ज्येष्ठ उद्योगपती रसिकशेठ धारीवाल यांचे निधन
ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल यांचे वयाच्या ७८व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आधी तंबाखूचे व्यापारी आणि नंतर गुटखा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती झाली.

शिरूर शहरावर त्यांचे अखेरपर्यंत राजकीय वर्चस्व होते. शिरूरचे ते २१ वर्षे नगराध्यक्ष होते
लोककलांचे अभ्यासक रूस्तुम अचलखांब यांचे निधन
लोककलेचे अभ्यासक, लोककलावंत डाॅ. रूस्तुम अचलखांब यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातुन प्राध्यापक म्हणुन निवृत्त झाले होते. जालना जिल्ह्यातील मानेगाव या छोट्याशा खेडेगावातुन आलेले आचलखांब यांनी लोककला क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला होता.

‘कैफियत’, ‘बेबंदनरी’ या नाटकातुन त्यांनी भुमिका केल्या. महात्मा फुले यांच्या ‘तृतियरत्न’ नाटकाचा त्यांनी औरंगाबादमध्ये पहिला प्रयोग केला. ‘आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग’, ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’, ‘संगीत मनमोहना’ ही लोककलांवर आधारित कार्यक्रम खूप गाजले. त्यांच्या ‘गावकी’ या आत्मकथनाचा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेमसाप आणि पंजाबी साहित्य अकादमी यांच्यात सामंजस्य करार
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे.

मसाप ही १११ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली साहित्यातील मातृसंस्था आहे तर पंजाबी साहित्य अकादमीला ६३ वर्षांची वाङ्मयीन परंपरा आहे.

या करारामुळे या दोन भाषांमध्ये भाषिक सौहार्द तर निर्माण होईलच त्याचबरोबर उत्तम मराठी साहित्यकृतींचा पंजाबीत आणि पंजाबी साहित्यकृतींचा मराठी अनुवाद व्हावा यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी कालवश
सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले, त्या ८८ वर्षांच्या होत्या. 

गिरिजा देवी या बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. आपल्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्या ‘ठुमरीची राणी’ म्हणून प्रसिद्ध होत्या. 

गिरिजा देवी यांना १९७२ मध्ये पद्मश्री किताबाने त्यानंतर १९८९ मध्ये पद्मभूषणने तर २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते.काश्मीरच्या मुद्द्यावर दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती
काश्मीरच्या मुद्द्यावर राजनैतिक उपाय शोधण्याच्या दिशेने पाऊल उचलताना, केंद्र सरकारने गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची वाटाघाटी करणारे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

काश्मीरच्या हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी वार्तालाप करण्यासाठी शर्मा यांना कॅबिनेट सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे आणि त्यांच्यावर कोणतेही प्रतिबंध नसणार.

दिनेश्वर शर्मा हे भारतीय पोलीस सेवाचे १९७९ सालचे (निवृत्त) अधिकारी आहेत. त्यांनी डिसेंबर २०१४ पासून ते २०१६ सालच्या मध्यात गुप्तचर विभागाचे (IB) निदेशक म्हणून सेवा दिली होती. ते काश्मीर घाटीमध्ये सेवा देणारे पहिले IB चे अधिकारी होते.


क्रिस्टियानो रोनाल्डो – सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष खेळाडू 
रियल मॅड्रिड फुटबॉल क्लबमधील पुर्तगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याला २०१७ सालचा सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष खेळाडूचा किताब मिळाला.

रोनाल्डोला हा मान सलग दुसर्‍यांदा मिळाला आणि एकूणच पाचवा किताब आहे. यासोबतच पाच वेळा हा किताब मिळवणार्‍या बार्सिलोना क्लबच्या लियोनेल मेसी (अर्जेंटीना) सोबत आता रोनाल्डोचेही नाव घेतले जाईल.

२०१७ सालचा सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष प्रशिक्षक पुरस्कार जिनेदिन झिदान (रियल मॅड्रिड) याला मिळाला. 
सर्वोत्कृष्ट FIFA महिला प्रशिक्षक पुरस्कार सरीना विगमन (नेदरलँड राष्ट्रीय संघ) यांना देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट FIFA गोलरक्षक २०१७ पुरस्कार गियानलुईगी बुफन (इटली राष्ट्रीय संघ) यांना, 
FIFA पुसकस अवॉर्ड ऑलिव्हर गिरॉड (फ्रान्स राष्ट्रीय संघ) यांना तर FIFA फॅन अवॉर्ड सेल्टिक सपोर्टर यांना मिळाला.

१९०४ साली FIFA ची स्थापना करण्यात आली. याचे झुरिच (स्वीत्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता २११ राष्ट्रीय संघटनांचा समावेश आहे.चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा क्षी जिनपिंग
चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशाचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची निवड झाली आहे. माओ यांच्यानंतर क्षी जिनपिंग हे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत.

त्यांच्या विचारसरणीचा व नावाचा समावेश कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेत करण्यात आला असून त्यामुळे आता ते पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग व त्यांचे वारसदार डेंग शियाओपेंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

क्षी यांची साम्यवादाची संकल्पना ही नवीन काळातील असून, त्याला चीनच्या मूल्यांची डूब दिलेली आहे व त्यांचा समावेश आता चीन कम्युनिस्ट पक्षाच्या १९ व्या अधिवेशनात पक्षाच्या घटनेत करण्यात आला आहे. जागतिक पोलिओ दिवस २४ ऑक्टोबर
पोलिओ निर्मूलनासंबंधी जागरूकता फैलावण्यासाठी दरवर्षी २४ ऑक्टोबरला जगभरात जागतिक पोलिओ दिवस आयोजित केला जातो.

संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्र (CDC) ने “वन डे. वन फोकस: एंडिंग पोलिओ” या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला. 

रोटरी इंटरनॅशनलद्वारा जोनस सॉक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस स्थापित केला गेला आहे. जोनस सॉक १९५५ साली प्रथम पोलिओ लस शोधून काढणार्‍या संशोधकांच्या चमूचे प्रमुख होते. 

१९८८ साली स्थापित ‘वैश्विक पोलिओ निर्मूलन पुढाकार (GPEI)’ या कार्यक्रमामधून ही लस आणि अल्बर्ट सबिन यांनी विकसित केलेली तोंडावाटे घेण्याची लस देण्याचे सुरू केले गेले. २०१३ सालापर्यंत, GPEI ने जगभरातील पोलिओला ९९% ने कमी केले होते.निकारागुवा देशाने पॅरिस करारावर स्वाक्षरी केली
निकारागुवा देशाने कार्बन उत्सर्जनासंबंधी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे. आता जगातले अमेरिका आणि सीरिया हे दोन देशच वाचले आहेत, ज्यांचा या करारात सहभाग नाही.

पॅरिस करार हा यूनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) दरम्यान करण्यात येत असलेला एक करार आहे, ज्यामधून २०२० सालापासून हरितवायू उत्सर्जनात कमतरता आणणे, अंगिकार आणि वित्त पुरवठा सुरू होणार आहे. 

UNFCCC च्या १९६ सदस्य देशांनी १२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिसमध्ये झालेल्या UNFCCC च्या २१ व्या CoP परिषदेत या कराराला स्वीकारले. आतापर्यंत १४८ सदस्यांनी याला अंगिकारण्यास मान्यता दिली आहे. या शतकात जागतिक पातळीवरील तापमान 2oC पेक्षा कमी राखण्यास आणि ते 1.5 oC पर्यंत मर्यादित करण्याच्या प्रयत्न करणे हे कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे.

निकारागुवा हा मध्य अमेरिका प्रदेशातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. हा देश प्रशांत महासागर आणि कॅरिबियन समुद्र दरम्यान स्थित आहे. देशाची राजधानी मनागुवा शहर आहे. या देशाचे चलन निकारागुवन कॉर्डोबा हे आहे आणि स्पॅनिश ही देशाची अधिकृत भाषा आहे.