इंडोनेशियात सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे डाॅ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उदघाटन
सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. 


दुपारच्या सत्रात वैद्यक साहित्यावर परिसंवाद झाला. पत्रकार संतोष आंधळे, प्रा डॉ वासंती वैद्य, सरल कुलकर्णी, डॉ अरुणा पाटील, सुमन मुठे यांनी त्यामध्ये भाग घेतला. याच संमेलनात निलेश गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आकाशपंख’, ‘थरार उड्डाणाचा’, ‘माझे अंदमान’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. 

त्याचप्रमाणे, डॉ शुभा साठे यांच्या ‘त्या तिघी’, तसेच सुमन मुठे यांच्या ‘सहकार चळवळीतील महिला’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. अरुंधती सुभाष यांनी सूत्रसंचालन केले९१ वे मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात होणार
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नागपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

संमेलनाच्या यजमानपदाचा मान ‘विवेकानंद आश्रम’ या संस्थेला देत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.

महामंडळाच्या एकूण १९ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. यातील सात मते बडोद्याला तर नऊ मते हिवरा आश्रमला मिळाली. अखेर बहुमताच्या आधारे संमेलन हिवरा आश्रमला देण्याचा निर्णय झाला.

तसेच या निर्णयामुळे सात वर्षांनंतर विदर्भाला पुन्हा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. याआधी २०१२ मध्ये ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळाने आयोजित केले होते.राम जेठमलानी वकिलीतून निवृत्त
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आज सक्रिय वकिलीतून निवृत्त होण्याची घोषणा केली. गेल्या ७६ वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत.

जेठमलानी आता ९५ वर्षांचे होत आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सत्कार समारंभात जेठमलानी यांनी निवृत्तीची घोषणा केली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते रांची येथे भारतातल्या प्रथम स्मार्ट शहराचे भूमिपूजन
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ९ सप्टेंबर २०१७ रोजी झारखंडमधील रांची शहरात रांची स्मार्ट शहराचे भूमिपूजन करण्यात आले.
रांची स्मार्ट शहर हे देशातले प्रथम स्मार्ट शहर ठरणार.

२०१५ साली सुरू करण्यात आलेला स्मार्ट शहर उपक्रम हा शहरी विकास मंत्रालयाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या उपक्रमामधून देशात १०० स्मार्ट शहरे तयार केली जाणार आहेत. 

संपूर्ण देशात एकूण ९० शहरांना स्मार्ट शहरांसाठी निवडलेले आहे. रांची हे देशातले प्रथम हरित क्षेत्र स्मार्ट शहर असणार.तिसर्‍या पिढीचे ‘नाग’ क्षेपणास्त्राचे यशस्वीरीत्या परीक्षण 
९ सप्टेंबरला संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) राजस्थानच्या परिक्षण क्षेत्रात ‘नाग’ या रणगाडा-भेदक गाइडेड क्षेपणास्त्रचे यशस्वीरित्या परीक्षण केले.

तिसर्‍या पिढीचे ‘नाग’ क्षेपणास्त्र हे संपूर्णता देशी बनावटीचे आहे. या क्षेपणास्त्राची मारा क्षमता सुमारे ४ किलोमीटर इतकी आहे. हे एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत DRDO कडून विकसित केल्या जाणार्‍या पाच क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक आहे. जे २०१५ सालापासून सेनामध्ये सेवेत आहे.
महिला दलाच्या ‘नाविका सागर परिक्रमा’ कार्यक्रमाला सुरुवात
देशाच्या प्रथम महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते १० सप्टेंबर २०१७ रोजी गोवा येथे ‘नाविका सागर परिक्रमा’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी INSV तरिणी जहाजाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले गेले. 

भारतीय नौदलाच्या INSV तरिणी जहाजावर संपूर्णताः महिला दल कार्यरत आहे. हा दल संपूर्ण जगाला जलमार्गे प्रदक्षिणा घालणार आहे. 

प्रवासादरम्यान फ्रीमेनटेली (आस्‍ट्रेलिया), लाइटलेटन (न्‍यूजीलँड), पोर्टसिडनी (फॉकलँड्स) आणि केपटाउन (दक्षिण अफ्रीका) या चार ठिकाणी विश्रांती घेतली जाणार.

INSV तरिणी हे ५५ फुट लांबीचे जहाज आहे. यावरील दल लेफ्टनेंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या हाताखाली आहे.

‘नाविका सागर परिक्रमा’ कार्यक्रम हा महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान सागरी प्रदूषण तपासले जाणार. सागरी यात्रेस चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आहेभारत पेट्रोलियमला महारत्न दर्जा प्राप्त होणार
भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मिलिटेड (BPCL) ला लवकरच ‘महारत्न’ कंपनीचा दर्जा प्राप्त होणार आहे.

महारत्न आणि नवरत्न सरकारी मालकीचे उपक्रम कोळसा, पेट्रोलियम, पोलाद, हेवी इंजीनियरिंग, वीज पुरवठा, दूरसंचार आणि वाहतूक सेवा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये काम करतात. 

सरकारी नियमांतर्गत जर कंपनीने आधीपासूनच नवरत्न कंपनी म्हणून नोंदणी केली असेल तसेच त्या कंपनीचा सरासरी कारभार, निव्वळ मालमत्ता आणि वार्षिक निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे २५००० कोटी, १५००० कोटी आणि ५००० कोटी रुपये असल्यास ती कंपनी महारत्न दर्जा मिळवण्यास पात्र असते. याव्यतिरिक्त, कंपनी जागतिक स्तरावर कार्य करणारी असावी. 

सध्या सात महारत्न कंपन्या आहेत, ते म्हणजे – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, कोल इंडिया , GAIL (भारत), IOC, NTPC, ONGC आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL).रॅफेल नदालने पटकाविले १६ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद
स्पेनच्या जिगरबाज रॅफेल नदालने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावत कारकिर्दीत १६ वे गँड स्लॅम विजेतेपद मिळविले. नदालने अंतिम सामन्यात केव्हिन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव केला. 

यूएस ओपनच्या निर्णायक लढतीत नदालसमोरदक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचे आव्हान होते. नदालने अँडसरनचे आव्हान सरळ तीन सेटमध्ये मोडून काढले. 

नदालने यापूर्वी 2010 आणि 2013 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. त्याने यावर्षी जूनमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळविले असून, त्याचे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. तर, कारकिर्दीतील 16 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

नदाल या वर्षातील ऑस्ट्रेलियन या ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररकडून पराभव स्वीकारावा लागला होता. फेडररने आतापर्यंत 19 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविलेली आहेत. या
टेनिसपटू स्लोअन स्टीफन्सने US ओपन महिला एकेरीचे विजेतेपद 
अमेरिकेची टेनिसपटू स्लोअन स्टीफन्स हिने न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘यूनायटेड स्टेट्‍स ओपन ट्रॉफी’ स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. 

स्टीफन्सने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या मेडिसन कीज हिचा पराभव केला.

या विजयासोबतच, स्टीफन्स ही २००२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची विजेती जेनिफर कॅप्रीयतीनंतर ग्रँड स्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकणारी विलियम्स नाव नसलेली पहिली अमेरिकन महिला ठरली आहे.

यूनायटेड स्टेट्‍स ओपन टेनिस ट्रॉफी ही हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धा आहे. १८८१ सालापासून ही स्पर्धा खेळली जात आहे आणि जगातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. हे एकमेव ग्रँड स्लॅम आहे, जे सामन्याच्या प्रत्येक फेरीमध्ये टायब्रेकर्स वापरते.