डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आज जाहीर झाला. 


एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, राजर्षी शाहू जयंतीदिनी सोमवारी सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल. 

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात शाहू विचारांनी कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविले जाते. 

भारतातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ. माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे काम केले आहेश्रीकांत ठरला इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचा चॅम्पियन
भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने अंतिम सामन्यात जपानचा क्वॉलिफायर काजुमासा साकाई याच्यावर सरळ गेम्समध्ये विजय नोंदवताना इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याचे हे सुपर सीरीजचे तिसरे विजेतेपद ठरले.

एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनच्या फायनल्समध्ये पोहोचणारा जगातील २२ व्या क्रमांकावरील खेळाडू श्रीकांतने ४७ व्या रँकिंगच्या साकाई याचा अवघ्या ३७ मिनिटांत२१-११, २१-१९, असा पराभव करताना ७५००० डॉलर बक्षीस रकमेचा धनादेश आपल्या नावे केला. 

तसेच श्रीकांतने २०१४ मध्ये चायना सुपर प्रीमिअर आणि २०१५ मध्ये इंडिया सुपर सीरीज जिंकली होती.


पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी 


चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.


चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा विजय मिळविला. दोन लढतींमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. 

पाकिस्तान संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला.

अमेरिका भारतात बनवणार एफ-१६ फायटर जेटपूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या ‘मेक-इन-इंडिया’ योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.


तसेच यासाठी ‘एप-१६’ विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या ‘पॅरिस एअर शो’मध्ये अधिकृत करार झाला.

या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी ‘एफ-१६’ विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे. 

भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.


ट्रम्प यांच्याकडून ओबामांचे क्युबा धोरण रद्दअमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केलेले क्युबा धोरण विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केले असून ते धोरण एकतर्फी होते, अशी टीका केली आहे.


शीतयुद्ध काळातील शत्रू असलेले क्युबा व अमेरिका यांच्यातील संघर्ष ओबामा यांच्या धोरणामुळे मिटला होता, पण आता पुन्हा एकदा त्यांच्यात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिका व क्युबा यांच्यातील संबंध पूर्ववत केले जातील, असे ओबामा यांनी २०१४ मध्ये असे जाहीर केले होते. त्यानंतर वर्षभराने अमेरिकी दूतावास क्युबातील हवाना येथे सुरू करण्यात आला होता. ओबामा यांनी २०१६ मध्ये क्युबाला ऐतिहासिक भेट दिली होती. 

क्युबा हा कम्युनिस्ट देश असून शीतयुद्धाच्या काळात त्यांचे अमेरिकेशी संबंध विकोपाला गेले होते. मियामीमधील लिटल हवाना येथे त्यांनी ओबामा यांचे क्युबा धोरण रद्द करण्याची घोषणा केली त्या वेळी उपस्थितांनी जल्लोष केला. 

ओबामा यांनी दोन्ही देशांतील व्यापार व पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न केला होता. ओबामा यांच्या राजवटीतील खुणा पुसून टाकण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न असून त्यातूनच त्यांनी क्युबा धोरण रद्द केले आहे.