राज्यात सागरमाला प्रकल्प राबविण्यास मंजूरी
देशाच्या किनारपट्टीलगतच्या भागाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या सागरमाला कार्यक्रमाला राज्य शासनाची मान्यता देण्याबरोबरच राज्यातील प्रकल्पांसाठी ५०% निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.


याशिवाय, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या ८ प्रकल्पांसाठी ३५ कोटी ९० लाख रूपयांचा निधी पुरवण्यास मंजूरी दिली गेली.भारतातर्फे ‘न्यूटन’ ऑस्करच्या शर्यतीत
अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ या चित्रपटाची निवड २०१८ मध्ये होणाऱ्या अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी झाली आहे. भारतातर्फे हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असेल. 

‘परकीय भाषे’तील उत्कृष्ट चित्रपट विभागातून हा चित्रपट शर्यतीत उतरेल. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. ४ मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या ९० व्या ॲकॅडमी ॲवॉर्डसाठी हा चित्रपट आता पात्र ठरला आहे

या चित्रपटात न्यूटन कुमारची भूमिका राजकुमार राव याने केली आहे.  रघुवीर यादव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यमयांच्या कार्यकाळात वाढ
केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत पदावर कायम राहतील. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अरविंद सुब्रह्मण्यम यांनी पदवीपूर्व शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. तर अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. यानंतरचे एम.फिल. आणि डी. फिलचे शिक्षण त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

२००८ मध्ये ‘इंडिया टर्न : अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन’ आणि २०११ मध्ये ‘इक्लिप्स : लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स’ ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. तसेच ते २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स?’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत.

याबरोबरच १९८८-९२ मध्ये ‘गॅट’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून हावर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (१९९९-२०००) आणि जॉन हॉपकिन्सच्या स्कूल फॉर अ‍ॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजमध्ये (२००८-१२) अध्यापनाचे कार्यही केले आहे. 


दूसरा विस्टाडोम डब्बा रेल्वे मंत्रालयाने सेवेत रुजू केला
पश्चिम घाटमार्गाचे मनोरम दृश्य दाखविण्याकरिता मुंबई-गोवा मार्गावरील जन शताब्दी एक्स्प्रेसमध्ये दूसरा विस्टाडोम डब्बा जोडण्यासाठी हा डब्बा रेल्वे मंत्रालयाने सेवेत सामावून घेतला.

विस्टाडोम डब्ब्याला काचेचे छप्पर आहे, जे इलेक्ट्रॉनिक्सद्वारा पारदर्शी किंवा अपारदर्शक बनविले जाऊ शकते. चांगले दृश्य हवे असल्यास प्रवाश्यांना एक विशेष निरीक्षणाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. शिवाय नव्या पद्धतीच्या खुर्च्या, दूरदर्शन संच आणि इतर अनेक सेवा-सुविधा या डब्ब्यात आहे.

४ कोटी रुपये खर्च असलेल्या या विस्टाडोम डब्ब्याच्या निर्मितीसाठी पर्यटन मंत्रालयाने वित्तपुरवठा केलेला आहे. असे तीन डब्बे बनविण्यात येत आहे. प्रथम विस्टाडोम डब्बा अराकू व्हॅली मार्गावर विशाखापटणम येथे एप्रिल २०१७ मध्ये कार्यरत झाले.हिमाचल प्रदेश शासनाने पर्यटन स्थळांसाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली
हिमाचल प्रदेश शासनाने २१ सप्टेंबर २०१७ रोजी पर्यटन स्थळांसाठी आपली पहिली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली.

इलेक्ट्रिक बस सेवा मनाली आणि रोहतांग या दोन टप्प्यादरम्यान चालणार आहे आणि यासाठी १० बस सुरू करण्यात येतील. १३००० फूट उंचीवर ही सेवा सुरू झाल्याची पहिलीच वेळ आहे.एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवची हॅटट्रिक
चायनामन गोलंदाज म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या कुलदीप यादवने ऐतिहासिक ईडन गार्डनवर हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केला. त्यामुले भारताने ऑस्ट्रेलियाला २०२ धावांत गुंडाळले. 

कुलदीप यादव एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक करणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. या अगोदर चेतन शर्मा आणि कपिलदेव यांनी ही कामगिरी केली आहे. 

तसेच कुलदीपने स्वतःच्या नवव्या आणि डावातील ३३ व्या षटकात हा पराक्रम केला. त्याने मॅथ्यू वेड, ऍस्टन ऍगर आणि कमिन्स यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले.भारताच्या सायकलपटू डेबोराह हेरॉल्डने आशियाई इंडोअर खेळांमध्ये तीन रौप्य जिंकले
डेबोराह हेरॉल्ड या भारतीय सायकलपटूने तुर्कमेनिस्तानच्या अश्गबात येथे खेळण्यात आलेल्या २०१७ आशियाई इंडोअर आणि मार्शल आर्ट्स खेळांमध्ये तीन रौप्यपदके जिंकली.

तिने २०० मीटर वैयक्तिक स्प्रिंट प्रकारात, ट्रॅक सायक्लिंगमध्ये केअरिन प्रकारात आणि एलेना रेजीसह टीम स्प्रिंट प्रकारात दुसरे स्थान मिळविले.
या व्यतिरिक्त, मार्शल आर्ट्सच्या महिला कुराश प्रकारात मलप्रभा यल्लाप्पा जाधव हिने एक रौप्यपदक पटकावले. 

आतापर्यंत ५ सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्यपदकांसह भारत पदकतालिकेत नवव्या स्थानावर आहे.इराणने ‘खोरामशाहर’ नामक नवीन क्षेपणास्त्र विकसित केले
इराणने लष्करी संरक्षणास बळकट करण्याच्या उद्देशाने ‘खोरामशाहर’ नामक नवीन क्षेपणास्त्र विकसित केले. नवे क्षेपणास्त्र २००० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते.

इराण हा एक फारसी (अरबी) आखाती प्रदेशातला इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. या देशाची राजधानी तेहरान शहर असून चलन इराणी रियाल हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी हे आहेत.