स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून नेपाळमध्ये ‘डिजिटल व्हिलेज’
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नेपाळमध्ये ‘डिजिटल व्हिलेज’ उपक्रमांतर्गत एका गावाचा कायापालट केला आहे. या गावातील सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास सुरवात झाली आहे.


काठमांडूपासून पूर्वेला २५ किलोमीटर अंतरावर जारीसिंगपौवा हे गाव आहे. या गावात ‘डिजिटल व्हिलेज’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या गावात पैसे काढणे व भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे.  
या गावातील नागरिकांना ४३० डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. 


गावातील डिजिटल केंद्राचे उद्‌घाटन नेपाळ राष्ट्र बॅंकेचे गव्हर्नर चिरंजिवी नेपाळ आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले. या गावातील रस्त्यावर सौरऊर्जेवरील दिवेही लावण्यात आले आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेपाळमधील सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत



अहमदाबाद शहरला वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जायुनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे. पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या ४१ व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.

अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह २० देशांनी पाठिंबा दिला.

अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.

अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची २६ सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत. 
तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत. 



देशात अपहरण विरोधी अधिनियम २०१६ लागू 
५ जुलै २०१७ पासून भारतात अपहरण विरोधी अधिनियम (Anti-Hijacking Act 2016) लागू करण्यात आला आहे. नवीन कायदा १९८२ सालच्या अपहरण विरोधी कायद्याच्या जागी आणले गेले आहे.

शिवाय १९७० सालचा विमानाचे बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याच्या अवरोधासाठीचा करार (Convention for the Suppression of Unlawful Seizure of Aircraft) आणि १० सप्टेंबर २०१० रोजी त्याच्या पूरक शिष्टाचाराला या अधिनियमाच्या माध्यमातून सक्षम करण्यात आले आहे.



कैलाश सत्यार्थी यांची ‘सुरक्षित बचपन सुरक्षित भारत’ मोहीम सुरू
कैलाश सत्यार्थी यांनी बालकांच्या लैंगिक शोषण आणि तस्करीविरोधात वर्षभर चालणार्‍या ‘सुरक्षित बचपन सुरक्षित भारत’ मोहिमेला सुरुवात केली आहे.

कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन (KSCF) संस्थेकडून ही मोहीम देशात चालवली जाणार आहे. 



आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुधा सिंगला सुवर्णपदकभुवनेश्वर येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. सुधाने ९ मिनिट ५९.४७ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.

सुधाने २००९, २०११ आणि २०१३ च्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानले होते.
 



इराकी सैन्याने मोसूल जिंकले
गेल्या तीन वर्षांपासून इसिसच्या कब्जात असलेल्या मोसूलवर ताबा मिळविण्यासाठी सलग आठ माहिने चाललेल्या लढाईत इराकी सैन्याने विजय मिळविला आहे. आज इराकचे पंतप्रधान हैदर अल अब्दी यांनी येथे येऊन या विजयाबद्दल इराकी सैन्याचे अभिनंदन केले.

प्रदीर्घ चाललेल्या या लढाईत मोसूलचे खंडर झाले असून, हजारो निरपराधांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर जवळपास दहा लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. 



जर्मनीच्या हॅमबर्ग येथे जी-२० शिखर परिषद संपन्न
जर्मनीच्या हॅमबर्ग येथे दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेची ८ जुलै २०१७ रोजी सांगता झाली. ही परिषद ‘शेपिंग अॅन इंटर-कनेक्टिड वर्ल्ड’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती.


या परिषदेत विशेषत: जागतिकीकरणाचे लाभ सामायिक करणे, जागतिक लवचिकता, स्थिरता आणि उत्तरदायित्व या चार महत्त्वाच्या विषयांसंबंधी व्यापक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

२० देशांच्या नेत्यांपैकी अमेरिकेला वगळता सर्व नेत्यांनी परिषदेच्या अंती जाहीर केलेल्या संयुक्त घोषणापत्रात हवामान बदलाविषयी असलेल्या सर्व मुद्द्यांशी सहमत होते.  
पॅरीस हवामानविषयक करार आणि जीवाश्म इंधनाच्या बाबतीत अमेरिकेच्या दृष्टिकोनावर एक स्वतंत्र परिच्छेद घोषणापत्रात समाविष्ट करण्यात आला. 

वाढत्या दहशतवादी कारवायांच्या आणि आधुनिक गुलामगिरीच्या विरुद्ध जागतिक पातळीवर लढा देण्यास तसेच पॅरीस कराराची अंमलबजावणी करण्यास देशांनी वचन दिले. 

संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-२० नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली.

सर्व अयोग्य व्यापार पद्धतींसह संरक्षणवादाविरोधात लढा सुरू ठेवण्यास आणि या संदर्भात कायदेशीर व्यापार संरक्षण साधनांची भूमिका ओळखणे पुढेही चालू ठेवण्याचे वचन दिले. 

२०२५ सालापर्यंत बाल मजुरीचे निर्मूलन करण्यासाठी तसेच जबरदस्तीने मजुरी, मानव तस्करी आणि आधुनिक गुलामगिरीचे सर्व प्रकार अश्या समस्यांवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याविषयी वचनबद्धता दर्शवली आहे. 

जी-२० हा जगातल्या २० प्रमुख अर्थव्यवस्थांच्या २० वित्त मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकांचे गवर्नर यांचा समूह आहे. या समूहात भारताला पकडून १९ देश आणि यूरोपीय संघाचा समावेश आहे. या समूहाचे प्रतिनिधित्व यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय केंद्रीय बँकेद्वारा केले जाते. या समूहाची स्थापना १९९९ साली झाली.



१२२ देशांनी अण्वस्त्रांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक करार स्वीकारला
७ जुलै २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत अण्वस्त्रांवर बंदी घालणार्‍या जागतिक कराराला अंगिकारले गेले आहे. १२२ देशांनी या कराराला त्यांची संमती दिली आहे.

हे अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठीचे गेल्या २० वर्षातील पहिले बहुपक्षीय कायदेशीरित्या बंधनकारक दस्तऐवज आहे.

२० सप्टेंबर २०१७ पासून सर्व सदस्य देशांना या करारावर स्वाक्षरी करण्यास खुले राहील आणि किमान ५० देशांची याला मंजुरी मिळाल्याच्या ९० दिवसानंतर हा करार प्रभावी केला जाईल.

तीन आठवडे वाटाघाटी झाल्यानंतर अखेरीस या कराराचा आराखडा तयार करण्यात आला. अण्वस्त्रांसंबंधी निर्मिती, चाचणी, उत्पादन, खरेदी, ताबा किंवा इतर आण्विक स्फोटक साधने अश्या कोणत्याही कार्यावर बंदी घालण्यात आली आहे. या करारामुळे जगातील १५००० अण्वस्त्रांना नष्ट करण्याबाबत दबाव निर्माण होईल.

मात्र या ऐतिहासिक घटनेला अण्वस्त्रधारक देशांचा विरोध दिसून आला आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल या ९ अण्वस्त्रधारक देशांपैकी एकही देश वाटाघाटी किंवा मतदानात सहभाग घेतला नाही.



भारत, इस्राइल यांच्यात $४.३ अब्ज किंमतींचे करार तेल अवीव (इस्राइल) मध्ये झालेल्या प्रथम CEO फोरमच्या बैठकीत भारतीय आणि इस्राइलच्या कंपन्यांनी $४.३ अब्ज किंमतींचे धोरणात्मक करार केले आहेत. 

संरक्षण क्षेत्राला वगळता इतर क्षेत्रात आर्थिक आणि गुंतवणुक यामधील संबंध वाढविण्याच्या उद्देशाने के कर झाले आहेत. मुख्यताः पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण संबंधित कार्यांवर भर दिला जाईल.