मोहन जोशी यांना विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर 
मराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. 


रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबरला पुस्कार प्रदान केली जाईल. संस्थेचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पुरस्काराचे हे ५१ वे वर्ष आहे.

सन १९५९ मध्ये बालगंधर्वांना प्रथम पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावाळकर, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले.भारताने ८५ वा वायुसेना दिवस साजरा केला
आज ८ ऑक्टोबरला भारतीय वायुसेनाने (IAF) ८५ वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने एयर फोर्स स्टेशन हिंदन (गाझियाबाद) येथे IAF ची परेडचे आयोजन करण्यात आले.

भारताचे राष्ट्रपती भारतीय वायुसेनाचे ‘कमांडर इन चीफ’ च्या रूपात काम करतात. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. वायुसेनाचे वर्तमान ‘चीफ ऑफ एअर स्टाफ’ पदावर एयर चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धानोआ कार्य करीत आहेत.

वायुसेनाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी केली गेली. ब्रिटिश भारतात ही सेना ‘रॉयल इंडियन एयरफोर्स’ या नावाने ओळखली जात होती. १ एप्रिल १९३३ रोजी वायुसेनाची प्रथम तुकडी, ‘स्क्वॉड्रन नं. ‘ गठित केली गेली, ज्यात चार वेस्टलँड वापिटी विमान व पाच विमानचालकांची नियुक्ती केली गेली. या तुकडीचे नेतृत्व फ्लाइट लेफ्टनंट सेसिल बाउशर यांना देण्यात देण्यात आले होते. 

सुरूवातीला वायुसेनेत केवळ ग्राऊंड ड्यूटी व रसद या दोन शाखा होत्या. भारतीय वायुसेनाच्या मोहिमा, सशस्त्र दल अधिनियम १९४७ द्वारा परिभाषित केल्या गेल्या आहेत.उपराष्ट्रपतींनी ‘राष्ट्र सेवा पुरस्कार’ चे वाटप केले
७ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्र सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कवी व लेखक पी. परमेश्वरन आणि व्यापारी युसुफ अली यांना हे पुरस्कार दिले गेलेत. कृष्णा फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले गेले आहेत.

परमेश्वरन यांनी केरळमध्ये ‘भारतीय विचार केंद्र’ सुरु केले, ज्यामधून अभ्यास व संशोधनाद्वारे राष्ट्रीय पुनर्रचना करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यांना केरळ साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे. 

अबु धाबीमधील लुमु ग्रुप इंटरनॅशनलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक युसुफ अली हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांना २००८ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला गेला.


चौथी ‘सभ्यता संवाद’ परिषद नवी दिल्लीत आयोजित
८ ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान नवी दिल्लीत चौथी ‘सभ्यता संवाद’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘तंत्रज्ञान आणि सभ्यता’ या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात आली आहे.

परिषदेचे आयोजन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, संस्कृती मंत्रालय आणि नॅशनल जिऑग्राफिक यांनी संयुक्तपणे केले आहे. संस्कृती मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

सन २०१३ मध्ये, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने ‘सभ्यता संवाद (Dialogue of Civilizations)’ नावाने पाच वर्षांसाठी वार्षिक परिषद आयोजित करण्यास सुरूवात केली. 

हा कार्यक्रम जगभरातील सुमारे पाच प्राचीन, साक्षर सभ्यत्यांबद्दल (म्हणजेच इजिप्त, मेसोपोटामिया, दक्षिण आशिया, चीन आणि मेसोअमेरिका) संशोधित माहितीच्या प्रदर्शनाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला. 

पहिली परिषद २०१३ साली ग्वाटेमाला येथे भरली आणि त्यानंतर टर्की (२०१४), चीन (२०१५) मध्ये याचे आयोजन झालेपहिला ‘BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव – २०१७’ दिल्लीत आयोजित
दिल्लीत १० ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०१७ या काळात पहिल्यांदाच वार्षिक ‘BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव – २०१७’ चे आयोजन केले जाणार आहे. 

सरावात प्रत्येक देशांमधून १९ प्रतिनिधी सामील होणार आहे.
BIMSTEC गटाच्या सदस्य राष्ट्रांमध्ये आपत्तीच्या वेळेस प्रतिसादात्मक प्रादेशिक सहकार्य आणि आंतर-सरकारी समन्वयाच्या प्रयत्नांना संस्थात्मक बनविण्यासाठी प्रयत्न करणे हा सरावाचा मुख्य उद्देश असेल. 

६ जून १९९७ रोजी बँकॉकमध्ये बांग्लादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड यांच्याकडून BIST-EC हा एक नवीन उप-प्रादेशिक गट स्थापन करण्यात आला. याचे मुख्यालय ढाका, बांग्लादेश येथे आहे. 

बहु-क्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर पुढाकार (BIMSTEC) हा बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या सात देशांचा समूह आहे. 

बंगालच्या उपसागरालगत असलेल्या दक्षिण आशियाई आणि दक्षिण-पूर्व आशियायी देशांत विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्य चालवण्याच्या उद्देशाने हा समूह तयार करण्यात आला.अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल
अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्र या विषयातील ‘बिहॅव्हरीअल इकॉनॉमिक्स’मधील योगदानाबद्दल २०१७ चे अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले आहे. 

रिचर्ड थेलर यांनी आर्थिक आणि मानसिक गोष्टींचा व्यक्तींच्या वैयक्तिक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर काय आणि कसा परिणाम होतो याबद्दल विश्लेषण केले आहे. त्यांच्या याच विषयातील योगदानाबद्दल रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने नोबेल देऊ केला असल्याचे आज (सोमवार) सांगितले.

थेलर यांच्या ‘बिहॅव्हरीअल इकॉनॉमिक्स’ विषयातील मानवी वर्तणुकीशीसंबंधित अभ्यासामुळे अर्थशास्त्राच्या नवीन आणि वेगाने विस्तारलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. शिवाय त्यांनी केलेल्या संशोधनाचा आर्थिक शोध आणि धोरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे.

आतापर्यंत ७८ अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले आहे