अरुणाचल प्रदेशने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे ठरविले
अरुणाचल प्रदेश सरकारने नियमित राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय वाढवून ६० वर्षे एवढे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ जानेवारी २०१८ पासून लागू होईल.


वर्तमान नियमांनुसार राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षे आहे.लेहमध्ये जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला रेलरूळ
भारतीय रेल्वेच्या सर्वेक्षणानुसार लेह येथे समुद्रसपाटीपासून ३३०० मीटर उंचीवर असलेले रेलरूळ हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला रेलरूळ ठरले आहे. या विक्रमाने चीनच्या क्विंघाय-तिबेट रेल्वेचा विक्रम मोडला गेला.

भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीर मधील लेह येथे असलेले ४९८ किलोमीटर लांबीचे बिलासपूर-मनाली-लेह या रेलमार्गाचे सर्वेक्षण केले. हा मार्ग संरक्षण मंत्रालयाचे अंदाजे १५७.७७ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे.श्रीकांतने पटकाविले ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद 
इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. 

ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा २२-२०, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. 


आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने २०१४ साली चीन ओपन, २०१५ साली इंडिया ओपन, २०१७ साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते. 

तसेच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
भारतीय कर्णधार मिताली राजचा नवीन विक्रम 

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला. या सामन्यात मिताली राजने ७३ चेंडूंत ८ चौकारांसह ७१ धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली.


मिताली राजने सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. मितालीने गेल्या सहा वनडे डावांत ६२*, ५४, ५१*, ७३*, ६४ आणि ७०* धावा केल्या. 

महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे. 

मितालीआधी एकालाही हा रेकॉर्ड करता आलेला नाहीये. मितालीने ठोकलेल्या सात अर्धशकांमध्ये चार अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी केली आहे.२६ जून अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा
२६ जून २०१७ रोजी दरवर्षीप्रमाणे जागतिक पातळीवर “अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” साजरा करण्यात आला आहे.

या दिवसाच्या निमित्ताने, २६ जून २०१७ रोजी लंडनच्या किंग्ज कॉलेज येथे दरवर्षीप्रमाणे उच्च-स्तरीय चर्चासभेचे आयोजन करण्यात आले. सभेचे आयोजन इंटरनॅशनल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकार यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे उच्चायुक्ताचे कार्यालय (OHCHR) कडून करण्यात आले.

१२ डिसेंबर १९९७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव ५२/१४९ मंजूर करून दरवर्षी २६ जून ही तारीख “अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” याची स्थापना केली. या दिवशी जागतिक स्तरावर अत्याचारासंबंधी मुद्द्यांवर एकूणच निर्मूलन करण्याच्या उद्देशाने कार्यांना प्रोत्साहन दिले जाते.

जिनेव्हा स्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार कार्यालयाद्वारे व्यवस्थापित यूएन वॉलंटरी फंड फॉर व्हिक्टम ऑफ टॉर्चर ही पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी एक माध्यम असलेली अद्वितीय आंतरराष्ट्रीय यंत्रणा आहे.