दिल्ली विमानतळाची सुरक्षा जगात सर्वोत्तम 
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा आहे. 


वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिले असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केले आहे.

६ जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे.इंदिरा गांधी विद्यापीठात तृतीयपंथींना मोफत शिक्षण 
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) या देशातील सर्वांत मोठ्या मुक्त विद्यापीठाने तृतीयपंथींच्या मोफत शिक्षणासाठी मान्यता दिली आहे. 

विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या सुमारे २०० अभ्यासक्रमांचे शुल्क तृतीयपंथीसाठी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

तसेच या प्रवेशांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसले तरी प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना तृतीयपंथी अशी ओळख सिद्ध करण्यासाठी तशी नोंद असलेले आधार कार्ड किंवा कोणत्याही सरकारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र मात्र सादर करावे लागेल. 

या सवलतीचा तृतीयपंथींखेरीज अन्य कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी ओळखपत्राची ही अट घालण्यात आली आहे. विद्यार्थी नोंदणी विभागाच्या निबंधकांनी यासंबंधीची अधिसूचना २९ जून रोजी जारी केली.राजस्थानमध्ये रस्त्यांच्या विकासासाठी ADB सोबत $२२० दशलक्षचा करार
आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकार यांच्यात राजस्थान राज्य महामार्गांचा विस्तार तसेच वाहतूक कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढविण्यासाठी USD २२० दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला आहे.

या राजस्थान राज्य महामार्ग गुंतवणूक कार्यक्रमाचा एकूण अंदाजे खर्च USD ५०० दशलक्ष इतका आहे. यामधून सुमारे २००० किलोमीटरचा पट्टा विकसित केला जाईल.

कर्जावर ADB च्या LIBOR कर्ज सुविधेनुसार निर्धारित वार्षिक व्याज दर आकाराला जाईल. हे कर्ज ८ वर्षांच्या अतिरिक्त कालमर्यादेसह २५ वर्षांसाठी असेल.तात्काळ प्रतिक्रिया जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
भारतीय सैन्याने देशातच विकसित करण्यात आलेल्या तात्काळ प्रतिक्रिया देणार्‍या कमी अंतरावर जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी पार पाडली आहे.

हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र ट्रक-माऊंटेड कॅनिस्टर लॉंचरने सोडले जाते. हवेतील लक्ष्य भेदणारे हे शस्त्र संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ने विकसित केले आहे. हे शस्त्र २५-३० किलोमीटर अंतरावर मारा करू शकते.भारत, थायलंड यांच्या सैन्यांमधील युद्धाभ्यासाला सुरुवात
४ जुलै २०१७ रोजी भारत आणि थायलंड यांनी “एक्झरसाइज मैत्री-१७” या संयुक्त सैनिकी युद्धाभ्यासाला सुरुवात झाली आहे. 

हा सराव २ आठवडे चालणार आहे. या सराव हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील बक्लोह येथे सुरू आहे

१९९० सालच्या “अॅक्ट इजी” धोरणांतर्गत दोन्ही देशांमधील संबंधांना वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेतइस्राइलच्या फुलाला ‘मोदी’ हे नाव देण्यात आले
इस्राइलमध्ये आढळणार्‍या फुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून ‘मोदी’ असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान तीन दिवसांच्या इस्राइल दौर्‍यावर आहेत.

इस्रायलच्या ‘क्रायसंथूमुन’ जातीच्या फुलाला हे नाव देण्यात आले आहे. या फुलाची जलद गतीने वाढ होते.उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी
उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे.

उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान प्रांतातून ही चाचणी घेण्यात आली. 

उत्तर कोरियाच्या सततच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. तरीही दबावाला न झुगारता किम जोंग उन यांनी आज पुन्हा चाचणी घेतली आहे. यामुळे त्यांचा पारंपरिक शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाबरोबरील तणावात भर पडणार आहेBRICS बैठकीत ‘शिक्षणावरील बीजिंग घोषणापत्र’ प्रसिद्ध
BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक ५ जुलै २०१७ ला बीजिंग (चीन) मध्ये संपन्न झाली. 

भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. या बैठकीत शेवटी ‘शिक्षणावरील बीजिंग घोषणापत्र’ स्वीकारले गेले आहे. 

शिक्षण, संशोधन आणि अभिनवता क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी BRICS नेटवर्क यूनिवर्सिटी (NU) ला पाठबळ देणे. BRICS युनिव्हर्सिटी लीगमध्ये सहभागी होण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देणे.

BRICS देशांमधील इतिहास व संस्कृती संबंधी समज वाढवण्यासाठी भाषा शिक्षण आणि बहुभाषिकतेच्या माध्यमातून सांस्कृतिक सहकार्य वाढवणे. BRICS-NU द्वारे उच्च शिक्षणात अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिकतेला वाढविण्यासाठी पुढाकार घेणे.

शिक्षकांची गुणवत्ता आणि कामगिरी सुधारण्यामध्ये इतर देशांच्या अनुभवातून शिकण्यासाठी अधिकाधिक शिक्षक आणि शैक्षणिक प्रशासकांना प्रोत्साहित करणे.

शिक्षणतज्ज्ञांच्या अनुभव, नवकल्पनेमधून नवीन प्रकल्प तयार करून तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (TVET) च्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे.

BRICS थिंक टॅंक कौन्सिल (BTTC), BRICS-NU तसेच BRICS पुढाकार यांच्यातील कामाचे संरेखन सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यातील सहकार्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्यास प्रोत्साहन देणे.

युवा हिवाळी / उन्हाळी शिबिरांच्या संघटनांना प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी अधिकाधिक संध्या प्रदान करणे. SGD4-शिक्षण २०३० लक्ष्यांना अधिक अनुकूल धोरण वातावरण प्रदान करण्यासाठी, देशांमधील अनुभव आणि सरावांचे आदानप्रदान करणे.

वर्ष २०१८ मध्ये केप टाउन, दक्षिण आफ्रिका येथे आयोजित तिसर्‍या BRICS NU वार्षिक परिषदेत आणि सप्टेंबर २०१७ मध्ये सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे आयोजित BRICS जागतिक व्यवसाय व अभिनवता परिषदेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणे.