केंद्र सरकारतर्फे जगभरातील शास्त्रज्ञांसाठी VAJRA संकेतस्थळ सुरू
भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या फॅकल्टी योजनेसाठी व्हिजिटिंग एडवांस्ड जॉइंट रिसर्च (VAJRA) या ऑनलाइन व्यासपीठाचे अनावरण केले आहे.


या योजनेअंतर्गत वर्षातील तीन महिन्यांसाठी परदेशी प्राध्यापक सदस्यांना निवडण्यात येईल. त्यांना पहिल्या महिन्यामध्ये $15000 तर दुसऱ्या व तिसर्‍या महिन्यासाठी $10000 मानधन दिले जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी समिती गठित
वैज्ञानिक डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचे इतर ८ सदस्य आहेत.

गेल्या तीस महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत अभ्यास केला जात आहे. हजारो सूचना, शिफारसी, चर्चासत्र आयोजित करून व्यापक अभ्यासासाठी माहिती गोळा केली गेली आहे.हरियाणाची मानुषी छिल्लर मिस इंडिया २०१७ 

५४ व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१७ चा खिताब हरियाणाच्या मानुषी छिल्लर हिने जिंकला आहे. स्पर्धा मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता.


जम्मू-कश्मीरची सना दुआ हिने स्पर्धेचे फर्स्ट रनर-अप आणि बिहारची प्रियंका कुमारी हिने सेकंड रनर-अप खिताब जिंकला. 

याशिवाय, वनिला भटनागर हिला मिस अॅक्टिव मुकुट तर वामिका निधी हिने ‘बॉडी ब्युटीफुल’ हा विशेष पुरस्कार जिंकला.

मानुषी छिल्लर ही खनपुर मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेत आहे. तिने मिस हरियाणा खिताब जिंकला.IIC चे नवे प्रेसिडेंट म्हणून एन. एन. वोहरा यांची निवड 

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांची इंडिया इंटरनॅशनल सेंटर (IIC) चे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रख्यात न्यायिक सोली सोराबजी यांच्या राजीनाम्यानंतर झाली आहे.

IIC ही भारतामधली एक प्रमुख सांस्कृतिक संस्था आहे. ही नवी दिल्ली स्थित गैर-सरकारी संस्था आहे. १९६२ साली या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.आयपीएलचे मुख्य प्रायोजक ‘विवो’ कंपनीचा करार कायम
ट्‌वेंटी-२० क्रिकेटमधील समीकरणेच बदलून टाकणाऱ्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’चे (आयपीएल) मुख्य प्रायोजक म्हणून ‘विवो’ या चिनी मोबाईल कंपनीचा करार कायम ठेवण्यात आला आहे. 

‘आयपीएल’च्या पुढील पाच वर्षांसाठी ‘विवो ‘ने २१९९ कोटी रुपयांची बोली लावली होती. गेल्या महिन्यात संपलेल्या ‘आयपीएल’चे मुख्य प्रायोजक ‘विवो’च होते. 

तसेच यापूर्वी २०१६ आणि २०१७ या वर्षांसाठी ‘विवो’ ने २०० कोटी रुपयांची बोली लावत प्रायोजकत्व पटकाविले होते.२०१४-१५ पासून ‘विवो’ हे ‘आयपीएल’चे मुख्य प्रायोजक होते. 

‘आयपीएल’च्या पहिल्या पाच वर्षांसाठी ‘पेप्सी’ हे मुख्य प्रायोजक होते. ‘आयपीएल’चा दहा वर्षांचा पहिला टप्पा संपल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रायोजकासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदांमध्ये ‘विवो’ ने बाजी मारली. भारत-अमेरिका संबंधांचे ७० वे वर्ष 
वर्ष २०१७ हे भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आहे.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ जून २०१७ पासून अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. 

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील नेत्यांनी व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये प्रगती करण्याचा संकल्प केला आहे. भेटीदरम्यान  सुचालनाचे स्वातंत्र, हवाई दळणवळण आणि व्यापार यांच्या आवश्यकतेबाबत मान्यता देण्यात आल्या. 


आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रांतीय आणि समुद्री वादाचे शांतपणे निराकरण करण्यासाठी सर्व राष्ट्रांना आवाहन करण्यात आले.पायाभूत सुविधांच्या पारदर्शी विकासाद्वारे आणि जबाबदारपूर्ण आर्थिक पद्धतींचा वापर करून प्रादेशिक आर्थिक जोडणीला वाढवण्यास पाठबळ देणे.

दहशतवादाशी लढा देण्यासाठी अल-क़ायदा, ISIS, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, डी-कंपनी आणि त्यांच्या सहयोगी गटांच्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात सहकार्य मजबूत करण्याचे वचन दिले.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविणार असल्याचे स्पष्ट केले.

व्यापार संबंध वाढविण्यासाठी, वाढीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्याच्या कार्यात सहकार्य करण्यास समर्थन दर्शवले.

भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारत-अमेरिका संबंध प्रस्थापित झाले आहेत. विश्वयुद्धाच्या काळात हे संबंध कमकुवत झाले होते. 


आतापर्यंत ड्वाइट आइजनहावर (१९५९), रिचर्ड निक्सन (१९६९), जिमी कार्टर (१९७८), बिल क्लिंटन (२०००), बराक ओबामा (२०१५) या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केलेला आहे. बराक ओबामा (२०१५) हे भारताच्या प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथि होणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठरले होते.

न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तसंस्थेने ‘इंडिया अँड युनाइटेड स्टेट्स : ए स्ट्रेन्ज्ड डेमोक्रेसीज’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकात १९४१-९१ सालातील संबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.सय्यद सलाहुद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील शिखर बैठकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली होती.

सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये, असेही स्पष्ट केले होते. आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले होते. पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग होता, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील वजूद या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.मानवरहित रेल्वे क्रॉसिंगसाठी ISRO द्वारा उपग्रहावर आधारित चिप तयार 
मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर लोकांना त्या मार्गावर धावणार्‍या रेलची स्थिती तपासून चेतावणी देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने उपग्रहावर आधारित चिप प्रणाली विकसित केली आहे.


प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि गुवाहाटी राजधानी ट्रेनमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली आहे. सध्या चेतावणी देण्यासाठी चीप बसविलेल्या रेलच्या मार्गांवर २० मानव रहित रेल्वे फाटकांवर हुटर लावण्यात येईल.

ही इंटिग्रेटेड सर्किट (IC) चिप रेलच्या इंजिनमध्ये बसविण्यात आली आहे. जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या गाडीबद्दल चेतावणी देण्यासाठी या चिपच्या माध्यमातून हूटर वाजणार. रेलच्या स्थितीनुसार या हूटरचा आवाज वाढत जाणार आणि फाटक पार करताच आवाज बंद होणार. 

या प्रणालीचा वापर रेलच्या प्रत्यक्ष वेळेतील स्थितीबद्दल माहिती मिळवण्यासाठीही केला जाणार.

देशात जवळपास १०००० मानवरहित रेल्वे फाटक आहेत. एकूण अपघातांमध्ये ४०% अपघात रेलफाटकाशी संबंधित आहेत.