ओडिशामध्ये ‘नुस्खा जौहार महोत्सव’ साजरा 
२६ ऑगस्ट २०१७ पासून ओडिशामध्ये दरवर्षी साजरा केल्या जाणार्‍या ‘नुस्खा जौहार महोत्सव’ ला सुरुवात झाली आहे.


‘नुस्खा जौहार महोत्सव’ हा पश्चिम ओडिशात ‘नौखाई’ म्हणून ओळखला जातो. प्रथेनुसार नवे आलेले ‘नाबन्ना’ पीक संबलपूरच्या सामलेश्वरी देवीला अर्पण केले जाते. याला ‘नाबन्ना लागी’ समारंभ म्हणून ओळखतात.भारतीय तटरक्षक दलाचे प्रशिक्षण जहाज ‘ICGS वरुण’ सेवानिवृत्त
२३ ऑगस्ट २०१७ रोजी कोची येथे एका समारंभात भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘ICGS वरुण’ नावाचे जहाज ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आले.

‘ICGS वरुण’ हे दलाचे प्रशिक्षण जहाज तसेच टेहळणीसाठी उपयोगात येणारे जहाज होते. ते त्याच्या मालिकेमधील चौथे जहाज होते. या ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (OPV) ची बांधणी मुंबईच्या मजगाव डॉक कंपनीने केली होती.बॉक्सर मेवेदरचा ५०-० ने विक्रमी विजय
निवृत्तीनंतर वयाच्या चाळिसाव्या वर्षी पुनरागमन करत रणांगणात उतरलेल्या मुष्टियोद्धा फ्लॉईड मेवेदर याने ५० – ० अशा फरकाने एकांगी जबरदस्त विजय मिळवत विक्रमी कामगिरी केली. हेवीवेट प्रकारातील रॉकी मार्सियानो याचा ४९ – ० चा विक्रम त्याने मागे टाकला. 

मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेगर यांच्यात झालेल्या या लढतीकडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले होते. मॅकग्रेगर सोबतची ही मेगाफाईट जिंकत मेवेदरने विक्रम प्रस्थापित केला. एकही पॉइंट न गमावता टेक्निकल नॉकआऊटच्या माध्यमातून मॅकग्रेगरला दहाव्या फेरीत त्याचा दारुण पराभव केला. 

मॅकग्रेगर हा मिश्र मार्शल आर्ट्समधील चँपियन असून, तो व्यावसायिक मुष्टियुद्ध स्पर्धेत पदार्पण करत होता.सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्‍यात अपुरी पडली. या स्पर्धेत नोझोमी ओकुहराला सुवर्णपदक, सिंधूला रौप्य तर सायनाला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्य फेरीत साईना नेहवालला तीन गेमच्या लढतीत पराभूत केलेल्या नोझोमी ओकुहाराने हिनेच भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केले. 
सिंधूला तिने निर्णायक लढतीत १९-२१, २२-२०, २०-२२ अशी हार पत्करण्यास भाग पाडले. 

पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन याने देखील पहिले विजेतेपद मिळविताना चीनच्या माजी विजेत्या लिन डॅनचा २२-२०, २१-१६ असा सहज पराभव केला. ही लढत ५४ मिनिटे चालली.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय पदक विजेते
साईना नेहवाल – रौप्यपदक, महिला एकेरी (२०१५)
पी. व्ही. सिंधू – ब्राँझपदक, महिला एकेरी (२०१३ आणि २०१४)
प्रकाश पदुकोण – ब्राँझ, पुरुष एकेरी (१९८३)
ज्वाला गुत्ता – अश्‍विनी पोनप्पा – ब्राँझ, महिला दुहेरी (२०११)

किदांबी श्रीकांतच्या पराभवामुळे जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील पदकांचा दुष्काळ तीन तपांनंतर संपवण्याची प्रतीक्षा कायम राहिली.
त्याला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सॉन वॅन हो याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. भारताची या स्पर्धेतील पुरुष एकेरीत पदक जिंकण्याची अपेक्षा ३४ वर्षांनंतरही पूर्ण झाली नाही.


दिल्लीमध्ये प्रथम ‘ग्रामीण खेळ’ चा शुभारंभ
२८ ऑगस्ट २०१७ रोजी ग्रामीण खेळ (Rural Games) किंवा ग्रामीण खेल महोत्सव याचे पहिले संस्करण राजधानी दिल्लीपासून सुरू केले जाणार आहे. 

क्रीडा मंत्रालयाद्वारा आयोजित ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात अलीपूर, मेहरौली, नांगलोई, नजफगड आणि शहादरा या ठिकाणी होणार आहे.

शिवाय भारताचे उपराष्ट्राध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्या हस्ते क्रीडा मंत्रालयाच्या २८ ऑगस्टला दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ‘नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च’ संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून सुमारे १००० मुलं निवडली जातील आणि त्यांना आठ वर्षांसाठी दरवर्षी ५ लाख रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार. इराकमधील एक शहर इसिसच्या जाचातून मुक्त
इराकमधील एक महत्त्वपूर्ण शहर असलेल्या ताल अफारवर इराकी सैन्याने नियंत्रण मिळविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे सैन्यास इराकी सैन्याने पराजित केले आहे.

या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इराकचे सैन्य घुसले असून शहरामधील ऐतिहासिक किल्लाही जिंकण्यात इराकी सैन्यास यश आले आहे. पश्‍चिम आशियातील ओटोमान तुर्क साम्राज्य काळात बांधण्यात आलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर पुन्हा एकदा इराकचा झेंडा फडकाविण्यात आला आहे.

तसेच जुलै महिन्यात मोसूल या इराकमधील शहरामध्ये इसिसविरोधात निर्णायक जय मिळविल्यानंतर आत्मविश्‍वास वाढलेल्या इराकी सैन्याने उर्वरित देशामध्येही आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशार्थ कारवाई सुरु केली आहे.अमेरिकेने व्हेनेझुएलावर वित्तीय निर्बंध लादले
२५ ऑगस्ट २०१७ रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलावर वित्तीय निर्बंध लादले आहे.हे निर्बंध व्हेनेझुएलामध्ये चालणार्‍या हुकूमशाहीच्या विरोधात आहे. 

राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या नेतृत्वात व्हेनेझुएला सरकारने सरकारसोबतच्या कोणत्याही नवीन सौद्यांपासून बँकांना वगळल्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचलले.

वित्तीय निर्बंधाच्या आदेशानुसार, पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यात आणि आयात यासह बहुतेक व्यापारासाठी वित्तपुरवठा करणे, फक्त सेटगोचा समावेश असलेले व्यवहार, निवडलेल्या विद्यमान व्हेनेझुएला कर्जांमधील व्यवहार करणे, आणि मानव कल्याणासाठी व्हेनेझुएलाला आर्थिक मदत देणे अशी कार्ये ३० दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार नाहीत.सोन्या-चांदीची दक्षिण कोरियाकडून होणारी आयात भारताने प्रतिबंधित केली
देशातील मौल्यवान धातूंच्या आयातीमध्ये तेजी आणण्यासाठी भारत सरकारने दक्षिण कोरियातील सोन्या-चांदीच्या वस्तूंची आयात करण्यास प्रतिबंधित केले आहे.

यामुळे आयातदारांना आता दक्षिण कोरियाकडून सोन्या-चांदीच्या आयातीसाठी विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFT) कडून परवाना प्राप्त करावा लागेल. 

जानेवारी २०१० मध्ये भारताने मुक्त व्यापार करार केल्यानंतर दक्षिण कोरियाकडून अचानकपणे सोन्याची आयात वाढली. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला. 

दक्षिण कोरियाकडून १ जुलै ते ३ ऑगस्ट २०१७ या काळात $338.6 दशलक्ष किंमतीच्या सोन्याची आयात झाली, जी की वर्ष २०१६-१७ मध्ये $70.46 दशलक्ष इतकी होती.‘हार्वे’ चक्रीवादळ अमेरिकन किनारपट्टीवर धडकले
‘हार्वे’ चक्रीवादळ २६ ऑगस्ट २०१७ रोजी अमेरिकेच्या आग्नेय टेक्सासमध्ये धडकले.

या चक्रीवादळाला ‘श्रेणी ४’ मध्ये गणले गेले आहे. हवेचा वेग ताशी १३० मैल इतका गणला गेला आहे. २००५ साली धडकलेल्या ‘विल्मा’ चक्रीवादळानंतर ‘हार्वे’ हे प्रथमच इतक्या ताकदीचे वादळ आहे