रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथबद्धराष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (एनडीए) रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या ऐतिहासिक ‘सेंट्रल हॉल’मध्ये भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. 

कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.

बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये १६  वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहेशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ प्रा. यश पाल यांचे निधन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल घडविणारे प्रा. यश पाल यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. 

प्रा. पाल यांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतून कारकिर्दीला सुरवात केली. 
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले. 

प्रा. यश पाल हे दूरदर्शनवरील ‘र्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेतून ‘विज्ञान गुरू’ म्हणून ते ओळखले जात होते. या मालिकेतून पाल हे विज्ञानातील अनेक रहस्ये रंजक पद्धतीने उलगडून सांगत.

विज्ञानातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना १९७६ मध्ये पद्मभूषण तर २०१३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 

यश पाल यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यावर १९५८ मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएच.डी. मिळवली होतीभारताचा कारगिल विजय दिवस
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. 

६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते.


मागील दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. 

तसेच या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. 

कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती येथे पंतप्रधान शहीद जवानांना आदरांजली वाहतात.‘इंदिरा: इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाचे अनावरण
‘इंदिरा: इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे अनावरण झाले आहे. या पुस्तकाच्या लेखिका सागरिका घोस या आहेत आणि ‘जगोरनौट’ हे प्रकाशक आहेत. 

पुस्तकात इंदिरा गांधी यांच्या जीवनाविषयी आणि पंतप्रधान पदाच्या कारकि‍र्दीतील घटनांना उजाळा दिला गेला आहे.अल्फाबेटच्या संचालकपदी सुंदर पिचाई यांची निवड
गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे ४५ वर्षीय पिचाई हे मूळचे चेन्नईमधील आहेत. आयआयटी खड्‌गपूरमधून त्यांनी पदवी मिळविली असून, मागील दोन वर्षांपासून ते गुगलची धुरा सांभाळत आहेत.

पिचाई यांची कंपनीमध्ये २००४ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांनी २०१४ मध्ये कंपनीतील उत्पादन, अभियांत्रिकी आणि संशोधन विभागांचा ताबा त्यांच्याकडे घेतला. 

कंपनीचे यूजर एक अब्जाहून अधिक वाढविण्यात त्यांनी योगदान दिले आहे. जाहिरातींचे उत्पन्न आणि यूट्यूबमधील व्यवसाय वाढविण्यास त्यांनी हातभार लावला आहे. गुगलमधील उत्पादनांचा विकास आणि तंत्रज्ञानविषयक धोरण याची जबाबदारी पिचाई यांच्यावर आहे.UN ने दुबईला MENASA प्रदेशातील डेटा हब म्हणून निवडले
संयुक्त राष्ट्रसंघाने माहिती हाताळण्यासाठी शहराच्या एकीकृत उपक्रमांमांसाठी मध्य पूर्व उत्तर आफ्रिका व दक्षिण एशिया (MENASA) प्रदेशातले डेटा हब म्हणून दुबई (UAE) शहराला निवडले आहे.

हे ठिकाण स्थानिक आणि प्रादेशिक माहिती संकेतस्थळांच्या पोर्टफोलिओचा एक भाग असेल. तसेच हे शहरांपासून शहरांना शिक्षण व उपाय प्रदान करणारे व्यासपीठ ठरेल.स्कॉटलंडमध्ये जगातली पहिली पाण्यावरील पवनचक्की उभारण्यात आली
स्कॉटलंडच्या उत्तर-पूर्व किनारपट्टी क्षेत्रात जगातले पहिले पवनचक्क्यांचे पाण्यावर तरंगणारे परीपूर्ण जाळे (floating wind farm) उभारण्यात आले आहे.

याला ‘पीटरहेड विंड फार्म किंवा हायविंड’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रायोगिक प्रकल्पामधून २०००० घरांना वीज मिळणार. हायविंड प्रकल्प स्टॅटोईल कंपनीने उभारले आहे.