांसफार्मिंग ह्यूमन कॅपिटल (SATH) ’’ नावाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.


शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांति घडवून आणणे. आणि 
आरोग्य व्यवस्थेसाठी राज्यांचे तीन आगामी ‘रोल मॉडल’ यांची निवड करून त्यांचे निर्माण करणे. हे याचे लक्ष्य आहे.

NITI आयोगाकडे SATH कार्यक्रमाअंतर्गत 14 राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यामधून 5 प्रस्तावांची निवड करण्यात आली. 

राज्यांच्या अंतिम निवड ही विभिन्न आरोग्यासंदर्भात असलेल्या मानदंडांवर, जसे की प्रसूतिमृत्यु दर, बालमृत्यु दर, मलेरिया प्रकरणे इत्यादींच्या आधारावर केले जाईल. पुढे कार्यक्रमांतर्गत केल्या जाणार्‍या करारांमधून तीन राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबाजवणी केली जाणारफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल चॅम्पियनलाल मातीचा बादशाह असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने रोलां गॅरोवर लौकिकाला साजेशी कामगिरी करताना अंतिम लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव केला आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत विक्रमी १० व्यांदा जेतेपद पटकावले.

नदालने वावरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. 

तसेच कारकिर्दीतील २२ व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत खेळत असलेल्या नदालने फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा सेट न गमावता जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने केवळ ३५ गेम्स गमावले. त्यात अंतिम लढतीमध्ये गमावलेल्या सहा गेम्सचाही समावेश आहे.IOC ने २०२० टोकियो खेळांमध्ये १५ नवीन क्रीडाप्रकाराला मंजूरी दिली
आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) २०२० टोकियो ऑलिम्पिक खेळामध्ये खेळण्यात येणार्‍या क्रीडाप्रकारांमध्ये १५ नवीन क्रीडाप्रकारांना मंजूरी दिली आहे. 

यात 3-ऑन-3 बास्केटबॉल, मिश्र 4×400 मीटर रिले, मिश्र जलतरण, मिश्र ट्रायथलॉन, मिश्र सांघिक तिरंदाजी, BMX फ्रीस्टाईल यांचा समावेश आहे. 

यासोबतच टोकियो ऑलंपिकमध्ये ३२१ क्रीडाप्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जाणार. मिश्र क्रिडाप्रकारांची संख्या दुप्पट होऊन १८ इतकी झाली आहे.

IOC ही विश्वभरातील ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. याचे मुख्यालय लॉसेन, स्वित्झर्लंड येथे आहे. याची स्थापना पिअरे डी कौर्बर्टिन यांनी २३ जून १८९४ रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले. 

दर चार वर्षांनी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आधुनिक ऑलंपिक खेळ आणि युवा ऑलंपिक खेळांचे आयोजन केले जाते. प्रथम ऑलंपिक १८९६ साली अॅथेन्स, ग्रीसमध्ये आयोजित केले गेले.सौमित्र चॅटर्जी यांना ‘लीजन डी’ऑनर’ सन्मान
बंगालचे अभिनेता सौमित्र चटर्जी यांना ‘लीजन डी’ऑनर’ हा फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे.


८२ वर्षीय चटर्जी यांनी १९५९ सालच्या “अपुर संसार” चित्रपटातून सत्यजित रे यांच्यासह कामाला सुरुवात केली. त्यांनी त्यानंतर रे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चटर्जी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आहे.

‘लीजन डी’ऑनर’ हा फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान नागरी मूल्य जपणार्‍या व्यक्तिला दिला जातो. नेपोलियन बोनापार्टने १८०२ साली या सन्मानची सुरुवात केली होती.ब्रिटिश निवडणुकीत थेरेसांना यांच्या पक्षाची पीछेहाट
ब्रिटनमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याचा डाव ब्रिटिश मतदारांनी पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावरच आज उलटवला असल्याचे स्पष्ट झाले.

मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३१७ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर विरोधी लेबर पक्षाला २६२ जागा मिळाल्या आहे. बहुमतासाठी ३२६ जागांची आवश्‍यकता असते. त्यामुळे ब्रिटनच्या संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

‘डाउनिंग स्ट्रीट’कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेऊन तेरेसा मे आजच सरकार स्थापनेचा दावा करतील. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मधील डेमोक्रॅटिक युनिओनिस्ट पार्टीच्या (डीयूपी) दहा खासदारांचा पाठिंबा घेण्यात येणार असल्याचे समजते.

मावळत्या सभागृहात मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र ताज्या निवडणूक निकालात मे यांच्या पक्षाला बहुमताचा आकडाही पार करता आलेला नाही. 


युरोपीयन युनियनमधून (ईयू) ब्रिटन बाहेर पडण्याची प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीही होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ब्रेक्‍झिटची प्रक्रिया सुरू करण्याबाबतच्या चर्चेला काही दिवसांतच सुरवात होणार होती. मात्र, ही चर्चा आता लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती ‘ईयू’कडून देण्यात आली.

ब्रिटन (यूके) याच्या संसदीय सर्वसाधारण निवडणुकीत प्रीत कौर गिल ही प्रथम शीख महिला खासदार निवडून आली आहे. तसेच तान धेसी हे प्रथम पुरुष शीख खासदार निवडून आले आहेत. ४४
 वर्षीय गिल या बर्मिंगहॅम एजबस्टन शहराचे आणि तान धेसी हे स्लॉ शहराचे प्रतिनिधित्व करणार.‘बॅटमॅन’ ऍडम वेस्ट यांचे निधन
बॅटमॅन या सुपरहिरोची भूमिका साकारल्यामुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते ऍडम वेस्ट यांचे नुकतेच निधन झाले. ते ८८ वर्षाचेहोते. त्यांना रक्तक्षयाचा विकार झाला होता. 

साठच्या दशकात दूरचित्रवाणीवरील बॅटमॅन मालिकेमुळे त्यांना अमेरिकेत आणि युरोपात प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी एका चित्रपटामध्येही बॅटमॅनची भूमिका केली होती. युरोपियन युनियन, फ्रान्स यांची भारताला ३.५ दशलक्ष युरोची मदत
मोबिलाइज युवर सिटी (MYC) पुढाकारांतर्गत फ्रान्स आणि युरोपियन यूनियन यांच्याकडून भारताला ३.५ दशलक्ष युरोची आर्थिक मदत देण्यात आली आहे. 
हा निधि नागपूर, कोची आणि अहमदाबाद या तीन शहरांसाठी वापरण्यात येणार आहे.

फ्रेंच आणि जर्मन सरकारद्वारा समर्थित MYC ला युरोपियन युनियनचे देखील आर्थिक पाठबळ लाभले आहे. पॅरिस करारांतर्गत हरित गृह वायु (GHG) चे उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर १०० शहरांना आर्थिक मदत करणे हे MYC चे लक्ष्य आहे.