सांस्कृतिक दूत रामकृष्ण हेजीब यांचे निधन 
महाराष्ट्रीयनचे दिल्लीतील सांस्कृतिक दूत अशी ओळख असणारे रामकृष्ण मोरेश्वर हेजीब यांचे १२ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.


हेजीब हे महाराष्ट्रीयन परिचय केंद्राचे माजी संचालक आणि दिल्ली सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष होते. 

मराठी संस्कृतीचे दिल्लीत जतन करण्यासाठी महाराष्ट्रीयन शासनाच्या वतीने मराठी नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव आदींच्या आयोजनात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. CBFC चे नवे चेअरमन प्रसून जोशी
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) च्या चेअरमन (अध्यक्ष) पदावर लेखक व गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जेष्ठ निर्माते पहलज निहलानी यांच्या जागेवर झाली आहे. 


११ ऑगस्ट २०१७ पासून तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती झाली आहे.

CBFC हे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ च्या कलम ३(१) अंतर्गत केंद्र सरकारकडून CBFC चेअरमन पदाची नेमणूक केली जाते.एम. वेंकय्या नायडू यांनी पदभार स्वीकारला
एम. वेंकय्या नायडू यांनी ११ ऑगस्ट २०१७ रोजी भारताचे १३ वे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेवून पदाचा कार्यभार सांभाळला आहे. नायडू यांनी माजी उप-राष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्याकडून पदाचा कार्यभार सांभाळला.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीनंतर भारतामधील दुसरे सर्वात उच्चस्तरीय घटनात्मक कार्यालय आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६३ मध्ये या पदाची तरतूद आहे. पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. 

नायडू हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पक्षाचे नेते आहेत. आंध्रप्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यात १ जुलै १९४९ रोजी जन्म झाला. ते आंध्रप्रदेश राज्यातून उप-राष्ट्रपती पदावर येणारे दुसरे व्यक्ति आहेत.संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण २०१६-१७ : खंड-२’ सादर 
यानुसार, मागील वर्षाच्या ८% तुलनेत वर्ष २०१६-१७ मध्ये वास्तविक अर्थव्यवस्थेत ७.१% वाढ झाली आहे. शिवाय चलन साठ्यात वाढ झाली आहे आणि विनियमन दराला बळकटी आली आहे.

राजकोषीय विकास – वर्ष २०१६-१७ मध्ये राजकोषीय घट ला GDP च्या ३.५% पर्यंत मर्यादित राखले आहे.

मुद्रा व्यवस्थापन व वित्तीय मध्यस्थता – भारतीय रिजर्व बँकने वर्ष २०१६-१७ दरम्यान विमा दरात ०.५% (५० basis points) ने घट केली. ऑगस्ट २०१७ मध्ये रेपो रेट ६% आणि रिवर्स रेपो रेट ५.७५% इतके आहे. 

वित्त वर्ष २०१६-१७ दरम्यान उद्योग जगतात मिळालेल्या सरासरी सकल बँक कर्जात ०.२% घट दिसून आली. अनुसूचित वाणिज्यिक बँकांचे सकल थकीत कर्ज (GNPA) प्रमाण मार्च २०१७ मध्ये ९.५% वर पोहोचले.

वित्त वर्ष २०१७ मध्ये वार्षिक महागाई सरासरीत घट होत ती ४.५% वर स्थिर झाली आहे. कच्च्या तेलच्या किंमतीत घट झाल्याने, महागाई दर जुलै २०१६ च्या ६.१% वरून कमी होत जून २०१७ मध्ये १.५% वर आला.सांकेतिक भाषेत राष्ट्रगीताच्या चलचित्राचे लोकार्पन झाले
केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्या हस्ते कर्णबधिर विकलांग आणि अंशतः विकलांग मुला-मुलींसाठी सांकेतिक भाषेत सादर केल्या गेलेल्या राष्ट्रगीताच्या नवीन चलचित्राचे (व्हिडिओ) उद्घाटन करण्यात आले.

गोविंद निहलानी दिग्दर्शित या ३ मिनिटांच्या चलचित्रामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह अपंग मुलांनी राष्ट्रगीत प्रस्तुत केले आहे.
पार्श्वभूमी 

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नोबेल विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टैगोर यांनी लिहिलेले आहे. २४ जानेवारी १९५२ रोजी भारतीय संविधानिक सभेने हिंदी भाषेत भाषांतर केलेले हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. 

२७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सत्रात सार्वजनिकरित्या गायिले गेले.आशियाई शॉटगन स्पर्धेत नेमबाज माहेश्वरी हिला कांस्यपदक
भारताची नेमबाज माहेश्वरी चौहान हिने अस्ताना, कझाकस्तान येथे आयोजित ‘एशियन शॉटगन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.

यासोबतच, माहेश्वरी चौहान ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला महिलांच्या स्कीट प्रकारात वैयक्तिक पदक मिळवून देणारी पहिली महिला बनली आहे. स्पर्धेच्या याच प्रकारात चीनच्या मेंग वेईने सुवर्णपदक आणि थायलंडच्या सुतिया जीवचालोयम्मितने रौप्य जिंकले.

याशिवाय माहेश्वरी, रश्मी राठोड आणि सानिया शेख या चमूने सांघिक रौप्यपदक जिंकलेले आहे.

आशियाई शॉटगन स्पर्धेचे आयोजन एशियन शुटिंग कॉन्फेडरेशनकडून केली जाते. या स्पर्धेला १९६७ साली सुरूवात झाली आणि दर चार वर्षांनी याचे आयोजन केले जाते. केनियाचे राष्ट्रपतीपदी उहरु केन्याटा
पुढील सत्रासाठी झालेल्या केनियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती उहरु केन्याटा यांचा विजय झाला आहे.

५५ वर्षीय केन्याटा हे देशाच्या राष्ट्रपती पदावर २०१३ सालापासून कार्यरत आहेत.

केनिया हा हिंद महासागरालगत असलेला पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. देशाची राजधानी नैरोबी शहर असून देशाचे चलन केनियन शिलिंग हे आहे. केनिया पूर्व आफ्रिकन समुदाय (EAC) चा संस्थापक सदस्य आहे.जगातील सर्वात वयोवृद्ध मनुष्य ‘इस्राइल क्रिस्टल’ यांचे निधन
जगातील सर्वात वयोवृद्ध मनुष्य ‘इस्राइल क्रिस्टल’ यांचे निधन झाले. त्यांनी वयाची ११३ वर्ष पूर्ण केले होते आणि ११४ व्या वाढदिवसासाठी फक्त एक महिना उरला होता.

क्रिस्टल हे दोन्ही जागतिक महायुद्ध आणि औश्वित्झच्या एकाग्रता शिबिराचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यांची गेल्या वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात वयोवृद्ध मनुष्य म्हणून नोंद झाली होती.