भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा
भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ रोजी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिश्रा यांना शपथ दिली.


६४ वर्षीय न्या. मिश्रा यांनी न्या. जे. एस. खेहार यांच्या निवृत्तीनंतर हे पद सांभाळले आहे. ते पुढील १३ महिन्यांसाठी २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत हे पद धारण करतील.

भारताचे प्रधान न्यायाधीश (CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. भारतीय घटनेच्या कलम १४५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम १९६६ अन्वये, CJI सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात. 

१९५० साली न्या. एच. जे. कानिया (२६ जानेवारी १९५० – ६ नोव्हेंबर १९५१) हे प्रथम CJI होते.२०२० सालापर्यंत लष्कराला मध्यम पल्ल्यावर मारा करणारे क्षेपणास्त्र मिळणार
इस्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) च्या सहकार्याने भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) मध्यम पल्ल्यावर पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (MRSAM) प्रणाली विकसित करणार आहे. MRSAM प्रणाली २०२० सालापर्यंत भारतीय लष्करासाठी तयार होण्याचा अंदाज आहे. 

हे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र सुमारे ७० किलोमीटरवरचे क्षेपणास्त्र, लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर भेदू शकण्यास सक्षम असेल. हे भारतीय नौदलातल्या लांब पल्ल्याच्या SAM ची सुधारित आवृत्ती असेल.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी DRDO ने १७००० कोटी रुपयांचा करार केला आहे. या सौदयामध्ये ४० फायरिंग युनिट आणि सुमारे २०० क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.२९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
२९ ऑगस्ट हा दिवस ख्यातनाम हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत एकूण २९ खेळाडू आणि प्रशिक्षकांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार या क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित केले.

मेजर ध्यानचंद यांचे १९२८, १९३२ आणि १९३६ साली खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी मध्ये सुवर्ण मिळवून देण्यामध्ये फार मोठे योगदान होते.भारताने SAFF अंडर-१५ फूटबॉल स्पर्धा जिंकली
भारतीय फुटबॉल संघाने सातदोबाटो, नेपाळ येथे खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) अंडर-१५ विजेतेपद २०१७’ स्पर्धा जिंकली आहे.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा २-१ असा पराभव केला आहे.


दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेची स्थापना गोल्ड चषक या नावाने प्रादेशिक स्पर्धा म्हणून १९९३ साली झाली. 

१९९७ साली स्थापन केलेल्या SAFF चे बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संस्थापक सदस्य देश आहेत. पुढे भूटान (२०००) आणि अफगाणिस्तान (२००५) SAFF मध्ये सामील झालेतप्रसिद्ध फुटबॉलपटू अहमद खान यांचे निधन
२७ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू अहमद खान यांचे निधन झाले आहे. १९४८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवणारे अहमद खान ९० वर्षांचे होते.

अहमद खान हे १९५१ च्या आशियाई खेळ स्पर्धेत सुवर्ण जिंकणार्‍या भारतीय संघाचा भाग होते. त्यांनी १९३८ साली बेंगळुरूच्या क्रेसेंट क्लबमध्ये सामील झाले आणि विविध स्तरावर स्पर्धा खेळल्या.क्रिस्टियानो रोनाल्डोला ‘UEFA प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कार
रिअल मॅड्रिड फूटबॉल संघाचा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याला ‘UEFA प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे. रोनाल्डोला चार वर्षांत तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ३२ वर्षीय रोनाल्डोने त्याच्या कारकि‍र्दीत सर्व स्पर्धांमध्ये एकूण ४२ गोल केलेले आहेत.

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन द्वारा दिल्या जाणार्‍या ‘UEFA क्लब फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्कार’ च्या बदल्यात ‘UEFA प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार दिला जात आहे. २०१० साली पहिला पुरस्कार दिला गेलामादागास्कर आणि मोझांबिक प्रदेशासाठी सागरी हवामान अंदाज यंत्रणेचे उद्घाटन
भारताच्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) ने पापुआ न्यू गिनीच्या मोरेस्बी बंदरावर नव्या सागरी हवामान अंदाज यंत्रणेचे (Ocean Forecasting System) उद्घाटन केले आहे. ही यंत्रणा कोमोरोज, मादागास्कर आणि मोझांबिक प्रदेशाला हवामान अंदाज प्रदान करणार आहे.

पापुआ न्यू गिनीमध्ये रिजनल इंटीग्रेटेड मल्टी-हजार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम फॉर एशिया अँड आफ्रिका (RIMES) च्या तिसऱ्या मंत्रिस्तरीय बैठकीत या यंत्रणेचे उद्घाटन केले गेले.

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) ही भारतीय भूविज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. ESSO-INCOIS ची स्थापना १९९९ साली हैदराबाद येथे झाली. ही संस्था सागरी हवामान संदर्भात माहिती प्रदान करते आणि सल्लागार संस्था म्हणून देखील कार्य करते२९ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा
संबंध जगभरात आज आण्विक उत्क्रांतीचे पेव फुटलेले दिसून येत आहे.  याची सुरुवात आपल्याला विसाव्या शतकाच्या मध्यकाळात झाल्याचे दिसून आले आहे. १६ जुलै १९४५ रोजी पहिली आण्विक शस्त्र चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास २००० पेक्षा अधिक चाचण्या घेतल्या गेलेल्या आहेत.

अश्या चाचण्यांमुळे त्या प्रदेशातील जीवन संरचना समूळ नष्ट झाल्याचे परिणाम दिसून आले आहेत. म्हणूनच शैक्षणिक कार्यक्रमे, उपक्रमे आणि संदेश यांच्या माध्यमातून जगभर जागृती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस (International Day against Nuclear Tests) पाळण्यात येतो. 

याचाच भाग म्हणून, या अंतर्गत ५ मार्च १९७० मध्ये आण्विक शस्त्रे बंदी स्पष्ट करण्यासाठी आण्विक शस्त्रे हाताळणी कमी करण्यावरचा करार (Treaty on the Non-proliferation of Nuclear Weapons-NPT) सादर करण्यात आला. तसेच १९९६ साली व्यापक आण्विक चाचणी बंदी करार (Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty- CTBT) आणण्यात आलेला आहे.

अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन या संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच कायमस्वरूपी सदस्यांनी प्रथम NPT करार मान्य केलेला आहे. आणि भारत, इस्रायल, पाकिस्तान आणि दक्षिण सुदान या संयुक्त राष्ट्रसंघ च्या पाच सदस्य राष्ट्रांनी अजूनही NPT ला स्वीकारले नाही आहे.

२९ ऑगस्ट १९९१ रोजी सेमीपॅलटिंस्क अणुचाचणी ठिकाण बंद करण्याच्या समर्थणार्थ मोठ्या प्रमाणात प्रायोजक आणि सहप्रायोजक यांच्यासह कझाकस्तान प्रजासत्ताककडून या दिनासंबंधीचा ‘ठराव ६४/३५’ सादर करण्यात आला होता.

२ डिसेंबर २००९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या ६४ व्या सत्रात सर्व सदस्यांकडून एकमताने ‘ठराव ६४/३५’ चा अवलंब करीत २९ ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस’ म्हणून जाहीर केले गेले. त्यानंतर २०१० साली आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पहिल्यांदा चिन्हांकित केले गेले.