राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन होणार 
मुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आबालवृद्धांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.

तसेच या मंडळांतर्गत होणाऱ्या परीक्षांना नियमितपणे घेण्यात येणाऱ्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षांची समकक्षता असेल.

या मंडळाच्या माध्यमातून औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती लागू केली जाणार आहे. 

पाचवीच्या समकक्ष शिक्षणासाठी विद्यार्थ्याचे वय किमान दहा वर्षे असावे. आयफा अवॉर्ड २०१७ पुरस्कार सोहळा 
आयफा अवॉर्ड २०१७ च्या रंगारंग पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार पटकाविले. 

‘उडता पंजाब’ साठी शाहिदला बेस्ट अ‍ॅक्टरच्या आयफा ट्रॉफीने गौरविण्यात आले. आलियाला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 

‘पिंक’चे दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी यांना बेस्ट डायरेक्टरची आयफा ट्रॉफी मिळाली. तसेच सोनम कपूरच्या ‘नीरजा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. 

आयफा अवॉर्ड सोहळ्यात तापसी पन्नूला ‘वूमन ऑफ द इयर’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले 

अभिनेता वरूण धवन याला ‘ढिशूम’मधील भूमिकेसाठी बेस्ट कॉमिक अ‍ॅक्टरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले सिक्किमचे माजी मुख्यमंत्री नर बहादूर भंडारी यांचे निधन
सर्वाधिक प्रदीर्घकाळ शासन करणारे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री नर बहादूर भंडारी यांचे निधन झाले आहे. 

भंडारी यांनी सन १९७९, सन १९८४ आणि सन १९८९ याकाळी सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ते सिक्कीम संग्राम परिषदेचे संस्थापक होते सरकारवर विश्वास असलेल्या लोकांच्या संख्येत भारत जगात तिसर्‍या स्थानी
आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) च्या ‘गवर्नमेंट अॅट ए ग्लान्स’ अहवालानुसार, केंद्र सरकारवर नागरिकांचा असलेला सर्वाधिक विश्वास यासंदर्भात असलेल्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो आहे.

या यादीत प्रथम दोन स्थानावर इंडोनेशिया आणि स्वीत्झर्लंड चा क्रमांक लागतो. 

मात्र, वर्ष २००७ आणि २००६ या कालावधीत सरकारवर विश्वास असलेल्या लोकांची संख्येत ९% घट झाली आहे. फेडररचे विक्रमी विजेतेपद
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने लौकिकास साजेसा खेळ करत रविवारी विंबल्डनचे विक्रमी आठवे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा सरळ सेटमध्ये एक तास ४१ मिनिटांत पराभव केला. 

फेडररने अकराव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी गाठताना आठव्यांदा विजेतेपद मिळविले. 
फेडररचे हे कारकिर्दीमधील एकोणीसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. 


एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक ८ वेळा विजेतेपदाचा विक्रमही आता फेडरेरच्या नावावर नोंदला गेला. त्याने विली रेनशॉ आणि पीट सॅम्प्रास यांचा पुरुष एकेरीत सर्वाधिक सात विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला आहे.

फेडररने वयाच्या ३५व्या वर्षी विंबल्डन विजेतेपद मिळविले आहे. तो 
अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९७६ मध्ये आर्थर ऍश यांने वयाच्या ३२ व्या वर्षी विजेतेपद मिळविले होते. 

एकही सेट न गमावता फेडररने हे विंबल्डन विजेतेपद मिळविले. यापूर्वी १९७६ मध्ये बियाँ बोर्ग यांनी अशी कामगिरी केली होती.इराणी गणितज्ञ मरियम मिरझाखानी यांचे निधन
इराणी गणितज्ञ मरियम मिरझाखानी यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे. 

मिरझाखानी हा इराणच्या प्रथम महिला होत्या, ज्यांनी २०१४ साली रेमॅन सर्फेस आणि त्याच्या मोड्युली स्पेसेस च्या गतिशीलता आणि भूमिती विषयात उत्कृष्ट योगदानासाठी गणित क्षेत्रात फिल्डस् मेडल पारितोषिक जिंकले. 

त्या कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होत्या.  समुद्रात इंडोनेशियाचे चीनला थेट आव्हान
इंडोनेशियाने दक्षिण चिनी समुद्राच्या इंडोनेशियन विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत (एक्‍सक्‍ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन) येणाऱ्या भागाचे वेगळे नामकरण करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे.

दक्षिण चिनी समुद्राच्या ९०% पेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितल्याने इंडोनेशियासहित इतर देश व चीनमध्ये या मुद्यावरुन तणावपूर्ण संबंध आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर इंडोनेशियाने चिनी दबावापुढे न झुकता इंडोनेशियाच्या आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या भागाचे नाव ‘नॉर्थ नाटुना सी’ असे ठेवल्याचे घोषित केले आहे.इंडोनेशियाच्या सागरी मंत्रालयाचे उपमंत्री अरिफ हवस यांनी या नव्या नावाची घोषणा  केली.

इंडोनेशियाची ही नवी भूमिका चिनी वर्चस्ववादास थेट आव्हान असल्याचे मानले जात आहे. 


इंडोनेशियाप्रमाणेच फीलिपीन्सकडूनही २०११ मध्ये दक्षिण चिनी समुद्राच्या काही भागाचे नामकरण ‘वेस्ट फीलिपीन सी’ असे नामकरण करण्यात आले होते. २०१६ मध्ये या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये आंतरराष्ट्रीय लवादानेही चिनी दाव्यास काहीही कायदेशीर पाया नसल्याचे सांगत चीनला चपराक लगावली होतीUNICEF चे विश्व सदिच्छादूत म्हणून लिली सिंग यांची निवड
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) ने त्यांचा विश्व सदिच्छादूत म्हणून लिली सिंग यांची निवड केली आहे. 

लिली सिंग ही भारतीय वंशाची कॅनेडाची रहिवासी असून ‘यूट्यूब’ वर ‘सुपरवुमन’ म्हणून ओळखली जाते. 

त्या UNICEF च्या ‘युथ4चेंज’ पुढाकाराचा संदेश पोहचविण्याकरिता कार्य करतील.