भालचंद्र देशमुख यांना मरणोत्तर उत्तम प्रशासक पुरस्कार 
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.


महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रीय यांनी ११ ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते हा पुरस्कार दिवंगत भालचंद्र देशमुख यांच्या वतीने स्वीकारला.

भारतीय राजकारणातल्या अद्वितिय घटनांची साक्ष देणारे व भारताच्या अलौकिक ग्रंथसंपदेत मोलाची भर घालणारे ‘पुना टू प्राइम मिनिस्टर्स ऑफिस’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स अ लाऊ ड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराउंड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’यासह अनेक ग्रंथ भालचंद्र देशमुखांनी लिहिले.गौतम बंबावाले भारताचे चीनमधील राजदूत
ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी आणि भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने १२ ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली.

बंबावाले मूळचे पुण्याचे आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेतील १९८४ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. बंबावाले यांचा भारत-चीन संबंधांचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी
 हाँगकाँग आणि बीजिंग येथे त्यांनी १९८५ ते १९९१ काळात सेवा केली आहे. बीजिंगमध्ये दूतावासातील उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

चीनमधील भारताचे विद्यमान राजदूत विजय गोखले यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच पदभार सांभाळतील.ICC ने ९ देशांमध्ये ‘कसोटी स्पर्धा’ या नव्या स्वरुपाला मंजूर केले
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘कसोटी स्पर्धा’ आणि ‘एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) लीग’ या नव्या स्वरुपांना मंजूर केले आहे.

२०१९ मधील ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर ‘कसोटी स्पर्धा (Test Championship)’ ला सुरुवात केली जाईल व २०२१ च्या मध्यकाळात अंतिम सामन्यासह शेवट होईल. हे क्रिकेटमधील सर्वात दीर्घकाळ चालणारे स्वरूप असेल. 

झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना सुरुवातीला वगळण्यात येणार आहे. कसोटीसाठी मान्यताप्राप्त १२ देशांपैकी नऊ देश ‘कसोटी स्पर्धा’ मध्ये दोन वर्षाच्या काळात तीन देशात आणि दोन देशाबाहेर मालिका खेळणार. 

या मालिकेत किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच सामने खेळले जातील. एप्रिल २०२१ मधील शीर्ष दोन संघांमध्ये दोन महिन्यांनंतर अंतिम सामना खेळला जाईल. 

१३ संघांची ODI लीग २०२१ पासून सुरू केली जाईल आणि दोन वर्षांनंतर भारतामधील विश्वचषक स्पर्धेसाठी कोणते संघ पात्र ठरलेत हे निश्चित केले जाईल.‘युनेस्को’तून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा निर्णय 

संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या ‘युनेस्को’तून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने आज जाहीर केला. ‘युनेस्को’ इस्राईलविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. 

३१ डिसेंबर २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, तोपर्यंत अमेरिका ‘युनेस्को’चा सदस्य राहणार आहे.

‘युनेस्को’ची स्थापना १९४६ मध्ये झाली. पॅरिस येथे संस्थेचे मुख्यालय आहे. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देणारी संस्था म्हणून ती जगाला परिचित आहे.


जपानमध्ये भारत-जपान संयुक्त सागरी ‘पॅसेज’ सरावाला सुरुवात
१२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान जपानच्या ससेबो येथे ‘पॅसेज (PASSEX)’ हा भारत-जपान संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.

या सरावात भारताकडून भारतीय नौदलाच्या ‘INS सातपुडा’ आणि ‘INS कादमाट’ या जहाजांनी भाग घेतलेला आहे.स्पेसएक्सचे प्रक्षेपक पुन्हा एकदा महासागरात उतरण्यास यशस्वी 
महागड्या प्रक्षेपकाच्या भागांचे पुनर्वापरासाठी चाललेल्या कंपनीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, स्पेसएक्स कंपनीने पूर्वी अवकाशात झेपावलेल्या प्रक्षेपकाला पुन्हा एकदा प्रक्षेपित केले, जे महासागरात उतरण्यास यशस्वी ठरले.

फ्लोरिडाच्या कॅप कॅनावेरल येथून ‘फाल्कन ९’ प्रक्षेपक ‘इकोस्टार 105/SES-11’ हे दोन दळणवळण उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन (SpaceX) ही अमेरिकेमधील एक अंतराळ विज्ञान विषयक उत्पादक कंपनी आहे. या अंतराळ वाहतूक कंपनीचे मुख्यालय हॉतओर्न, कॅलिफोर्निया येथे आहे. 

उद्योजक एलोन मस्क यांनी २००२ साली याची स्थापना केली. ही २००८ साली फाल्कन-१ आणि २०१० साली ड्रॅगन अश्या दोन अग्निबाणाच्या मोहिमा आयोजित करणारी पहिली खाजगीरूपाने चालवली जाणारी अंतराळ कंपनी आहे. 

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येथून अंतराळयान (२०१२ साली ड्रॅगन) पाठवणारी ही प्रथम खाजगी कंपनी आहे.ग्लोबल हंगर इंडेक्स २०१७ मध्ये भारत १०० व्या स्थानावर आहे 
‘ग्लोबल हंगर इंडेक्स २०१७’ अनुसार, भारत १०० व्या स्थानी आहे. ११९ देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत १०० व्या स्थानी असून ते आशियामध्ये केवळ अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पुढे आहे. 

बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्यामुळे मागील वर्षाच्या ९७ व्या स्थानावरून आणखी तीन क्रमांकाने घाली घसरत यावर्षी भारत १०० व्या स्थानी आले आहे.

३१.४ सह भारताचे २०१७ सालचे GHI गुण अधिक असून ते ‘गंभीर’ श्रेणीमध्ये गणल्या गेले आहे. 

यादीत, आशिया खंडात चीन (२९), नेपाल (७२), म्यानमार (७७), श्रीलंका (८४) आणि बांग्लादेश (८८) ही राष्ट्रे भारतापूढे आहेत. तर पाकिस्तान आणि अफगानिस्तान अनुक्रमे १०६ व्या आणि १०७ व्या स्थानी आहेत.

तीन वर्षांच्या कालावधीत, भारत २०१४ सालच्या ५५ व्या स्थानावरून ४५ क्रमांकाने खाली आले आहे.

भारतात पाच वर्षाखालील एक पंचमांश बालके त्यांच्या उंचीच्या मानाने खूप कमी वजनाचे आहेत आणि एक तृतीयांश बालकांची उंची वयाच्या मानाने कमी आहे.

जागतिक स्तरावर, मध्य आफ्रिकन गणराज्यमध्ये कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक उपासमार आहे आणि हा निर्देशांकमध्ये ‘अत्यंत चिंताजनक’ श्रेणीत असलेला एकमेव देश आहे.

जगभरात लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तू कश्याप्रकारे आणि किती प्रमाणात उपलब्ध होतात याला प्रदर्शित करण्याचे GHI हे एक माध्यम आहे. देशांकडून प्राप्त होणार्‍या आकड्यांपासून या विश्लेषणात्मक अभ्यासातून उपासमार या समस्येविरुद्ध देशांच्या सरकारचे चाललेले प्रयत्न प्रदर्शित करते.

२००६ मध्ये पहिल्यांदा ‘वेल्ट हंगरलाइफ’ नामक जर्मनीच्या स्वयंसेवी संस्थेने ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ प्रसिद्ध केला होता, जी इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) च्या अहवालाखाली काम करते.