झारखंडने ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७’ मंजुर केले
झारखंडच्या राज्य मंत्रिमंडळाने ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७’ ला त्यांची मंजुरी दिली आहे. 


मनाविरुद्ध किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतरण करण्यास प्रेरित करणे हा एक अजामीन गुन्हा असेल, असे हे विधेयक स्पष्ट करते.

कायद्याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा ५०००० रूपये दंड शिक्षा म्हणून दिली जाईल. जर अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचीत जातीजमाती समुदायातील व्यक्ती असल्यास शिक्षा चार वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंड असा होईल.FICCI चे पुढील महासचिव संजय बारू
फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) चे पुढील महासचिव म्हणून पदासाठी संजय बारू यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड ए. दिदार सिंग यांच्या जागेवर करण्यात येत आहे. बारू १ सप्टेंबर २०१७ पासून महासचिवचा पदभार सांभाळतील.


FICCI ही भारतामधील व्यावसायिक संस्थांची एक संघटना आहे. या महासंघाची १९२७ साली स्थापना झाली आणि नवी दिल्ली येथे याचे मुख्यालय आहे. 

भारतात १२ राज्यांमध्ये आणि जगभरातील ८ देशांमध्ये याची उपस्थिती आहे.माजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांचे निधन
माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ राष्ट्रीय काँग्रेस नेते संतोष मोहन देव यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सात वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार म्हणून संतोष देव भारतीय संसदेच्या लोकसभेवर निवडून आले होते. 

या काळात त्यांनी पाच वेळा सिलचर आणि दोनदा त्रिपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी अवजड उद्योग मंत्रीपद देखील सांभाळले होते.
व्यापारसुधारित भारत-भूटान करार अंमलात आला
व्यापार, वाणिज्य आणि संक्रमण यावर भारत आणि भूटान यांच्यात झालेल्या नवीन द्वैपक्षीय कराराला अंमलात आणण्यात आले आहे आणि ते २९ जुलै २०१७ पासून लागू झाले.

दोन्ही देशांच्या दरम्यान मुक्त व्यापार चालविण्यासाठी नियमावली प्रदान करण्यात आली आहे. कोणत्याही तिसऱ्या देशांसोबत होणार्‍या व्यापारासाठी भूटानच्या उत्पादनांच्या करमुक्त संक्रमणासाठी करारात तरतूद आहे.BRICS कृषि संशोधन मंच उभारण्यासाठीच्या कराराला मंजूरी
BRICS कृषी संशोधन मंच उभारण्यासाठी भारत आणि विभिन्न BRICS सदस्य राष्ट्रांत झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली आहे.

हे केंद्र BRICS सदस्य राष्ट्रांना कृषी क्षेत्रात धोरणात्मक सहकार्याद्वारे अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी शाश्वत कृषी विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाला प्रोत्साहन देणारभारताच्या जलविद्युत प्रकल्पांस जागतिक बॅंकेची मान्यता
भारतास ‘काही बंधने’ पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर सिंधु पाणी वाटप करारांमधील कलमांचे उल्लंघन न करता जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले.

सिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता ३३० मेगावॅट) व रतल (क्षमता ८५० मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर ‘परिणाम’ होण्याची भीती या देशास आहे.

या पार्श्‍वभूमीवर, जागतिक बॅंकेकडून या प्रकल्पांसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या तांत्रिक रचनांसंदर्भात असलेल्या आक्षेपांच्या सुनावणीसाठी एक न्यायालयीन लवाद नेमण्यासंदर्भातील पूर्वतयारी पाकिस्तानने करावी, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. रशियातल्या टँक बायॅथलॉन २०१७ मध्ये भारतीय लष्कर सहभागी 
२९ जुलै २०१७ रोजी रशियामधील अलाबिनो येथील सराव क्षेत्रात आयोजित टॅंक बायॅथलॉन २०१७ मध्ये भारतीय लष्कर आपल्या T90 रणगाड्यासह भाग घेतला आहे.

टॅंक बायॅथलॉन हा आंतरराष्ट्रीय लष्करी खेळाचा एक भाग आहे. यावर्षी यामध्ये १९ देशांनी भाग घेतला. हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २०१७ पर्यंत चालणार आहे.

टॅंक बायॅथलॉन हा खेळ २०१३ सालापासून दरवर्षी आयोजित केला जात आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी खेळ रशिया, बेलारूस, अझरबैजान, कझाकिस्तान आणि चीन या पाच देशांमध्ये आयोजित केले जातात.