चकमा व हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व 
रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. 


चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल, मात्र स्थानिक जनतेच्या अधिकारांना डावलले जाणार नाही याची दक्षता घेऊ असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

१९६० च्या दशकात चकमा आणि हाजोंग समाजातील सुमारे एक लाख नागरिकांनी बांगलादेशमधून ईशान्य भारतात विशेषतः अरुणाचल प्रदेशमध्ये आश्रय घेतला होता. तेव्हापासून या लोकांचे भारतात वास्तव्य असून त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने २०१५ मध्ये दिले होते. 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल आणि स्थानिक रहिवाशांचे अधिकारही कमी होणार नाही असा मार्ग काढला जाईल.देशात हिंदी दिवस साजरा
आज १४ सप्टेंबर २०१७ रोजी भारतात हिंदी दिवस साजरा केला गेला. याप्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष २०१६-१७ साठी राजभाषा पुरस्कार दिली गेलेत.

राजभाषा विभागाकडून निर्मित ‘लर्निंग इंडियन लॅंगवेज वीथ आर्टिफिशियल इंटेलिजेंस (LILA)’ मोबाइल अॅपचे लोकार्पण केले गेले. या अॅपमार्फत विभिन्‍न भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषा शिकण्यास मदत मिळते.

१४ सप्टेंबर १९४९ रोजी भारताची अधिकृत राष्ट्रीय भाषा म्हणून देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला संविधान सभेने अंगिकारले. संविधानाच्या खंड ३५१ मध्ये राष्ट्रीय भाषेच्या प्रचारासंबंधी आणि विकासासंबंधी कार्ये करण्यास प्रावधान आहे.JNPCT ला ‘कंटेनर टर्मिनल ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला
जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (JNPCT) ला ०.६ दशलक्षहून अधिक TEU श्रेणीमध्ये ‘कंटेनर टर्मिनल ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये आयोजित गेटवे अवॉर्ड २०१७ समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. जवाहरलाल नेहरू पोर्टच्या मालकीच्या JNPCT ला हा पुरस्कार कंटेनरच्या वाहतुकीमध्ये सुलभता आणण्यासाठी आणि उत्तम व्यवस्थापनासाठी दिला गेला आहे.

गेटवे पुरस्कार भारतीय सागरी उद्योगामध्ये सर्वोत्तम सरावपद्धती, अभिनवता आणि प्रोत्साहन यामध्ये योगदान देणार्‍या आस्थापनेला दिला जातो.


‘अनस्टॉपेबल: माय लाइफ सो फार’  मारिया शारापोव्हाचे आत्मचरित्र
“अनस्टॉपेबल: माय लाइफ सो फार” शीर्षक असलेले हे पुस्तक रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाचे आत्मचरित्र आहे.

रशियात जन्मलेली मारिया शारापोव्हा १९९४ सालापासून अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. ती २००१ सालापासून WTA टूरमध्ये भाग घेत आहे. ती त्या दहा महिलांपैकी एक आणि एकमेव रशियन आहे, जीने करियर ग्रँड स्लॅम प्राप्त केले आहे.बन की-मून यांच्याकडे IOC एथीक्स कमिशनचे प्रमुखपद
संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव बन की-मून यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) एथीक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

ही नियुक्ती युसूफा नडिया यांच्या जागेवर करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियाचे बन की-मून यांनी सन २००७-२०१६ या काळात संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख म्हणून कार्य केले होते.

क्रीडा क्षेत्रात नीतीमत्ता आणि उत्तम प्रशासनाच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी IOC ने एथीक्स कमिशनची स्थापना केली. हे आयोग नीतिमत्तेसंबंधी नियम निश्चित करते आणि नीतिमत्तेचे उल्लंघन झाल्यास तक्रारींचा तपास घेऊन शिक्षा प्रस्तावित करते.भारतीय वंशाचे प्रा. बीना अग्रवाल यांना बाल्झन पुरस्कार प्राप्त
दोन अमेरिकेचे शास्त्रज्ञ आणि एक भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ यांना २०१७ सालचा बाल्झन पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी बर्न, स्वित्झर्लंडमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मॅंचेस्टर विद्यापीठातले भारतीय वंशाचे अर्थतज्ञ प्रा. बीना अग्रवाल यांना भारतात कृषिक्षेत्रात महिलांचे योगदान यासंबंधी अभ्यासासाठी हा पुरस्कार दिला जात आहे.

टेक्सास विद्यापीठामधील प्रा. जेम्स ऍलिसन आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रा. रॉबर्ट श्रायबर यांना मेटॅस्टॅटिक मेलानोमा या कर्करोगावर प्रतिजैविक उपचार पद्धतीसाठीच्या त्यांच्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. 

इतर विजेत्यांमध्ये बेल्जियमचे खगोलशास्त्रज्ञ मायकेल गिलोन, जर्मनीचे अलेइडा आणि जेन असमान (एक विवाहित दांपत्य) हे आहेत.

बाल्झन फाउंडेशनतर्फे दरवर्षी विज्ञान क्षेत्रात दोन पुरस्कार आणि मानवतावादी क्षेत्रात दोन पुरस्कार प्रदान केले जातात. विजेत्यांना 750,000 स्विस फ्रॅक ($790,000) इतकी रोख रक्कम पुरस्कार स्वरुपात दिली जाते.NASAच्या कॅसिनी अंतराळयानाचा प्रवास संपला
२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, NASA च्या कॅसिनी अंतराळयानाचा प्रवास १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपुष्टात आला आणि ते शनी ग्रहाच्या वातावरणात कोसळले.

प्रक्षेपणानंतर कॅसिनीने ४.९ अब्ज मैलाचा (७.९ अब्ज किलोमीटर) प्रवास केला आणि शनीला जवळजवळ ३०० वेळा प्रदक्षिणा घालून ४५३००० हून अधिक छायाचित्रे आणि ६३५ गीगाबाईट्सची वैज्ञानिक माहिती गोळा केली. कॅसिनीने सहा चंद्र शोधले तसेच शनीच्या भोवती असलेल्या पट्ट्याचा वेध घेतलेला आहे.

आतापर्यंत कॅसिनीला सोडून फक्त तीन अंतराळयानांनी शनीच्या शेजारच्या वातावरणात प्रवास केलेला आहे. त्यामध्ये १९७९ सालचे NASA चे पायोनियर-११ आणि १९८० सालचे व्हॉयेजर-१ आणि व्हॉयेजर-२ यांचा समावेश आहे.