गुजरातचा गुगलसोबत करार 
डिजिटल इंडिया’ मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. 


गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, मुख्य सचिव जे. एन. सिंह आणि गुगल इंडियाचे जनधोरण विभागाचे संचालक चेतन कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आले.

या करारानंतर गुगल आता लघू आणि मध्यम नवउद्योजकांना प्रशिक्षण देणार असून उद्योगवाढीसाठी ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चा वापर कसा करावा याचा गुरूमंत्रही उद्योजकांना दिला जाणार आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना रोजच्या व्यवहारामध्ये इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करायचा याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशात पुणे विद्यापीठाचा सातवा क्रमांक
टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणार्‍या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. 

या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे ते अव्वल ठरले आहे. 
देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. मात्र हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही. 

जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ ४२  संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. उपराष्ट्रपतींनी DIKSHA पोर्टलचे उद्घाटन केले 
५ सप्टेंबर २०१७ रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘DIKSHA’ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.

‘DIKSHA’ पोर्टल शिक्षकांसाठी राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा ठरणार आहे, जे शिक्षकांच्या शिक्षणाच्या क्षेत्रातील समाधानास सक्षम, गतिमान व विस्तारित करणार.


भारत, म्यानमार यांनी ११ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ म्यानमार देशाच्या भेटीवर आहेत.

या भेटीत दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर संबंधांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रात ११ सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत 

०१. सागरी सुरक्षाविषयी सहकार्य करण्यासाठी करार
०२. सन 2017-2020 मध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांसाठी करार
०३. यामेथिन, म्यानमार येथील महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी करार
०४. व्हाइट शिपिंगसंबंधी माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी भारतीय नौदल आणि म्यानमार नौदल यांच्यात करार
०५. तटीय पाळत यंत्रणा उपलब्ध करविण्यासाठी तांत्रिक करार
०६. वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनामधील सहकार्यासाठी भारताच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) आणि म्यानमारच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्यात करार
०७. आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्यासाठी करार
०८. MIIT च्या स्थापनेबाबत सामंजस्य कराराच्या विस्तारासाठी पत्राचार
०९. माहिती तंत्रज्ञानसंबंधी कौशल्य वाढविण्यासाठी भारत-म्यानमार केंद्र स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य कराराच्या विस्तारासाठी पत्राचार
१०. निवडणुकीच्या क्षेत्रात करार
११. म्यानमार प्रेस कौन्सिल आणि भारतीय प्रेस कौन्सिल यांच्यातल्या सहकार्यासाठी करार

म्यानमार हा भारताचा धोरणात्मक शेजारी देश आहे. हा देश ईशान्येकडील नागालँड आणि मणिपूर यांसारख्या राज्यांसह भारतासोबत १६४० किलोमीटर लांबीच्या सीमा सामायिक करतातपरिणीती चोप्रा: टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी पहिली भारतीय महिला अम्बॅसडर
ऑस्ट्रेलियाने भारतीयांना देशाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्याच्या टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी अम्बॅसडर म्हणून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला नियुक्त केले आहे.

यासोबतच परिणीती चोप्रा ही टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी पहिली भारतीय महिला अम्बॅसडर बनली आहे. तिला ऑस्ट्रेलियाचा प्रचार करण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्यदूत टोनी ह्युबर यांच्याद्वारे मान्यताप्राप्त फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया (FOA) कार्यक्रम दिले गेले.पहिला भारत-बांग्ला चित्रपट ‘दूब’ २७ ऑक्टोबरला पडद्यावर झळकणार
बांग्लादेश आणि भारत या देशांनी एकत्रितपणे तयार केलेला ‘दूब’ हा चित्रपट दोन्ही देशांमध्ये २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पडद्यावर झळकणार.

‘दूब’ चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देखील मिळाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मोस्तोफा सरवार फारूकी हे आहेत. 

चित्रपटाची निर्मिती बांग्लादेशच्या जाझ मल्टिमीडिया आणि भारताच्या इस्के मूवीज या कंपंनींनी केलेली आहे.

चित्रपटात भारतीय अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री पारनो मित्रा तसेच बांग्लादेशचे नुसरत इम्रोस तिशा आणि रोकेया प्रची यांनी भूमिका केलेल्या आहेत.